फोटो सौजन्य: iStock
भारतात बजेट फ्रेंडली बाईक्स जरी मोठ्या प्रमाणात विकल्या जात असल्या तरी आपल्याकडे हाय परफॉर्मन्स बाईक्सची क्रेझ सुद्धा काही कमी नाही. देशात अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत, ज्या हाय परफॉर्मन्स बाईक बनवत असतात. यातीलच एक आघाडीची बाईक उत्पादक कंपनी म्हणजे बीएमडब्ल्यू. या कंपनीने देशात अनेक बेस्ट बाईक्स ऑफर केल्या आहेत. पण आता कंपनी आपल्या दोन बाईक बंद करणार आहे.
आता देशातील नंबर 1 कार खरेदी करण्यासाठी ग्राहकांची उडणार झुंबड, कंपनी देतेय ‘एवढी’ भली मोठी सूट !
BMW Motorrad ने भारतात त्यांच्या सर्वात परवडणाऱ्या बाईक्स, BMW G 310 R आणि G 310 GS बंद केल्या आहेत. हे दोन्ही बीएमडब्ल्यू इंडियाच्या अधिकृत वेबसाइटवरून देखील काढून टाकण्यात आले आहेत. तसेच, भारतात कंपनीच्या 310 सीसी रेंजमध्ये फक्त G 310 RR विक्रीसाठी उपलब्ध आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, डीलरशिपमध्ये या बाईक्सचा स्टॉक जवळजवळ संपला आहे.
ही 300 सीसी सेगमेंटमध्ये आलेली स्ट्रीट फायटर बाईक होती. यात 312 सीसी, लिक्विड-कूल्ड, सिंगल सिलेंडर इंजिन वापरले गेले, जे 34 पीएस पॉवर आणि 28 एनएम टॉर्क निर्माण करते. भारतीय बाजारात याची एक्स-शोरूम किंमत 2.90 लाख रुपये होती. ही बाईक बंद करण्यामागील कारण म्हणजे त्यात उपलब्ध असलेले कमी फीचर्स. तसेच या बाईकचा परफॉर्मन्स सुद्धा कमी होता.
ही टूरिंग आणि ऑफ-रोड बाईक म्हणून ओळखली जात होती, ज्याचा लूक खूपच प्रीमियम होता, पण तो KTM 390 Adventure आणि Royal Enfield Himalayan 450 पेक्षा खूपच मागे होता. या दोन्ही बाईक्स यापेक्षा खूपच कमी किमतीत उपलब्ध होत्या. या बाइकची एक्स-शोरूम किंमत 3.30 लाख रुपये आहे जी खूपच जास्त दिसते.
500 KM ची रेंज देणारी Tata ची EV म्हणजे कमालच ! मिळत आहे आतापर्यंतचे सर्वात मोठे डिस्कॉऊंट
भारतात BMW G 310 R आणि G 310 GS ची विक्री बंद केल्यानंतर, BMW फक्त G 310 RR ची विक्री करत आहे. ही टीव्हीएस अपाचे आरआर 310 वर देखील बेस्ड आहे. या दोन्ही बाईकमधील फरक फक्त BMW बॅज आणि किरकोळ बदलांचा आहे. दोन्हीमध्ये अनेक उत्तम फीचर्स आहेत, परंतु टीव्हीएस व्हर्जन अधिक प्रगत आहे. अशा परिस्थितीत ही बाईक देखील लवकरच बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.