Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बाईक सुरक्षित ठेवायची असेल तर ‘स्टँड’कडे दुर्लक्ष करू नका; अपघातापासून वाचण्यासाठी ५ सोप्या टिप्स! आत्ताच पाहून घ्या

दुचाकी सुरक्षित ठेवण्यासाठी तिच्या स्टँडची वेळोवेळी काळजी घेणे गरजेचे आहे. नियमित ऑयलिंग करणे, स्प्रिंग तपासणे आणि साईड स्टँडवर असताना गाडीवर बसणे टाळल्यास स्टँड खराब होत नाही व गाडी अचानक पडण्याचा धोका टळतो.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 21, 2026 | 08:15 AM
बाईक सुरक्षित ठेवायची असेल तर ‘स्टँड’कडे दुर्लक्ष करू नका; अपघातापासून वाचण्यासाठी ५ सोप्या टिप्स! आत्ताच पाहून घ्या
Follow Us
Follow Us:
  • स्टँड गंजू नयेत आणि ते कडक होऊ नयेत म्हणून वेळोवेळी माती स्वच्छ करून ऑयलिंग किंवा ग्रीसिंग करावे.
  • गाडी साईड स्टँडवर उभी असताना त्यावर बसणे टाळावे, यामुळे स्टँड वाकण्याचा किंवा तुटण्याचा धोका टळतो.
  • चालत्या गाडीत स्टँड खाली पडू नये म्हणून स्प्रिंगचा ताण तपासावा आणि चिखलात किंवा चढ-उतारावर नेहमी मेन स्टँडचा वापर करावा.

आपण आपल्या बाईकच्या इंजिनची, मायलेजची आणि लूकची खूप काळजी घेतो. पण गाडी ज्याच्या भरवशावर उभी राहते, त्या ‘स्टँड’ कडे आपले सहसा दुर्लक्ष होते. दुचाकीचा स्टँड खराब झाला, तर गाडी पडण्याचा आणि मोठे नुकसान होण्याचा धोका असतो. म्हणूनच, बाईकच्या स्टँडची काळजी कशी घ्यावी, याच्या काही सोप्या टिप्स खालीलप्रमाणे आहेत:

१.वेळेवर ऑयलिंग आणि ग्रीसिंग करणे आवश्यक

स्टँड सतत माती, पाणी आणि कचऱ्याच्या संपर्कात येत असल्याने त्याचा सांधा कडक होतो. त्यामुळे आठवड्यातून किंवा पंधरवड्यातून एकदा स्टँडच्या स्प्रिंगवर आणि जॉइंटवर थोडे वंगण किंवा ग्रीस लावावे. यामुळे स्टँड लावताना किंवा काढताना त्रास होत नाही आणि तो गंजत नाही.

सुपरकारच्या इंजिनालाही पछाडून सोडेल ही हत्तीमाफिक बाईक! बॉस हॉस कंपनी आणतेय जगातील ‘सर्वात रापचिक क्रूझर बाईक’! पाहून घ्या एक झलक

२.स्प्रिंगच्या ताणाची तपासणी

स्टँडला जोडलेली स्प्रिंग ही सर्वात महत्त्वाची असते. जर स्प्रिंग सैल झाली, तर चालत्या गाडीत स्टँड अचानक खाली पडू शकतो, ज्यामुळे मोठा अपघात होऊ शकतो. स्प्रिंगचा ताण व्यवस्थित आहे की नाही, हे वेळोवेळी तपासा. स्प्रिंग गंजली किंवा सैल झाली असल्यास ती मेकॅनिककडून लगेच बदलून घ्या. मध्यरस्त्यात स्प्रिंग सैल होऊन पडली असेल तर तात्पुरती मार्तुलने ताणून जोडू शकता. पण खराब झालेली स्प्रिंग बदलानेच योग्य ठरेल.

३.वजनाचा अतिवापर टाळा

अनेक लोकांना सवय असते की गाडी साईड स्टँडवर उभी असतानाही ते गाडीवर येऊन बसतात. साईड स्टँड हा केवळ गाडीचा समतोल राखण्यासाठी असतो, संपूर्ण भार पेलण्यासाठी नाही. असे केल्याने स्टँड वाकतो किंवा त्याची चेसिस जोडणारी जागा कमकुवत होते. त्यामुळे गाडीवर बसण्यापूर्वी स्टँड नेहमी वर करा.

Triumph: ट्रायम्फच्या इतिहासातील टॉप 5 लिमिटेड एडिशन बाईक्स! काही मोजके मास्टरपीस जे नशीबवान घेऊन गेले!

४.योग्य जागीच गाडी उभी करा

गाडी पार्क करताना जमीन कशी आहे, हे पाहणे गरजेचे आहे. चिखलात, वाळूत किंवा चढ-उताराच्या रस्त्यावर साईड स्टँडवर गाडी लावल्यास ती घसरून पडण्याची शक्यता असते. अशा ठिकाणी नेहमी मेन स्टँडचा वापर करा. तसेच, पावसाळ्यात स्टँडच्या खाली लोखंडी किंवा प्लॅस्टिकची प्लेट ठेवल्यास स्टँड जमिनीत रुतत नाही.

५.गंज आणि घाणीपासून संरक्षण

गाडी धुताना स्टँडचा खालचा भाग नीट स्वच्छ करा. तिथे साचलेली माती गंज पकडण्यास कारणीभूत ठरते. जर स्टँडचा रंग उडाला असेल, तर त्याला अँटी-रस्ट कोटिंग किंवा साधा काळा रंग देऊन घ्या, जेणेकरून त्याचे आयुष्य वाढेल.

बाईकचा स्टँड हा जरी छोटा भाग असला, तरी तो तुमच्या महागड्या गाडीला सुरक्षित ठेवतो. त्यामुळे प्रत्येक सर्व्हिसिंगच्या वेळी मेकॅनिकला सांगून स्टँडची आवर्जून तपासणी करून घ्या.

Web Title: Bike stand tips automobile news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 08:15 AM

Topics:  

  • automobile
  • Bikes

संबंधित बातम्या

सुपरकारच्या इंजिनालाही पछाडून सोडेल ही हत्तीमाफिक बाईक! बॉस हॉस कंपनी आणतेय जगातील ‘सर्वात रापचिक क्रूझर बाईक’! पाहून घ्या एक झलक
1

सुपरकारच्या इंजिनालाही पछाडून सोडेल ही हत्तीमाफिक बाईक! बॉस हॉस कंपनी आणतेय जगातील ‘सर्वात रापचिक क्रूझर बाईक’! पाहून घ्या एक झलक

Kawasaki Bikes: कावासाकीच्या 5 सर्वात क्रेझी ‘लिमिटेड एडिशन’ बाईक्स! हा आहे सुपरबाईक विश्वातील दुर्मिळ खजिना
2

Kawasaki Bikes: कावासाकीच्या 5 सर्वात क्रेझी ‘लिमिटेड एडिशन’ बाईक्स! हा आहे सुपरबाईक विश्वातील दुर्मिळ खजिना

Triumph: ट्रायम्फच्या इतिहासातील टॉप 5 लिमिटेड एडिशन बाईक्स! काही मोजके मास्टरपीस जे नशीबवान घेऊन गेले!
3

Triumph: ट्रायम्फच्या इतिहासातील टॉप 5 लिमिटेड एडिशन बाईक्स! काही मोजके मास्टरपीस जे नशीबवान घेऊन गेले!

हिरो मोटोकॉर्पची अ‍ॅथर एनर्जीमध्ये १,००० कोटींची मोठी गुंतवणूक; नव्या ई-स्कूटर्स येणार बाजारात
4

हिरो मोटोकॉर्पची अ‍ॅथर एनर्जीमध्ये १,००० कोटींची मोठी गुंतवणूक; नव्या ई-स्कूटर्स येणार बाजारात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.