Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कारच्या वायपर’चा शोध लावला होता या महिलेने! ही आहे‘मेरी अँडरसन’ यांच्या क्रांतिकारी शोधाची गोष्ट

सन १९०२ मधील एका बर्फाच्या वादळातील प्रवासादरम्यान ट्राम(बस) चालकाची होणारी कसरत पाहून मेरी अँडरसन यांनी गाडीच्या आतूनच काच साफ करणाऱ्या 'विंडशील्ड वायपर'चा क्रांतिकारी शोध लावला.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 02, 2026 | 11:46 PM
‘कारच्या वायपर’चा शोध लावला होता या महिलेने! ही आहे‘मेरी अँडरसन’ यांच्या क्रांतिकारी शोधाची गोष्ट
Follow Us
Follow Us:

आज आपण मुसळधार पावसातही कार अगदी बिनधास्तपणे चालवू शकतो, याचे श्रेय जाते कारच्या काचेवर फिरणाऱ्या त्या दोन छोट्या वायपर ब्लेड्सना. पण तुम्हाला माहीत आहे का, की जगभरातील कोट्यवधी वाहनचालकांचा प्रवास सुरक्षित करणाऱ्या या ‘विंडशील्ड वायपर’चा शोध एका महिलेने लावला होता? होय, त्या धाडसी आणि कल्पक महिलेचे नाव होते मेरी अँडरसन जाणून घेऊया त्यांची ही रंजक गोष्ट,

बर्फाच्या वादळातील तो प्रवास…

गोष्ट आहे १९०२ मधील. मेरी अँडरसन या अमेरिकेतील अलाबामा येथील रहिवासी होत्या. हिवाळ्याच्या दिवसांत त्या न्यूयॉर्क शहरात फिरायला गेल्या होत्या. तिथे प्रवास करत असताना अचानक प्रचंड बर्फवृष्टी सुरू झाली. मेरी यांनी पाहिले की, समोरच्या काचेवर बर्फ जमा झाल्यामुळे ट्राम (एका प्रकारची बस) चालकाला रस्ता दिसणे कठीण झाले होते. तो चालक दर दोन मिनिटांनी गाडी थांबवून, खाली उतरून हाताने काचेवरील बर्फ साफ करत होता. कधीकधी तर रस्ता दिसावा म्हणून तो गाडीची समोरची काच उघडी ठेवूनच गाडी चालवत होता, ज्यामुळे आत बसलेल्या प्रवाशांना गारठवून टाकणारा थंड वारा सोसावा लागत होता.

हिरो होंडा च्या या ५ ऐतिहासिक जुन्या बाईक तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या

डोक्यात आली अनोखी कल्पना

चालकाची ही कसरत पाहून मेरी यांच्या डोक्यात विचार आला, “असे काही साधन का असू नये, जे गाडीच्या आत बसूनच काच साफ करू शकेल?” न्यूयॉर्कवरून परत आल्यानंतर त्यांनी लगेचच यावर काम सुरू केले. त्यांनी एका अशा साधनाचा आराखडा तयार केला, ज्यामध्ये गाडीच्या आत एक ‘लिव्हर’ असेल आणि ते फिरवल्यास बाहेर काचेवर बसवलेले रबरचे ब्लेड फिरून काच साफ करेल. म्हणजेच, चालकाला गाडीबाहेर पडण्याची अजिबात गरज नव्हती!

१७ वर्षे आधीच लागला शोध, पण…

१९०३ मध्ये मेरी अँडरसन यांनी या उपकरणाचे पेटंट स्वतःच्या नावावर केले. दुर्दैवाने, त्या काळात लोकांनी त्यांच्या या शोधाची किंमत ओळखली नाही. एका मोठ्या कॅनेडियन कंपनीने तर “या साधनाचा चालकांना काहीही फायदा होणार नाही, उलट त्यांचे लक्ष विचलित होईल,” असे म्हणून हा शोध नाकारला. १९२० मध्ये त्यांचे पेटंट संपले.

बजाज ‘एम-८०’ ची यशोगाथा! मध्यमवर्गीयांच्या प्रगतीचे चाक आणि ग्रामीण भारताची ‘लाईफलाईन’!

पुढे ऑटोमोबाईल उद्योगाची झपाट्याने वाढ झाली. १९२२ मध्ये कॅडिलॅक ही कार कंपनी आपल्या गाड्यांमध्ये वायपर स्टँडर्ड फीचर म्हणून देणारी पहिली कंपनी बनली. मेरी यांना त्यांच्या या शोधासाठी हक्काचे पैसे किंवा मोठे व्यावसायिक यश मिळाले नसले, तरी ड्रायव्हिंगच्या इतिहासात त्यांचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदवले गेले. आज प्रत्येक कारमधील वायपर मेरी अँडरसन यांच्या क्रांतिकारी विचाराची साक्ष देतो!

Web Title: Car wiper invention history automobile news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 11:46 PM

Topics:  

  • automobile
  • Car

संबंधित बातम्या

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स
1

ट्रायम्फच्या 3 बाइक्सचा नवा अवतार! Tiger 1200, Tiger 900 आणि Street Triple 798 मध्ये मोठे अपडेट्स

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु
2

MG Hector च्या दोन नवीन एडिशन लाँच! ब्लॅकस्टॉर्म आणि स्नोस्टॉर्मची किंमत १९.९९ लाख रुपयांपासून सुरु

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये
3

मिनी कूपर ऑक्सफर्ड एडिशनसाठी प्री-लाँच बुकिंग सुरू; Union Jack लूकसह मिळणार खास फीचर्स! जाणून घ्या डिटेल मध्ये

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट
4

 10 वर्षांची बॅटरी वॉरंटी आणि सिंगल चार्जमध्ये 159 किमी रेंज! डेली यूजसाठी Ather ची ही इलेक्ट्रिक स्कूटर आहे बेस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.