Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 2 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कारचा ‘वायपर’ चालू केल्यावर खडखड आवाज येतोय? घरच्या घरी करा ‘हे’ सोपे उपाय!

उन्हामुळे कडक झालेले रबर किंवा काचेवरील घाणीमुळे पावसाळ्यात कारचे वायपर 'खडखड' आवाज करतात, जे रबिंग अल्कोहोल, बेकिंग सोडा किंवा वॉशर फ्लुइड वापरून घरच्या घरी ठीक करता येते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 02, 2026 | 11:34 PM
कारचा ‘वायपर’ चालू केल्यावर खडखड आवाज येतोय? घरच्या घरी करा ‘हे’ सोपे उपाय!
Follow Us
Follow Us:

पावसाळ्यात ड्रायव्हिंग करताना कारचे वायपर्स सर्वात महत्त्वाचे असतात. पण अनेकदा वायपर चालू केल्यावर काचेवर ते गुळगुळीत फिरण्याऐवजी ‘खडखड’ असा वैतागवाडा आवाज करतात. यामुळे केवळ ड्रायव्हिंग करताना लक्ष विचलित होत नाही, तर कारच्या मुख्य काचेवर कायमचे ओरखडे पडण्याची भीती असते. चला तर मग जाणून घेऊया हा आवाज नेमका का येतो आणि तो घरच्या घरी कसा बंद करायचा ते,

वायपर खडखड आवाज का करतात?

१. सुखलेले किंवा कडक झालेले रबर: उन्हामुळे वायपरचे रबर कडक होते. त्यामुळे ते काचेवर व्यवस्थित घासले न जाता अडखळत फिरते.

२. काचेवरील घाण किंवा ऑईल: हवेतील प्रदूषण, झाडांचा चीक किंवा रस्त्यावरील ऑईल काचेवर जमा झाल्यामुळे वायपर सुरळीत फिरत नाही.

३. चुकीचे फिटिंग: वायपरची फ्रेम किंवा ब्लेड काचेच्या कोनात अचूक बसले नसतील, तर असा आवाज येतो.

भारताचे लायसन्स घेऊन तुम्ही कोणत्या देशांमध्ये गाडी चालवू शकता? इंटरनॅशनल लायसन्स काढण्याची सोपी ऑनलाईन पद्धत काय आहे?

घरच्या घरी आवाज बंद करण्याचे सोपे उपाय

१. वायपर ब्लेड्स आणि काच स्वच्छ करा: सर्वात आधी एका सुती कपड्यावर थोडे ‘रबिंग अल्कोहोल’ किंवा घरात वापरले जाणारे ‘कोलिन’ घ्या आणि वायपरचे रबर व कारची काच नीट पुसून घ्या. यामुळे रबरवर साचलेली सगळी काळी घाण निघून जाईल.

२. बेकिंग सोडा मॅजिक: एका ओल्या कपड्यावर थोडा बेकिंग सोडा घ्या आणि तो वायपरच्या रबर ब्लेडवर हलक्या हाताने चोळा. त्यानंतर पाण्याने ते धुवून घ्या. यामुळे रबर मऊ होण्यास मदत होते.

३. विंडशील्ड वॉशर फ्लुइडचा वापर: वायपरच्या टाकीत नुसते साधे पाणी न टाकता ‘विंडशील्ड वॉशर लिक्विड’ किंवा कार शॅम्पू वापरा. यामुळे काचेवर वंगण तयार होते आणि वायपर न अडकता फिरतात.

नवीन गाड्यांच्या लाँचच्या जोरावर रेनॉल्ट आणि निस्सानच्या विक्रीत जून महिन्यात मोठी वाढ!

काचेवरील ओरखडे कसे टाळावे?

१.सुक्या काचेवर वायपर फिरवू नका: काचेवर धूळ असताना कधीही सुके वायपर चालू करू नका. आधी वॉशर स्प्रे मारून काच ओली करा आणि मगच वायपर चालू करा.

२.दरवर्षी वायपर बदला: वायपरचे रबर दर ६ ते १२ महिन्यांनी किंवा प्रत्येक पावसाळ्याच्या सुरुवातीला आवर्जून बदलले पाहिजेत.

३.उन्हात कार पार्क करताना काळजी घ्या: उन्हाळ्यात कार पार्क करताना वायपर नेहमी उभे करून ठेवा, जेणेकरून गरम काचेमुळे रबर वितळणार किंवा कडक होणार नाही.

जर हे सगळे उपाय करूनही आवाज बंद होत नसेल, तर वायपरचे ब्लेड पूर्णपणे खराब झाले आहेत हे समजून ते लगेच बदलून घ्या. अवघ्या २०० ते ५०० रुपयांच्या वायपरसाठी कारची हजारो रुपयांची काच खराब होऊ देऊ नका!

Web Title: Car wiper tips automobile news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 11:34 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

नवीन गाड्यांच्या लाँचच्या जोरावर रेनॉल्ट आणि निस्सानच्या विक्रीत जून महिन्यात मोठी वाढ!
1

नवीन गाड्यांच्या लाँचच्या जोरावर रेनॉल्ट आणि निस्सानच्या विक्रीत जून महिन्यात मोठी वाढ!

किया इंडियाची ऐतिहासिक कामगिरी! जून महिन्यात २४,५५२ गाड्यांची विक्री करत नोंदवला नवा उच्चांक
2

किया इंडियाची ऐतिहासिक कामगिरी! जून महिन्यात २४,५५२ गाड्यांची विक्री करत नोंदवला नवा उच्चांक

अँब्यूलन्स किंवा फायर ब्रिगेडची गाडी चालवायची आहे? फक्त ड्रायव्हिंग लायसन्स पुरेसे नाही; ‘बॅज’ आणि विशेष प्रशिक्षण ही आवश्यक आहे!
3

अँब्यूलन्स किंवा फायर ब्रिगेडची गाडी चालवायची आहे? फक्त ड्रायव्हिंग लायसन्स पुरेसे नाही; ‘बॅज’ आणि विशेष प्रशिक्षण ही आवश्यक आहे!

भारताचे लायसन्स घेऊन तुम्ही कोणत्या देशांमध्ये गाडी चालवू शकता? इंटरनॅशनल लायसन्स काढण्याची सोपी ऑनलाईन पद्धत काय आहे?
4

भारताचे लायसन्स घेऊन तुम्ही कोणत्या देशांमध्ये गाडी चालवू शकता? इंटरनॅशनल लायसन्स काढण्याची सोपी ऑनलाईन पद्धत काय आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.