फोटो सौजन्य: iStock
भारतात अनेक मोठे ऑटो ब्रँड्स आपल्या उत्तम कार ऑफर करत असतात, पण त्यात मारुती सुझुकीचे नाव विशेष महत्त्वाचे आहे. कंपनीने नेहमीच ग्राहकांसाठी बजेट-फ्रेंडली आणि उत्तम गुणवत्ता असलेल्या कार ऑफर केल्या आहेत. यामुळे ग्राहक नवीन कार खरेदी करताना मारुतीच्या कारचा विचार करतात.
मारुतीच्या विविध मॉडेल्सनी भारतीय बाजारात एक विशिष्ट स्थान मिळवले आहे. आता, मारुती सुझुकी आपल्या कारच्या किमती वाढवण्याची तयारी करत आहे. यामुळे ग्राहकांवर किमतींचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे, आणि त्यामुळे ग्राहकांच्या खरेदी निर्णयावर काही प्रभाव पडू शकतो.
मार्केटमधील दजेदार कार Hyundai Creta फक्त 2 लाखात होईल तुमची, ‘एवढा’ असेल EMI ?
मारुती सुझुकीच्या कार आणखी महाग होणार आहेत. कंपनी एप्रिल 2025 पासून पुन्हा एकदा त्यांच्या वाहनांच्या किमती वाढवणार आहे. यावेळीही कंपनी त्यांच्या वाहनांच्या किमतीत 4% पर्यंत वाढ करणार आहे. देशातील सर्वात मोठ्या आणि विश्वासू कार उत्पादक कंपनीने याबद्दल माहिती दिली. कंपनीने म्हटले आहे की वाहनांच्या किमती 4 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात आणि हे मॉडेलनुसार बदलू शकते.
मारुती सुझुकीने वाहनांच्या किमती वाढवण्यामागील कारण स्पष्ट करताना म्हटले आहे की, कंपनी सतत खर्च कमी करण्यासाठी आणि ग्राहकांवर होणारा परिणाम कमीत कमी करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असते, परंतु वाढीव किमतीचा काही भाग बाजारात ट्रान्स्फर करावा लागू शकतो. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती आणि ऑपरेशनल खर्चामुळे कारच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे मारुती सुझुकी इंडियाने म्हटले आहे.
कोणत्या मॉडेल्सच्या किमतींमध्ये सर्वात जास्त वाढ होईल हे कंपनीने स्पष्ट केलेले नाही. मारुती भारतीय बाजारात एंट्री-लेव्हल हॅचबॅकपासून ते प्रीमियम एसयूव्हीपर्यंतच्या कार ऑफर करते.
भारतात 4 लाखात मिळणारी कार पाकिस्तानात 23 लाखात मिळतेय, जाणून घ्या Swift, Wagon R ची किंमत
कंपनीने आधीच किंमत 4% ने वाढवली आहे. कंपनीने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये याची घोषणा केली होती आणि जानेवारीमध्ये ती अंमलात आणण्यात आली. या काळात वेगवेगळ्या मॉडेल्सच्या किमती 1500 रुपयांपासून 32,500 रुपयांपर्यंत वाढवण्यात आल्या. त्याचप्रमाणे फेब्रुवारी 2025 मध्येही वाहनांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.
देशातील सर्वात मोठी वाहन निर्माता कंपनी मारुती सुझुकी सध्या भारतीय बाजारात एस-प्रेसो, स्विफ्ट, बलेनो, इको, सेलेरियो, वॅगन आर,सियाझ, ग्रँड विटारा, एक्सएल६, इग्निस,डिझायर, फ्रॉन्क्स, ब्रेझा, एर्टिगा, जिमनी आणि इन्व्हिक्टो या कारसाठी अल्टो के10 ऑफर करते.