परदेशात पर्यटन, शिक्षण, नोकरी किंवा व्यावसायिक कारणांसाठी जाणाऱ्या अनेक भारतीयांना एक प्रश्न नेहमी पडतो कि भारतातील ड्रायव्हिंग लायसन्स परदेशात चालते का? याचे उत्तर आहे ‘होय’, पण काही अटींसह आहे. काही देश भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स मर्यादित कालावधीसाठी स्वीकारतात, तर अनेक देशांमध्ये इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट (IDP) आवश्यक असते. त्यामुळे परदेशात वाहन चालवण्यापूर्वी संबंधित देशाचे नियम जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
भारतीय लायसन्स कोणत्या देशांमध्ये मान्य आहे?
भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स इंग्रजी भाषेत असल्यास किंवा अधिकृत इंग्रजी अनुवाद उपलब्ध असल्यास काही देशांमध्ये ठरावीक कालावधीसाठी वाहन चालवण्याची परवानगी मिळू शकते. यामध्ये अमेरिका (काही राज्ये), युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, सिंगापूर, जर्मनी, स्वित्झर्लंड, नॉर्वे आणि फ्रान्ससारख्या देशांचा समावेश होतो. मात्र प्रत्येक देशातील नियम, वैधता कालावधी आणि विमा अटी वेगवेगळ्या असतात. त्यामुळे प्रवासापूर्वी त्या देशाच्या वाहतूक प्राधिकरणाची माहिती तपासणे आवश्यक आहे.
गाडीची चावी सारखी हरवतेय? हे आहेत ५ ऑटोमोबाइल टेकनॉलॉजीचे उपाय! आत्ताच जाणून घ्या
इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट (IDP) म्हणजे काय?
इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट म्हणजे भारतीय ड्रायव्हिंग लायसन्सचे आंतरराष्ट्रीय स्वरूपातील अधिकृत प्रमाणपत्र होय. हे स्वतंत्र लायसन्स नसून, तुमच्या वैध भारतीय ड्रायव्हिंग लायसन्ससोबत वापरावे लागते. अनेक देशांमध्ये वाहन भाड्याने घेण्यासाठी किंवा कायदेशीररीत्या वाहन चालवण्यासाठी IDP आवश्यक असते.
इंटरनॅशनल लायसन्स काढण्याची ऑनलाईन पद्धत
भारत सरकारच्या Parivahan Sewa पोर्टलद्वारे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिटसाठी अर्ज करता येतो.
अर्ज करण्यासाठी पुढील प्रक्रिया पूर्ण करा:
अर्ज करण्यापूर्वी लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिटसाठी भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स वैध असणे आवश्यक आहे. लायसन्स निलंबित किंवा कालबाह्य असल्यास अर्ज स्वीकारला जात नाही. तसेच प्रत्येक देशातील वाहतूक नियम, विमा अटी, वाहन चालवण्याचे वय आणि रस्ते नियम वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे प्रवासापूर्वी संबंधित देशाची अधिकृत माहिती तपासणे गरजेचे आहे.
परदेशात वाहन चालवण्याचा विचार करत असाल, तर केवळ भारतीय ड्रायव्हिंग लायसन्स पुरेसे आहे का, की इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट आवश्यक आहे, हे आधीच तपासा. योग्य कागदपत्रे आणि नियोजन असल्यास परदेशातील प्रवास अधिक सुरक्षित, कायदेशीर आणि आनंददायी ठरू शकतो.






