फोटो सौजन्य: Pinterest
स्कोडा स्लाविया ही कार कंपनीने मध्यम आकाराची सेडान म्हणून आणली केली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही सेडान लवकरच फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये लाँच केली जाऊ शकते. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
आलीsss हो आली MG Majestor आली! फीचर्स आणि इंजिन असे की थेट Toyota Fortuner ला भरेल धडकी
मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्कोडा भारतात स्लाव्हियाचे फेसलिफ्टेड व्हर्जन लाँच करण्याची तयारी करत आहे. लाँच होण्यापूर्वी कंपनी या कारची टेस्टिंग करताना दिसली आहे.
रिपोर्टनुसार या सेडानमध्ये किरकोळ कॉस्मेटिक बदल अपेक्षित आहेत. यामध्ये फ्रंट बंपर, एलईडी हेडलाइट्स, ग्रिल, नवीन डिझाइनचे अलॉय व्हील्स, रिअर बंपर आणि टेललॅम्प्समध्ये सुधारणा होऊ शकतात. मात्र, केबिनमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे सांगितले जात आहे.
स्कोडा स्लाविया या मॉडेलमध्ये 1.0 लिटर आणि 1.5 लिटर अशा दोन इंजिन पर्यायांची सुविधा देते. 1.0 लिटर इंजिनमधून 115 पीएस पॉवर आणि 178 न्यूटन मीटर टॉर्क मिळतो. हे इंजिन 6-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे. तर 1.5 लिटर इंजिन 150 पीएस पॉवर आणि 250 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. या इंजिनसोबत 7-स्पीड डीएसजी ट्रान्समिशन देण्यात आले आहे.
Maruti Suzuki च्या ‘या’ 7 सीटर कारला ग्राहकांनी लांबूनच केला राम राम! फक्त 197 युनिट्सची झाली विक्री
या कारच्या फेसलिफ्टबाबत कंपनीकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारतात तिचे लॉन्चिंग होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भारतीय बाजारात स्कोडा स्लाविया ही मिड-साइज सेडान सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. या सेगमेंटमध्ये तिची थेट स्पर्धा Hyundai Verna, Volkswagen Virtus आणि Honda City यांसारख्या लोकप्रिय कार्ससोबत होते.






