फोटो सौजन्य: iStock
उन्ह्याळाच्या दिवसात आपल्या सगळ्यांनाच घामाच्या धारा लागतात. या मोसमात, जसे आपण स्वतःची काळजी घेतो तसेच आपल्या कारची काळजी घेणे सुद्धा महत्वाचे आहे. भर उन्हात आपली कार तापत असते. यामुळे कारचे इंजिन देखील गरम होत असते. याचा परिणाम कारच्या परफॉर्मन्सवर देखील होतो.
उन्हाळ्यात, अनेक लोकांच्या गाड्यांचे इंजिन एवढे गरम होतात की ते काम करणेच थांबवतात. यामुळे कार चालकांना अनेक प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागते. एवढेच नाही तर जर इंजिन जास्त गरम झाले तर ते सीझ देखील होऊ शकते, जे तुमच्यासाठी खूप त्रासदायक देखील ठरेल. म्हणूनच तुमच्या कारचे इंजिन जास्त गरम होण्यापासून तुम्ही कसे थांबवू शकता आणि ते थंड कसे ठेवू शकता, याबद्दल जाणून घेणार आहोत.
Maruti Suzuki च्या कार April 2025 पासून होणार अजूनच महाग, किमतीत होणार इतक्या टक्क्यांची वाढ
उन्हाळा सुरू होताच तुम्ही तुमच्या कारचे रेडिएटर आणि कूलंट लेव्हल नक्कीच तपासले पाहिजे. हे रेडिएटर कूलंट इंजिन थंड ठेवण्याचे काम करते. जर कुलेंट लेव्हल कमी झाली तर इंजिन जास्त गरम होण्याचा धोका वाढतो. म्हणून, उन्हाळ्यात तुम्ही नियमितपणे कुलेंट लेव्हल तपासले पाहिजे.
इंजिनमध्ये चांगले व्हेंटिलेशन राखण्यासाठी कारमधील हवेचा प्रवाह योग्य ठेवला पाहिजे. यासाठी, तुम्ही कारच्या बोनेटखाली कोणत्याही प्रकारची घाण किंवा कचरा साचू देऊ नये, कारण त्यामुळे हवेचा प्रवाह रोखू शकतो आणि त्यामुळे इंजिन जास्त गरम होऊ शकते.
अलिकडच्या काळात उत्पादित होणाऱ्या जवळजवळ सर्व वाहनांमध्ये इंजिन तापमानाचे निरीक्षण करण्यासाठी गेज दिले जाते. जर इंजिनचे तापमान गेजवर सामान्य दिसत असेल, तर ताबडतोब रस्त्याच्या कडेला वाहन थांबवा आणि ते थंड होण्यासाठी थोडा वेळ द्या. त्यानंतरच तुमचे वाहन पुन्हा सुरू करा.
Kia च्या ‘या’ नंबर 1 एसयूव्हीवर तब्बल 1.89 लाखांची सूट, आजच करून टाका बुक
उन्हाळ्यात, सर्व कार चालक उष्णतेपासून बचाव करण्यासाठी एसी वापरतात, परंतु त्याचा जास्त वापर केल्याने इंजिन जास्त गरम होण्याची समस्या उद्भवू शकते. जर तुम्ही कारने लांबचा प्रवास करत असाल, तर वेळोवेळी एअर कंडिशनर बंद करा. यामुळे इंजिनवर येणार दबाव कमी होतो.
उन्हाळ्यात तुमची कार व्यवस्थित चालावी म्हणून, तुम्ही नियमितपणे ब्रेक आणि इंजिनची सर्व्हिसिंग करून घेतली पाहिजे. तुम्ही तुमच्या कारची योग्य काळजी घेतल्यास ते जास्त गरम होण्याची समस्या कमी करता येते.