मुंबईत जगातील पहिला 1 टन क्षमतेचा Electric Mini ट्रक लाँच
इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या Euler Motors ने जगातील पहिला 1 टन क्षमतेचा 4-व्हील इलेक्ट्रिक मिनी ट्रक ‘Turbo EV 1000’ सादर केला आहे. मुंबई आणि आसपासच्या व्यस्त वाहतुकीच्या रस्त्यांसाठी खास डिझाइन करण्यात आलेला हा मिनी ट्रक लहान व्यावसायिकांसाठी खऱ्या अर्थाने गेम-चेंजर ठरणार आहे.
शहरातील वारंवार फेऱ्या, वाहतुकीचा ताण आणि खर्च-कमी कसा करता येईल? अशा चालकांच्या गरजा लक्षात घेऊन या ट्रकची रचना करण्यात आली आहे. टर्बो ईव्ही 1000 मध्ये प्रमाणित 1 टी पेलोड क्षमता, 140–170 किमीची वास्तविक श्रेणी, आणि दरवर्षी ₹1.15 लाखांपर्यंत बचत मिळते. याची किंमत फक्त 5.99 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होत असल्याने हा जगातील सर्वात परवडणारा इलेक्ट्रिक मिनी ट्रक ठरतो.
नाव एकसारखेच तरी सुद्धा Mahindra Bolero आणि Bolero Neo मध्ये ‘हा’ आहे फरक
मुंबईसारख्या शहरांमध्ये डिझेल आणि सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळताना दिसत आहे. वाढते इंधन दर आणि इलेक्ट्रिक तंत्रज्ञानावर वाढत्या विश्वासामुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांच्या पर्यायांकडे वळत आहेत. या पार्श्वभूमीवर ऑयलर टर्बो ईव्ही 1000 शाश्वतता, परफॉर्मन्स आणि बचत या तिन्हींचे संतुलन साधणारा पर्याय ठरत आहे.
या ट्रकमध्ये 140 Nm टॉर्क, R13 व्हील प्लॅटफॉर्म, 230 मिमी डिस्क ब्रेक्स, आणि 140 ते 170 किमीची रिअल-वर्ल्ड रेंज देण्यात आली आहे. सुरक्षितता, वेग किंवा पेलोडवर कोणतीही तडजोड न करता, हे वाहन शहरातील रस्त्यांवर आत्मविश्वासाने हाताळता येते. CCS2 फास्ट चार्जिंग तंत्रज्ञानामुळे सार्वजनिक चार्जिंग स्टेशनवर फक्त 15 मिनिटांत 50 किमी रेंज मिळते. मजबूत 2.5 मिमी लॅडर फ्रेम, IP67 रेटेड बॅटरी, आणि लेझर-वेल्डेड बॅटरी मॉड्यूल्स टिकाऊपणा आणि विश्वसनीयता सुनिश्चित करतात.
नवीन GST Rates पावले रे बाबा! TVS Jupiter 125 च्या किमतीत मोठी घट, किंमत आता फक्त…
या वाहनाच्या लाँचप्रसंगी ऑयलर मोटर्सचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कुमार म्हणाले, “मुंबईच्या व्यावसायिक वाहन चालकांच्या मेहनतीवर हे शहर चालते. टर्बो ईव्ही 1000 द्वारे आम्ही केवळ वाहनच नव्हे, तर शहरी लॉजिस्टिक्ससाठी एक नवीन बेंचमार्क सादर करत आहोत. हे वाहन कमी खर्चात जास्त नफा देत पारंपारिक डिझेल पर्यायांना मागे टाकते. महाराष्ट्राच्या प्रगत इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 च्या पाठबळावर आम्हाला खात्री आहे की, टर्बो ईव्ही 1000 शहराच्या इलेक्ट्रिक गतिशीलतेत नवीन युग सुरू करेल.”
टर्बो ईव्ही 1000 तीन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे – सिटी, फास्ट चार्ज आणि मॅक्सएक्स. त्यांची किंमत अंदाजे 5,99,999, 7,19,999 आणि 8,19,999 आहे. फक्त 49,999 डाउन पेमेंट आणि महिना 10,000 पासून सुरू होणारे ईएमआय पर्यायही ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. परवडणारी किंमत, हाय परफॉर्मन्स आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान यांच्या जोरावर ऑयलर टर्बो ईव्ही 1000 नक्कीच भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरेल.