Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाडीला काळी फिल्म लावण्याबाबत कायदेशीर नियम काय आहेत? जाणून घ्या आरटीओ आणि सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांनुसार गाडीच्या काचांवर कोणत्याही प्रकारची बाहेरील 'सन कंट्रोल फिल्म' लावणे बेकायदेशीर आहे. केवळ कंपनीने दिलेले 'टिन्टेड ग्लासेस' (पुढील काच ७०% आणि बाजूच्या काचा ५०% पारदर्शकता) वापरण्यास परवानगी आहे; नियमांचे उल्लंघन केल्यास दंड आणि फिल्म काढून घेण्याची कारवाई होऊ शकते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 21, 2026 | 07:18 PM
गाडीला काळी फिल्म लावण्याबाबत कायदेशीर नियम काय आहेत? जाणून घ्या आरटीओ आणि सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
Follow Us
Follow Us:

उन्हाळ्याच्या दिवसांत गाडीतील तापमान कमी ठेवण्यासाठी आणि एसीचा कुलिंग इफेक्ट वाढवण्यासाठी अनेक जण गाडीच्या काचांना काळी फिल्म किंवा सन कंट्रोल फिल्म लावण्याचा विचार करतात. परंतु, भारतात गाडीच्या काचांवर कोणत्याही प्रकारची अतिरिक्त फिल्म लावणे हा कायदेशीर गुन्हा ठरू शकतो. या संदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रीय मोटर वाहन नियमांचे नेमके काय कायदे आहेत आणि किती टक्के पारदर्शकतेला परवानगी आहे, हे आपण सविस्तर समजून घेऊया,

१. सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय काय आहे?

वर्ष २०१२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना सुरक्षेच्या कारणास्तव गाड्यांना काळ्या फिल्म्स लावण्यावर पूर्णपणे बंदी घातली आहे.

बंदीचे कारण: काळ्या फिल्म्समुळे गाडीच्या आत नेमके काय चालले आहे किंवा कोण बसले आहे हे बाहेरून दिसत नाही. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी न्यायालयाने हा कडक निर्णय घेतला.

नियम: तुम्ही बाजारातून कोणतीही सन कंट्रोल फिल्म विकत घेऊन ती गाडीच्या काचेवर अतिरिक्त चिकटवू शकत नाही—मग ती फिल्म अगदी ५% काळी असो वा ७०% पारदर्शक असो.

कमी हवेमुळे घसरते मायलेज, जास्त हवेमुळे सुटते ग्रिप; मग टायरसाठी ‘परफेक्ट’ हवा किती?

२. मग पारदर्शकतेचा नियम नेमका काय आहे?

केंद्रीय मोटर वाहन नियम, १९८९ च्या नियम १०० नुसार पारदर्शकतेचे निकष ठरवण्यात आले आहेत, पण त्यामध्ये एक मोठी गोची आहे जी अनेक वाहनधारकांना समजत नाही. नियमाचा अर्थ असा आहे की, गाडी उत्पादक कंपनीनेच बनवताना काचा ७०% आणि ५०% पारदर्शकतेच्या नियमानुसार बनवणे बंधनकारक आहे. म्हणजेच, जर कंपनीने आधीच काच ५०% पारदर्शक दिली असेल आणि तुम्ही त्यावर आरपार दिसणारी ५०% ची दुसरी फिल्म लावली, तर पारदर्शकता आणखी कमी होते आणि तो गुन्हा ठरतो. थोडक्यात सांगायचे तर, काचेवर वरून कोणतीही फिल्म चिकटवण्यास कायद्याने सक्त मनाई आहे.

३. टिन्टेड ग्लासेस कायदेशीर आहेत का?

होय! जर तुमच्या गाडीला कंपनीनेच बनवून देताना काळ्या किंवा डार्क रंगाच्या काचा दिल्या असतील, तर ते पूर्णपणे कायदेशीर आहे. मारुती सुझुकी, ह्युंडाई, किंवा टाटा सारख्या कंपन्या त्यांच्या टॉप मॉडेल्समध्ये ग्रीन ग्लासेस किंवा युव्ही कट ग्लासेस देतात. हे काचेच्या आतच केमिकल वापरून बनवलेले असतात (वरून फिल्म लावलेली नसते) आणि हे आरटीओच्या नियमात बसतात.

टायरवरील आकड्यांचे रहस्य! सुरक्षेसाठी आणि चांगल्या मायलेजसाठी योग्य टायर कसा ओळखावा? जाणून घ्या योग्य टायर निवडण्याचे गणित

४. अपवाद आणि दंडाची कारवाई

व्हीआयपी सूट: केवळ सुरक्षा श्रेणी असलेल्या व्हीआयपी व्यक्ती आणि राष्ट्रपती, पंतप्रधान किंवा काही विशिष्ट सरकारी पदांवरील व्यक्तींच्या गाड्यांनाच सुरक्षेच्या कारणास्तव काळी फिल्म लावण्याची अधिकृत परवानगी असते.

दंडाची कारवाई: जर तुम्ही गाडीला काळी फिल्म लावली असेल, तर ट्रॅफिक पोलीस किंवा आरटीओ अधिकारी तुम्हाला दोन प्रकारे शिक्षा करू शकतात,

१. ते जागेवरच तुमची फिल्म स्क्रॅच करून काढून टाकू शकतात.

२. मोटार वाहन कायद्यांतर्गत पहिल्या गुन्ह्यासाठी ₹५०० आणि वारंवार गुन्हा केल्यास ₹१,५०० पर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो.

उन्हापासून वाचण्यासाठी कायदेशीर पर्याय: जर तुम्हाला गाडीत ऊन नको असेल, तर तुम्ही गाडी पार्क असताना किंवा चालवताना रिमूव्हेबल सनशेड्स किंवा फॅब्रिकचे कर्टन्स वापरू शकता. हे गाडीच्या काचेवर फिक्स नसतात आणि ट्रॅफिक पोलिसांनी थांबवल्यास ते सहज काढून ठेवता येतात.

Web Title: Black tinted glass rto rules regulations auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 07:18 PM

Topics:  

  • automobile
  • RTO
  • Supreme Court

संबंधित बातम्या

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
1

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
2

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या
3

7 लाखांच्या बजेटमध्ये कॉम्पॅक्ट सेडान घ्यायचीय? हे आहेत 5 बेस्ट ऑप्शन! जाणून घ्या

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू
4

BMW F 450 R वरून पडदा लवकरच उठणार; 1 ऑक्टोबरला होणार डेब्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.