Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMW च्या लोगोमागील हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? त्वरीत जाणून घ्या

BMW च्या जगप्रसिद्ध निळ्या-पांढऱ्या लोगोचा इतिहास विमानाचा पंखा नसून, जर्मनीच्या 'बव्हेरियन' राज्याचा ध्वज आहे, ज्याचे रंग कायद्यानुसार थोडे बदलून वापरण्यात आले होते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 04, 2026 | 03:03 PM
BMW च्या लोगोमागील हा इतिहास तुम्हाला माहिती आहे का? त्वरीत जाणून घ्या
Follow Us
Follow Us:

जगातील आघाडीची लक्झरी कार उत्पादक कंपनी ‘BMW‘ चा लोगो तुम्ही अनेकदा पाहिला असेल. काळ्या वर्तुळात निळे आणि पांढरे चौकटीचे कप्पे असलेला हा लोगो अत्यंत आकर्षक वाटतो. पण या डिझाइनमागे एक अतिशय रंजक इतिहास दडलेला आहे, जो बहुतांश लोकांना माहीत नाही. अनेक वर्ष असे मानले जात होते की, हा लोगो विमानाचा फिरणारा पंखा दर्शवतो. पण प्रत्यक्ष इतिहास मात्र काहीतरी वेगळंच सांगतो,

Rapp Motorenwerke कडून झालेली सुरुवात

BMW चा पूर्ण नाव ‘Bayerische Motoren Werke’ (Bavarian Motor Works) असे आहे. १९१७ मध्ये जेव्हा या कंपनीची स्थापना झाली, तेव्हा ती स्वतंत्र कंपनी नव्हती, तर ‘Rapp Motorenwerke’ नावाच्या विमान इंजिन बनवणाऱ्या कंपनीचे रूपांतर होऊन BMW ची निर्मिती झाली होती. सुरुवातीला कंपनीचा लोगो ठरवताना Rapp कंपनीच्या जुन्या गोल लोगोचीच चौकट वापरण्यात आली आणि त्यावर ‘BMW’ ही अक्षरे कोरली गेली.

माणसांची जागा ‘ते’ घेणार! BMW कारखान्यांमध्ये ‘ह्युमनॉइड रोबोट्स’ तैनात; ऑटोमोबाईल क्षेत्रातील मोठ्या क्रांतीमागील नेमके कारण काय?

निळ्या आणि पांढऱ्या रंगाचे खरे रहस्य

लोगोच्या मध्यभागी असलेले निळे आणि पांढरे कप्पे हे कंपनीचे मूळ स्थान असलेल्या जर्मनीच्या ‘बायर्न’ (Bavaria) राज्याचे प्रतिनिधित्व करतात. बव्हेरियन राज्याच्या ध्वजाचा रंग निळा आणि पांढरा आहे. परंतु, त्या काळातील स्थानिक व्यापार कायद्यानुसार व्यावसायिक लोगोमध्ये कोणत्याही राज्याचे अधिकृत राष्ट्रीय प्रतीक किंवा ध्वज थेट वापरण्यास बंदी होती. या कायद्याचा आदर राखत, डिझायनर्सनी ध्वजाचे रंग उलटे करून पांढऱ्याऐवजी निळ्या रंगाने सुरुवात करून लोगोमध्ये समाविष्ट केले.

पाचव्या जनरेशनमध्ये BMW X5 चे पदार्पण; तब्बल ५ इंजिन पर्यायांसह हायड्रोजन व्हर्जनही मिळणार!

विमानाचा पंखा हा निव्वळ एक गैरसमज!

मग हा विमानाचा पंखा असल्याचा समज कुठून आला? तर १९२९ मध्ये कंपनीने एका मासिकात जाहिरात प्रसिद्ध केली होती. त्या जाहिरातीत विमानाचे फिरणारे पंखे दाखवले होते आणि त्या फिरणाऱ्या पंख्यांमध्ये ‘BMW’ चे अक्षर आणि रंग अचूकपणे उमटताना दिसत होते. कंपनीने आपल्या विमान इंजिन निर्मितीच्या कौशल्याचा प्रचार करण्यासाठी ही जाहिरात केली होती. मात्र, लोकांनी त्याचा असा अर्थ लावला की हा लोगो विमानाचा पंखाच आहे. कंपनीनेही बरीच वर्षे हा गैरसमज दूर करण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही.

काळानुसार या लोगोच्या बाह्य रचनेत छोटे-मोठे बदल झाले असले, तरी त्याचे मूळ स्वरूप आजही तेच आहे. एका राज्याचा आदर आणि ब्रँडची ओळख यांचा हा एक उत्कृष्ट संगम आहे, असंच म्हणायला हवं.

 

Web Title: Bmw logo history automobile news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 03:03 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!
1

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?
2

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?
3

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?

फुल चार्जमध्ये 150+km रेंज! 6 कलर ऑप्शनसह फक्त ₹66,499 मध्ये मिळते ही इलेक्ट्रिक स्कूटर
4

फुल चार्जमध्ये 150+km रेंज! 6 कलर ऑप्शनसह फक्त ₹66,499 मध्ये मिळते ही इलेक्ट्रिक स्कूटर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.