Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

CNG Cars India: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे टेन्शन विसरा! ‘या’ ५ सीएनजी कार देतात जबरदस्त मायलेज; बजेटमध्ये होणार मोठी बचत

CNG Cars India: पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांपासून सुटका मिळवण्यासाठी सीएनजी कार हा सर्वोत्तम पर्याय आहे. भारतात सर्वाधिक मायलेज देणाऱ्या मारुती वॅगनआर, टाटा पंच आणि डिझायर सीएनजी कारच्या किमती आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 22, 2026 | 06:11 PM
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे टेन्शन विसरा! (Photo Credit- X)

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे टेन्शन विसरा! (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:
  • पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचे टेन्शन विसरा!
  • ‘या’ ५ सीएनजी कार देतात जबरदस्त मायलेज
  • बजेटमध्ये होणार मोठी बचत
CNG Cars India News: देशात सातत्याने वाढणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर सामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा कात्री लावत आहेत. इंधनाच्या या वाढत्या खर्चामुळे हैराण झालेले ग्राहक आता मोठ्या संख्येने सीएनजी (CNG) कार खरेदी करण्याकडे वळत आहेत. सीएनजी गाड्यांमुळे प्रति किलोमीटर येणारा प्रवासाचा खर्च कमालीचा कमी होतो, तसेच दैनंदिन वापरासाठी या गाड्या अत्यंत फायदेशीर ठरतात. सध्या वाहन बाजारामध्ये हॅचबॅकपासून (Hatchback) ते अगदी सेडान (Sedan) आणि एसयूव्ही (SUV) प्रकारातील अनेक बजेट फ्रेंडली सीएनजी कारचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. जर तुम्हीही कमी खर्चात जास्त मायलेज देणारी कार शोधत असाल, तर खालील ५ सीएनजी कार तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतात.

१. मारुति एस-प्रेसो: कमी बजेट असणाऱ्यांसाठी सर्वोत्तम (Maruti S-Presso CNG)

देशातील सर्वात स्वस्त आणि परवडणाऱ्या सीएनजी कारच्या यादीत ‘मारुति सुझुकी’ (Maruti Suzuki) कंपनीची ‘एस-प्रेसो सीएनजी’ आघाडीवर आहे. या कारची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत ४.६२ लाख रुपयांपासून सुरू होते. यात ग्राहकांना १.० लीटरचे इंजिन मिळते, जे ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. कंपनीच्या दाव्यानुसार, ही कार प्रति किलो सीएनजीवर ३२.७३ किलोमीटर इतके जबरदस्त मायलेज देते. शहरात दैनंदिन प्रवासासाठी आणि कमी बजेट असणाऱ्या ग्राहकांसाठी हा एक उत्तम पर्याय आहे. याशिवाय, याच रेंजमध्ये कंपनीची ‘अल्टो के१० सीएनजी’ (Alto K10 CNG) देखील उपलब्ध आहे.

२. मारुति वॅगनआर: मायलेजची खरी बादशहा (WagonR CNG)

भारतीय कुटुंबांची पहिली पसंती असलेली ‘मारुति सुझुकी वॅगनआर’ (WagonR) तिच्या सीएनजी मॉडेलमुळे नेहमीच प्रचंड मागणीत असते. या कारची सुरुवातीची किंमत ५.८९ लाख रुपये आहे. मायलेजच्या बाबतीत ही कार देशातील सर्वोत्तम गाड्यांपैकी एक असून, ती प्रति किलो सीएनजीवर तब्बल ३४.०५ किलोमीटर धावू शकते. मोठा केबिन स्पेस, उत्तम लेगरूम आणि कमी मेंटेनन्स खर्च यामुळे वॅगनआर सीएनजी ग्राहकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे.

पहिल्यांदाच कार विकत घेताय? मग ‘या’ टिप्स नक्की लक्षात ठेवा !

३. टाटा टियागो: बजेट कारमध्ये ‘एएमटी’चा प्रिमियम फील (Tata Tiago CNG)

सुरक्षिततेला प्राधान्य देणाऱ्या आणि टाटा मोटर्सचे (Tata Motors) चाहते असणाऱ्यांसाठी ‘टाटा टियागो सीएनजी’ हा एक उत्तम पर्याय आहे. या कारची सुरुवातीची किंमत ५.४९ लाख रुपये आहे. या कारचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात मॅन्युअल गिअरबॉक्ससोबतच ‘एएमटी’ (AMT – ऑटोमॅटिक) गिअरबॉक्सचा पर्यायही मिळतो, जो सहसा या बजेटमधील सीएनजी गाड्यांमध्ये पाहायला मिळत नाही. ही कार प्रति किलो सीएनजीवर २६.४९ किलोमीटर इतके मायलेज देते.

४. मारुति डिझायर: सेडान प्रकारातील राजा (Maruti Dzire CNG)

जर तुम्हाला आलिशान आणि सेडान (Sedan) प्रकारातील कार आवडत असेल, तर मारुति सुझुकीची ‘डिझायर सीएनजी’ तुमच्यासाठी परफेक्ट आहे. या कारची सुरुवातीची किंमत ८.०३ लाख रुपये असून, कंपनीच्या दाव्यानुसार ही कार प्रति किलो सीएनजीवर ३३.७३ किलोमीटर इतके शानदार मायलेज देते. लूक, कम्फर्ट आणि मायलेजचे उत्तम समीकरण या कारमध्ये पाहायला मिळते.

५. टाटा पंच: एसयूव्ही प्रेमींसाठी जबरदस्त पर्याय (Tata Punch CNG)

एसयूव्ही (SUV) गाड्यांची आवड असणाऱ्या ग्राहकांसाठी ‘टाटा पंच सीएनजी’ हा एक अतिशय आकर्षक आणि सुरक्षित पर्याय ठरत आहे. या मायक्रो-एसयूव्हीची सुरुवातीची किंमत ६.७४ लाख रुपये आहे. या कारचे खास वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये टाटाची प्रगत ‘ड्यूल-सिलेंडर तंत्रज्ञान’ (Twin Cylinder Technology) वापरण्यात आली आहे. यामुळे सीएनजी सिलेंडर असूनही गाडीमध्ये सामान ठेवण्यासाठी पुरेसा बूट स्पेस (Boot Space) मिळतो.

अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स

Web Title: Cng cars india these 5 cng cars offer impressive mileage save big on your budget

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 06:10 PM

Topics:  

  • auto news
  • Car
  • CNG

संबंधित बातम्या

अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स
1

अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स

कार खरेदीदारांना मोठा झटका! ‘या’ तारखेपासून मारुति सुझुकीच्या गाड्या महागणार; किमतीत तब्बल ३०,००० रुपयांपर्यंत वाढ
2

कार खरेदीदारांना मोठा झटका! ‘या’ तारखेपासून मारुति सुझुकीच्या गाड्या महागणार; किमतीत तब्बल ३०,००० रुपयांपर्यंत वाढ

6 Airbags : फक्त मोठी स्क्रीन आणि लूक कशासाठी? कार खरेदी करताना ‘हे’ प्रगत सुरक्षा तंत्रज्ञान देईल तुमच्या कुटुंबाला कवच
3

6 Airbags : फक्त मोठी स्क्रीन आणि लूक कशासाठी? कार खरेदी करताना ‘हे’ प्रगत सुरक्षा तंत्रज्ञान देईल तुमच्या कुटुंबाला कवच

Skoda Epiq ची ग्लोबल एंट्री! मिळणार दमदार रेंज, ADAS आणि प्रीमियम फीचर्स… जाणून घ्या किंमत
4

Skoda Epiq ची ग्लोबल एंट्री! मिळणार दमदार रेंज, ADAS आणि प्रीमियम फीचर्स… जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.