Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ट्रक ड्रायव्हर्सनी जन्माला घातलेलं हायवेवरचं ‘ढाबा कल्चर’! महामार्गांवरील ढाब्यांची अनोखी गोष्ट!

भारतीय महामार्गावरील ढाबे हे मूळचे ट्रक ड्रायव्हर्सच्या जेवणाची आणि विश्रांतीची गरज म्हणून सुरू झाले होते. आज हेच 'ढाबा कल्चर' आपल्या अस्सल चमचमीत जेवणामुळे पर्यटकांचे आणि फॅमिलीचे मुख्य आकर्षण बनले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 18, 2026 | 05:39 PM
ट्रक ड्रायव्हर्सनी जन्माला घातलेलं हायवेवरचं ‘ढाबा कल्चर’! महामार्गांवरील ढाब्यांची अनोखी गोष्ट!
Follow Us
Follow Us:

आज आपण वीकेंडला किंवा ट्रिपला जाताना हायवेवरच्या एखाद्या छानशा ढाब्यावर थांबून जेवण्याचा आनंद घेतो. उघड्या आकाशाखाली बसून, लाकडी खाटांवर (खाटली) आराम करत चमचमीत जेवण जेवणे हा एक वेगळाच अनुभव असतो. पण तुम्हाला माहीत आहे का? आज पर्यटकांसाठी मुख्य आकर्षण बनलेले हे ‘ढाबा कल्चर’  खरं तर भारतीय ट्रक ड्रायव्हर्सची गरज म्हणून सुरू झाले होते. हा प्रवास अत्यंत रंजक आणि भारतीय महामार्गांचे अर्थकारण बदलणारा आहे.

सुरुवात कशी झाली?

काही दशकांपूर्वी जेव्हा भारतात महामार्गांचे जाळे पसरत होते, तेव्हा ट्रक ड्रायव्हर्सना हजारो किलोमीटरचा प्रवास करावा लागायचा. दिवसा-रात्रीचा प्रवास, वेळेवर न मिळणारे जेवण आणि थकवा यामुळे ड्रायव्हर्स हैराण व्हायचे. अशा वेळी महामार्गांच्या कडेला काही स्थानिक लोकांनी छोटी-छोटी दुकाने थाटली. जिथे ड्रायव्हर्सना स्वस्त, ताजे आणि घरगुती पद्धतीचे जेवण मिळू लागले. हेच ते आपले मूळ ‘ढाबे’.

Women success story: भोपाळ ते हैदराबाद… देशातील पहिल्या महिला ट्रक ड्रायव्हरची पहिली संस्मरणीय कथा पहा एका क्लिकवर…

खाटली, सुस्तावणं आणि अस्सल जेवण

ढाब्याची खरी ओळख म्हणजे तिथली ‘खाट’ किंवा ‘खाटली’. अनेक तास सलग ड्रायव्हिंग केल्यावर ड्रायव्हर्सचे अंग मोडून यायचे. त्यामुळे ढाब्यांवर जेवणासोबतच विश्रांतीसाठी या विणलेल्या खाटा टाकल्या जाऊ लागल्या. जेवण येईपर्यंत तिथे पडणे, हातपाय मोकळे करणे आणि जेवण झाल्यावर तिथेच छोटीशी डुलकी काढणे, हा ड्रायव्हर्सच्या जीवनशैलीचा भाग बनला.

इथले जेवणही ड्रायव्हर्सच्या आवडीनुसार असायचे—भरपूर तेल-मसाले असलेले, ताजे आणि पोटाला तृप्त करणारे. पंजाबमधील ढाब्यांवरून सुरू झालेली ही संस्कृती हळूहळू संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात पसरली. महाराष्ट्रात ढाब्यांवर अस्सल गावरान बेत, शेवभाजी, भाकरी आणि खर्डा मिळू लागला.

ड्रायव्हर्सचे अर्थकारण आणि ढाब्यांचे नेटवर्क

ढाबे हे केवळ जेवणाचे ठिकाण नव्हते, तर ते ट्रक ड्रायव्हर्ससाठी एक ‘बँक’ आणि ‘माहिती केंद्र’ असायचे. अनेक ढाब्यांवर ड्रायव्हर्सना उधारी मिळायची. कुठल्या हायवेवर ट्रॅफिक आहे, कुठे पोलीस चेकिंग सुरू आहे, किंवा रस्ता कुठे खराब आहे, याच्या गप्पा याच ढाब्यांवर रंगायच्या. ड्रायव्हर्सच्या याच गरजेमुळे महामार्गावरचे स्थानिक अर्थकारण बदलले आणि लाखो लोकांना रोजगार मिळाला.

ट्रक लहान पण कीर्ती महान! मुंबईत जगातील पहिला 1 टन क्षमतेचा Electric Mini Truck लाँच, किंमत तर…

पर्यटकांचे नवीन आकर्षण

कालांतराने शहरात राहणाऱ्या लोकांना वीकेंडला शहराबाहेर पडण्याची सवय लागली. महामार्गावरून प्रवास करताना त्यांना या ढाब्यांचे आणि तिथल्या जेवणाचे आकर्षण वाटू लागले. आज अनेक ढाब्यांचे रूपांतर मोठ्या फॅमिली रेस्टॉरंट्समध्ये झाले आहे, जिथे फॅमिली कॅबिन, संगीत आणि रोषणाई असते.

जरी आज ढाबे आधुनिक झाले असले, तरी त्याची मूळ संकल्पना ट्रक ड्रायव्हर्सनीच रुजवली आहे. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही हायवेवरच्या ढाब्यावर मटण-भाकरी किंवा डाळ-तडका मागवाल, तेव्हा देशाची अर्थव्यवस्था आपल्या खांद्यावर वाहणाऱ्या त्या ट्रक ड्रायव्हर्सची आठवण नक्की काढा!

Web Title: Dhaba culture of indian highways

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
1

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
2

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
3

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
4

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.