फोटो सौजन्य: Instagram
BMW ग्रुप ने 2024 च्या पहिल्या सहा महिन्यात म्हणजेच जानेवारी ते जूनमध्ये मजबूत प्रदर्शन केले आहे. यामुळे कार विक्री (BMW+MINI) मध्ये 21 टक्क्यांनी अधिक वाढ झाली आहे. ही गोष्ट असे अधोरेखित करते की स्पोर्ट्स एक्टिविटी वाहने, लक्जरी क्लास आणि इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी भारतात जोर धरू लागली आहे. चला तर मग जाऊन घेऊया काय विशेष आहे या BMW कार्समध्ये.
बीएमडब्ल्यू गाड्या नेहमीच भारतीयांसाठी चर्चेचा विषय ठरल्या आहेत. मग ते त्या गाडीच्या किमंतीबद्दल असो कि त्याच्या वेगवेगळ्या फीचर्स बद्दल. बीएमडब्ल्यू गाड्यांची किमंत ही ४३ लाखांपासून ते थेट कोटींपर्यंत आहे. या गाड्या ओळखल्या जातात त्या त्यांच्या विशेष लक्झरी मॉडेलमुळे. त्याशिवाय नवे तंत्रज्ञान, आरामदायी सीट्स, वेगवान स्पीड अशा अनेक फीचर्ससहित या गाड्या मार्केट मध्ये भारतीयांचे लक्ष वेधत आहे. तसेच BMW ग्रुप ने 2024 च्या पहिल्या सहा महिन्यात म्हणजेच जानेवारी ते जूनमध्ये मजबूत प्रदर्शन केले आहे.
भारतातील लक्झरी कार बनवणारी कंपनी BMW India ची विक्री 2024 मध्ये पहिल्या सहा महिन्यात २१ टक्क्यांनी वाढली आहे. BMW ग्रुप इंडिया भारतात BMW आणि Mini ब्रँड अंतर्गत कार विकते. तसेच ही कंपनी बीएमडब्ल्यू मोटरराड अंतर्गत बाइकसुद्धा विकते. पहिल्या सहामाहीत, BMW ब्रँड अंतर्गत 6,734 कार आणि मिनी ब्रँड अंतर्गत 364 कार विकल्या गेल्या आहेत. तसेच BMW Motorrad ने 3,614 मोटारसायकली विकल्या आहेत. कंपनीने या कालावधीत 397 इलेक्ट्रिक कारसुद्धा विकल्या आहेत.
आतापर्यंत 2,000 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करणारी BMW ही पहिली लक्झरी कार कंपनी असल्याचे कंपनीने म्हटले आहे. BMW iX ही भारतातील सर्वाधिक विकली जाणारी लक्झरी इलेक्ट्रिक कार आहे. बीएमडब्ल्यू लक्झरी क्लास गाड्यांची विक्रीत 17 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. एकूण विक्रीत त्याचा वाटा १८ टक्के आहे.
BMW X7 ही सर्वाधिक विकली जाणारी लक्झरी कार आहे. BMW ग्रुप इंडियाचे अध्यक्ष विक्रम पाहवा म्हणाले की आमच्या वाहनांबद्दलचे तीव्र आकर्षण आणि आमच्या स्पर्धात्मकतेने आम्हाला ड्रायव्हिंगमध्ये नवनवीन गोष्टी करण्याची प्रेरणा दिली आहे.
बीएमडब्ल्यू स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी व्हेइकल्स (एसएव्ही) ने विक्रीत 54 टक्के योगदान दिले. यामध्ये २४ टक्क्यांनी वाढ झाली असून BMW X1 ही कंपनीची सर्वात लोकप्रिय SAV आहे. या गाडीच्या विक्रीतील वाटा 19 टक्के आहे. BMW 3 सिरीज ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी सेडान कार आहे. विक्रीतील त्याचे योगदान 17 टक्के आहे.