फोटो सौजन्य: Social Media
भारतात अनेक उत्तम कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या बेस्ट कार ऑफर करत असतात. यातही जास्तीतजास्त ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक कंपन्या बेस्ट ऑफर्स देत असतात. आता अशीच एक ऑफर किया मोटर्स आपल्या एका कारवर देत आहे.
किया मोटर्सने देशात अनेक उत्तम कार्स ऑफर केल्या आहेत. ग्राहकांची मागणी आणि आवश्यकता समजून कंपनीने नेहमीच ग्राहकांना एक उत्तम कार देण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्ही नवीन किया कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर मार्च 2025 तुमच्यासाठी एक महत्वाचा महिना ठरणार आहे. याचे कारण म्हणजे किया त्यांच्या लोकप्रिय मॉडेल सेल्टोसवर बंपर डिस्काउंट ऑफर करत आहे. किआ सेल्टोस सध्या 1.89 लाख रुपयांच्या सवलतीसह उपलब्ध आहे. कंपनी कोणत्या कारवर किती सूट देत आहे त्याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया.
आरारारा किती वाईट ! दमदार फीचर्स असून देखील ‘या’ SUV ला फक्त दोन ग्राहकांनी केले खरेदी
किआ सेल्टोस टर्बो पेट्रोल वर 25,000 रुपये कॅश डिस्काउंट, 80,000 रुपये एक्सचेंज बोनस, 20,000 रुपये स्क्रॅपेज बोनस आणि 64,000 रुपये लॉयल्टी डिस्काउंट मिळतो. यामुळे, या कारवर एकूण 1,89,000 रुपये डिस्काउंट मिळते.
किआ सेल्टोस डीजल वर 30,000 रुपये कॅश डिस्काउंट, 70,000 रुपये एक्सचेंज बोनस, 20,000 रुपये स्क्रॅपेज बोनस आणि 64,000 रुपये लॉयल्टी डिस्काउंट मिळतो. यामुळे एकूण 1,84,000 रुपये डिस्काउंट मिळते.
किआ सेल्टोस नॉर्मल पेट्रोल वर २०,००० रुपये कॅश डिस्काउंट, 20,000 रुपये स्क्रॅपेज बोनस, आणि 56,000 रुपये लॉयल्टी डिस्काउंट मिळतो. यामुळे ग्राहकांना एकूण 96,000 रुपयांचे डिस्काउंट मिळणार आहे.
हे सर्व डिस्काउंट्स किया सेल्टोसच्या 2024 मॉडेलसाठी उपलब्ध आहेत आणि ही ऑफर मार्च 2025 पर्यंत चालू राहील.
होळीच्या धुंदीत ‘या’ राज्यातील लोकांनी Traffic Rules ला बसवले धाब्यावर, पोलिसांनी लावला हजारोंचा दंड
मार्च 2025 मध्ये किया सेल्टोस 2025 मॉडेलसाठी दिलेल्या सवलतीमध्ये विविध पर्याय उपलब्ध आहेत. किया सेल्टोस डिझेल वर 10,000 रुपये कॅश डिस्काउंट, जुन्या कारच्या एक्स-शोरूम किमतीच्या 1.5% अतिरिक्त बोनस म्हणून 20,000 रुपये स्क्रॅपेज डिस्काउंट, आणि 25,000 रुपये लॉयल्टी डिस्काउंट मिळते. यामुळे एकूण 55,000 रुपये कमाल सवलत मिळते.
किआ सेल्टोस टर्बो पेट्रोल साठीही 10,000 रुपये कॅश डिस्काउंट, 20,000 रुपये स्क्रॅपेज डिस्काउंट आणि 25,000 रुपये लॉयल्टी सवलत उपलब्ध आहे. यामुळे एकूण 55,000 रुपये कमाल सवलत मिळते.
किआ सेल्टोस नॉर्मल पेट्रोलसाठी 10,000 रुपये कॅश डिस्काउंट, 20,000 रुपये स्क्रॅपेज डिस्काउंट आणि 22,000 रुपये लॉयल्टी डिस्कॉऊंट मिळते. यामुळे एकूण 52,000 रुपये डिस्काउंट मिळते. हे सर्व डिस्कॉउंट्स मार्च 2025 पर्यंत उपलब्ध आहेत.