फोटो सौजन्य: iStock
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अनेक उत्तम ऑटो कंपन्या कार्यरत आहेत. त्यातीलच एक कंपनी म्हणजे मारुती सुझुकी. ही कंपनी नेहमीच ग्राहकांच्या आवश्यकता आणि मागणीनुसार बेस्ट बजेट फ्रेंडली कार्स ऑफर करत असते. कंपनीने आतापर्यंत मार्केटमध्ये अनेक कार्स ऑफर केल्या आहेत. पण मारुतीच्या काही कार्स आजही ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. यातीलच एक उत्तम कार म्हणजे Maruti Suzuki Wagon R.
नुकतेच मारुती वॅगन आर ही देशातील नंबर 1 कर बनली आहे. २०२५ च्या आर्थिक वर्षात या कारचे 1,98,451 युनिट्स विकले गेले आहेत. आता कंपनी या महिन्यात म्हणजेच एप्रिलमध्ये, ग्राहकांना विक्री वाढवण्यासाठी मोठ्या ऑफर्स देत आहे. जर तुम्ही या महिन्यात Wagon R खरेदी केली तर तुम्हाला 67,100 रुपयांपर्यंतचे बेनिफिट्स मिळेल. कंपनी त्यांच्या एएमटी व्हेरियंटवर सर्वाधिक ऑफर्स देत आहे. त्याच वेळी, एमटी आणि सीएनजी व्हेरियंटवर देखील 35,000 रुपयांचे कॅश डिस्काउंट उपलब्ध असेल. या कारची एक्स-शोरूम किंमत 5.64 लाख रुपयांपासून सुरु होते आणि 7.35 लाख रुपयांपर्यंत जाते.
‘या’ Most Powerful Bikes मध्ये मिळते सर्वात जास्त शक्तिशाली इंजिन, किंमत 10 लाखांपेक्षा कमी
एप्रिल 2025 मध्ये मारुती वॅगनआर खरेदीसाठी आकर्षक सवलती उपलब्ध आहेत. या ऑफरअंतर्गत ग्राहकांना ₹40,000 पर्यंत रोख सूट दिली जात आहे. याशिवाय, जुन्या वाहनाच्या बदल्यात ₹25,000 पर्यंत स्क्रॅपपेज बोनस देखील मिळू शकते. अतिरिक्त ₹2,100 पर्यंतचे कॉर्पोरेट डिस्काउंटही देण्यात येत आहे. या कारवर एकूण मिळणारा फायदा 67,100 पर्यंत जाऊ शकतो.
मारुती सुझुकी वॅगनआरमध्ये उपलब्ध असलेल्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, त्यात नेव्हिगेशनसह 7-इंचाची स्मार्टप्ले स्टुडिओ टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, क्लाउड बेस्ड सर्व्हिस, ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, EBD सह ABS, AMT मध्ये हिल-होल्ड असिस्ट, चार स्पीकर्स, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, माउंटेड कंट्रोल्ससह सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, स्टीअरिंग व्हील आहे.
हे 1.0–लिटर तीन-सिलेंडर पेट्रोल आणि 1.2-लिटर चार-सिलेंडर पेट्रोल इंजिनसह ड्युअलजेट ड्युअल व्हीव्हीटी तंत्रज्ञानाद्वारे शक्ती मिळवते. 1.0-लिटर इंजिनचा दावा 25.19 किमी/लीटर मायलेज आहे, तर त्याचा सीएनजी व्हेरियंट (LXI आणि VXI ट्रिममध्ये उपलब्ध) 34.05 किमी/किलोग्राम मायलेज देतो.