Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

योग्य टायरच दाखवणार कारची खरी ताकद! ब्रिजस्टोन इंडियाने लाँच केली ‘फील द ब्रिजस्टोन डिफरन्स’ मोहीम

ब्रिजस्टोन इंडियाने भारतात 'फील द ब्रिजस्टोन डिफरन्स' ही नवीन ब्रँड मोहीम सुरू केली आहे. योग्य टायरमुळे कारच्या सुरक्षेमध्ये, नियंत्रणात आणि मायलेजमध्ये कसा फरक पडतो यावर यात प्रकाश टाकण्यात आला आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 18, 2026 | 09:28 PM
ब्रिजस्टोन इंडियाने लाँच केली 'फील द ब्रिजस्टोन डिफरन्स' मोहीम (Photo Credit - X)

ब्रिजस्टोन इंडियाने लाँच केली 'फील द ब्रिजस्टोन डिफरन्स' मोहीम (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • योग्य टायरच दाखवणार कारची खरी ताकद!
  • ब्रिजस्टोन इंडियाने लाँच केली ‘फील द ब्रिजस्टोन डिफरन्स’ मोहीम
मुंबई | 18 मे 2026: ब्रिजस्टोन कॉर्पोरेशनच्या पूर्ण मालकीची उपकंपनी असलेल्या ब्रिजस्टोन इंडियाने ‘ब्रिजस्टोनचा फरक जाणून घ्या’ (‘फील द ब्रिजस्टोन डिफरन्स’) ही आपली नवीन ब्रँड मोहीम सुरू केली आहे. ही मोहीम एका साध्या पण प्रभावी विचारावर आधारित आहे, ती म्हणजे प्रत्येक कार विशिष्ट कार्यक्षमतेसाठी डिझाइन केलेली असते, परंतु योग्य टायर्स लावल्यावरच ती तिची खरी क्षमता दिसून येते. ही मोहीम कारमधील सर्वाधिक दुर्लक्षित असणाऱ्या घटकावर, म्हणजे टायरवर, प्रकाश टाकते. वास्तविक, टायर हा कार आणि रस्ता यांच्यातील सर्वात महत्त्वाचा संपर्कबिंदू असतो.

नियंत्रण, सुरक्षितता, आत्मविश्वास किंवा अधिक सुरळीत ड्रायव्हिंग अनुभव, या सर्व बाबींमध्ये टायर्सची भूमिका लोकांच्या कल्पनेपेक्षा खूप मोठी असते. एखादी कार उत्कृष्ट कार्यक्षमतेसाठी डिझाइन केलेली असली, तरी योग्य टायर्स नसतील तर तो अनुभव अपूर्णच राहतो. ब्रिजस्टोन इंडियाचे टायर्स वाहन चालकांना त्यांच्या वाहनाची पूर्ण क्षमता अनुभवण्यास मदत करण्यासाठी तयार केले गेले आहेत, ज्यामुळे प्रत्येक प्रवासात खरा फरक जाणवतो.

गेल्या 30 वर्षांपासून ब्रिजस्टोन इंडिया भारतीय ग्राहकांना हा वेगळेपणा अनुभवायला देत आहे. तंत्रज्ञान, उत्पादनातील उत्कृष्टता, नाविन्य आणि गुणवत्तेवर ठाम भर देत कंपनीने अशी उत्पादने विकसित केली आहेत जी इतरांपेक्षा वेगळी ठरतात आणि वाहन चालवताना प्रत्येक वेळी ग्राहकांना हा फरक स्पष्टपणे जाणवतो.

या मोहिमेचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे ब्रिजस्टोन इंडियाचे टायर्स कोणतीही तडजोड न करता, सतत आधुनिक तंत्रज्ञानाच्या पुढे राहून निर्माण करत असलेला फरक आहे. हे टायर्स अधिक चांगली पकड, अधिक प्रभावी ब्रेकिंग, सुलभ हाताळणी, रस्त्यावरील कमी आवाज, सुधारित इंधन कार्यक्षमता आणि टायर्सना दीर्घायुष्य प्रदान करतात, ज्यामुळे अधिक संतुलित, आरामदायक आणि विश्वासार्ह ड्रायव्हिंगचा अनुभव मिळतो.

Honda City Facelift या आठवड्यात होणार लॉन्च, नव्या डिझाईनसह ‘हे’ नवीन फीचर्स असणार

ही मोहीम निसर्गातूनही प्रेरणा घेते, ज्यात डोंगरावरील शेळी, चित्ता आणि गेंडा यांसारख्या प्राण्यांचे दर्शन घडवले आहे, जे त्यांच्या नैसर्गिक अधिवासात उत्कृष्ट पकड, वेग, अढळ ताकद आणि नियंत्रण यांचे प्रतीक मानले जातात. ज्या प्रकारे हे प्राणी कठीण परिस्थितीतही सहजतेने वावरतात, तसेच ब्रिजस्टोन इंडियाचे टायर्स भारतातील विविध प्रकारचे रस्ते आणि वाहन चालविण्याच्या परिस्थितींमध्ये आत्मविश्वासाने कामगिरी करण्यासाठीच तयार केले गेले आहेत.

या मोहिमेविषयी बोलताना, ब्रिजस्टोन इंडियाचे कार्यकारी संचालक (विक्री आणि विपणन) राजीव शर्मा म्हणाले: “ब्रिजस्टोन इंडिया हे भारतीय ग्राहकांसाठी एक विश्वासार्ह नाव राहिले आहे, आणि हा विश्वास आम्ही सातत्याने सुरक्षित, उच्च-गुणवत्तेची उत्पादने, तसेच वाहन चालविण्याचा उत्कृष्ट अनुभव प्रदान केल्यामुळे निर्माण झाला आहे. आमच्या ग्राहकांनी वर्षानुवर्षे ब्रिजस्टोनचा वेगळेपणा अनुभवला आहे; मग तो अधिक चांगले नियंत्रण असो, अधिक सुरळीत प्रवास असो किंवा दीर्घकाळ टिकणारी कामगिरी असो. ‘ब्रिजस्टोनचा फरक जाणून घ्या’ (‘फील द ब्रिजस्टोन डिफरन्स’) ही अशी मोहीम आहे, जी लोकांना लगेचच आपली वाटेल, कारण ती त्यांनी आधीच अनुभवलेल्या भावनेचे प्रतिबिंब आहे. या मोहिमेद्वारे आम्ही हा अनुभव अधिक मोठ्या जनसमुदायापर्यंत पोहोचवू इच्छितो आणि योग्य टायर बसविल्याने कारच्या कामगिरीत किती मोठा बदल होऊ शकतो हे अधिकाधिक लोकांना समजावून सांगू इच्छितो.”

ही मोहीम ब्रिजस्टोन इंडियाच्या टायर्सच्या कामगिरीवर प्रकाश टाकते आणि प्रत्येक कारमध्ये अंगभूत क्षमता असते, परंतु योग्य टायर्सच त्या क्षमतेला खऱ्या अर्थाने मूर्त रूप देतात याची आठवण करून देते. ही मोहीम देशभरातील विविध माध्यमांवर प्रसारित केली जाणार आहे, ज्यामुळे प्रत्येक वाहन चालकासाठी ‘ब्रिजस्टोन इंडिया’ने दिलेले उत्कृष्ट कार्यक्षमता, विश्वासार्हतेचे वचन आणखी बळकट होईल.

पेट्रोलच्या भडक्यामुळे १००cc बाइक्सना सुवर्णदिवस! मुंबईत दर १०४ पार; ‘या’ गाड्यांमुळे महिन्याचे बजेट वाचणार

Web Title: Bridgestone india launches new brand campaign feel the bridgestone difference

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 09:28 PM

Topics:  

  • auto news

संबंधित बातम्या

पेट्रोलच्या भडक्यामुळे १००cc बाइक्सना सुवर्णदिवस! मुंबईत दर १०४ पार; ‘या’ गाड्यांमुळे महिन्याचे बजेट वाचणार
1

पेट्रोलच्या भडक्यामुळे १००cc बाइक्सना सुवर्णदिवस! मुंबईत दर १०४ पार; ‘या’ गाड्यांमुळे महिन्याचे बजेट वाचणार

आता तुफान चालणार BYD, फुल टँकमध्ये 1000km पेक्षा धावणार; Plug In हायब्रिड SUV; वैशिष्ट्ये वाचून व्हाल अवाक्
2

आता तुफान चालणार BYD, फुल टँकमध्ये 1000km पेक्षा धावणार; Plug In हायब्रिड SUV; वैशिष्ट्ये वाचून व्हाल अवाक्

नवीन Skoda Kushaq खरेदी करायची आहे? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI? खरेदीपूर्वी समजून घ्या संपूर्ण गणित
3

नवीन Skoda Kushaq खरेदी करायची आहे? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI? खरेदीपूर्वी समजून घ्या संपूर्ण गणित

Shah Rukh Khan ने खरेदी केली करोडो रुपयांची आलिशान Cadillac Escalade; फीचर्स पाहून व्हाल थक्क
4

Shah Rukh Khan ने खरेदी केली करोडो रुपयांची आलिशान Cadillac Escalade; फीचर्स पाहून व्हाल थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.