Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BYD ची नवी लक्झरी ई-कार!  टोयोटा वेलफायरला टक्कर देण्यासाठी BYD ची लक्झरी MPV ‘Denza D9’ यंदाच्या दिवाळीत भारतात होणार लाँच

बीवायडी कंपनी आपली लक्झरी ब्रँड 'डेन्झा डी९' एमपीव्ही गाडी या दिवाळीच्या सुमारात भारतात लाँच करण्याची शक्यता आहे. ही गाडी इलेक्ट्रिक आणि प्लग-इन हायब्रिड व्हर्जनमध्ये उपलब्ध असून टोयोटा वेलफायरला थेट टक्कर देईल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 05, 2026 | 05:40 PM
BYD ची नवी लक्झरी ई-कार!  टोयोटा वेलफायरला टक्कर देण्यासाठी BYD ची लक्झरी MPV ‘Denza D9’ यंदाच्या दिवाळीत भारतात होणार लाँच
Follow Us
Follow Us:
  • बीवायडीचा प्रीमियम ब्रँड ‘डेन्झा डी९’ दिवाळीच्या सणासुदीत भारतात लाँच होण्याची जोरदार शक्यता आहे.
  • या लक्झरी एमपीव्हीमध्ये व्हीआयपी कॅप्टन सीट्स, मेमरी फंक्शन्स आणि स्वतंत्र एंटरटेनमेंट स्क्रीन मिळतात.
  • इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये १०३ kWh बॅटरी असून एका चार्जवर ६०० किमीपेक्षा जास्त रेंज मिळते

बीवायडी भारतीय बाजारपेठेत आपला प्रीमियम ब्रँड ‘डेन्झा’ सादर करण्याच्या तयारीत आहे. या ब्रँडची ‘D9’ ही लक्झरी एमपीव्ही भारतात लाँच होणारी पहिली गाडी ठरू शकते. एका रिपोर्टनुसार, ही कार या वर्षीच्या दिवाळीच्या सणासुदीच्या काळात भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. तसेच, २०२७ च्या सुरुवातीला होणाऱ्या ‘भारत मोबिलिटी ग्लोबल एक्स्पो’ मध्ये देखील तिचे अधिकृत पदार्पण होऊ शकते.

भारतीय बाजारासाठी डेन्झा डी९ च्या इलेक्ट्रिक व्हर्जनला पहिले प्राधान्य दिले जात असून, नंतर तिचे प्लग-इन हायब्रिड व्हर्जन देखील सादर केले जाऊ शकते. भारतीय बाजारात ही गाडी प्रामुख्याने टोयोटा वेलफायर आणि एमजी एम९ सारख्या लक्झरी गाड्यांशी स्पर्धा करेल.

डेन्झा ब्रँडचा प्रवास ‘डेन्झा’ची स्थापना २०१० मध्ये बीवायडी आणि मर्सिडीज-बेंझ यांच्या संयुक्त विद्यमाने चीनमध्ये प्रीमियम इलेक्ट्रिक वाहने तयार करण्यासाठी करण्यात आली होती. हळूहळू बीवायडीने यातील आपला हिस्सा वाढवला आणि २०२४ मध्ये या ब्रँडची पूर्ण मालकी मिळवली. मालकी बदलली असली तरी, मर्सिडीज-बेंझ अजूनही तंत्रज्ञान आणि डिझाइनमध्ये सहकार्य करत आहे.

Ather ची इलेक्ट्रिकल मोटरसायकल २०२८ च्या ही नंतर लांबणीवर; कंपनीचे ‘EL’ स्कूटर प्लॅटफॉर्मवर जास्त लक्ष केंद्रित

आकार आणि डिझाइन डेन्झा डी९ ही एक मोठी आणि अलिशान एमपीव्ही आहे. तिची लांबी सुमारे ५,२५० मिमी, रुंदी १,९६० मिमी, उंची १,९२० मिमी आणि व्हीलबेस ३,११० मिमी आहे. या मोठ्या आकारामुळे गाडीत प्रचंड जागा मिळते.

केबिन आणि वैशिष्ट्ये

  • ३-रो, ७-सीटर लेआउट: गाडीत तीन रांगांमध्ये ७ जणांच्या बसण्याची व्यवस्था आहे.
  • व्हीआयपी सेकंड रो: दुसऱ्या रांगेतील कॅप्टन सीट्स हे या गाडीचे सर्वात मोठे आकर्षण आहे. यात व्हेन्टीलेशन, हिटींग, मसाज फंक्शन, लेग रेस्ट आणि मेमरी सेटींग्ज यांसारख्या अत्याधुनिक सुविधा मिळतात.
  • मागील प्रवाशांसाठी मनोरंजन: मागच्या रांगेतील प्रवाशांसाठी स्वतंत्र एंटरटेनमेंट स्क्रीन, फोल्ड-आऊट टेबल आणि प्रीमियम ऑडिओ सिस्टम देण्यात आली आहे.
  • इतर फीचर्स: फिरणारी मोठी मध्यवर्ती टचस्क्रीन, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरॅमिक सनरूफ, वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, पॉवर्ड स्लायडिंग doors, थ्री-झोन क्लायमेट कंट्रोल आणि लेव्हल-२ ADAS यांसारखे फीचर्स यात मिळतील.
Bridgestone India: ब्रिजस्टोन इंडियाच्या भारतातील ३० वर्षांचा यशस्वी प्रवास; नवी दिल्लीत भव्य सोहळ्यात भागीदारांचा सत्कार

पावरट्रेन, बॅटरी आणि परफॉर्मन्स

  • इलेक्ट्रिक व्हेरियंट: परदेशात ही कार फ्रंट-व्हील-ड्राइव्ह आणि ऑल-व्हील-ड्राइव्ह या दोन्ही प्रकारांत उपलब्ध आहे. तिची ड्युअल-मोटर फ्लॅगशिप आवृत्ती ३६९ bhp पॉवर आणि ४७० Nm टॉर्क जनरेट करते, ज्यामुळे गाडी ६.९ सेकंदात ० ते १०० किमी/तास वेग पकडू शकते. यात बीवायडीची १०३ kWh ची ब्लेड बॅटरी वापरण्यात आली आहे, जी एका फुल चार्जवर ६०० किमीपेक्षा जास्त रेंज देते. यामध्ये फास्ट डीसी चार्जिंग आणि व्हेईकल-टू-लोड फीचर्स देखील आहेत.
  • हायब्रिड व्हेरियंट: या मॉडेलमध्ये १.५-लीटर टर्बो-पेट्रोल इंजिनसह प्लग-इन हायब्रिड सिस्टम मिळते. याची एकत्रित पॉवर ४०० bhp पेक्षा जास्त आहे. बॅटरी आणि इंधन टँक दोन्ही पूर्ण वापरल्यास ही गाडी १,००० किमीपेक्षा जास्त अंतर कापण्याची क्षमता ठेवते.

Web Title: Byd denza d9 luxury mpv launch diwali india auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • SUV cars

संबंधित बातम्या

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी
1

मारुती सुझुकीचा मोठा टप्पा! इन-प्लांट रेल्वे सायडिंगमधून 10 लाख वाहनांची केली डिलिव्हरी

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स
2

टाटा सिएरा Legend Series लाँच; किंमत 11.99 लाखांपासून, मिळणार प्रीमियम फीचर्स

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही
3

कावासाकीची नवी Eliminator 500 SE! ब्लॅक लूकसह दमदार क्रूझरची एंट्री; जाणून घ्या फीचर्स आणि बरंच काही

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये
4

हिरोच्या नवीन बाइक्सची तयारी! XPulse 421 पासून Karizma XMR 250 पर्यंत, जाणून घ्या डिटेल मध्ये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.