Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गिअर असलेल्या आणि गिअर नसलेल्या बाईक लायसेन्स मध्ये काय फरक असतो? कोणत्या लायसेन्स साठी अप्लाय करणे ठरते फायद्याचे?

गिअर असलेल्या बाईकच्या परवान्यावर स्कूटी चालवता येते, पण फक्त गिअर नसलेल्या वाहनाचा परवाना असल्यास बाईक चालवणे कायदेशीर गुन्हा ठरतो. ही चूक केल्यास वाहतूक पोलिसांचा दंड होऊ शकतो आणि अपघाताच्या वेळी विमा नाकारला जाऊ शकतो.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 02, 2026 | 05:36 PM
गिअर असलेल्या आणि गिअर नसलेल्या बाईक लायसेन्स मध्ये काय फरक असतो? कोणत्या लायसेन्स साठी अप्लाय करणे ठरते फायद्याचे?
Follow Us
Follow Us:

अठरा वर्षे पूर्ण झाली की तरुणाईला वेध लागतात ते वाहन लायसेन्स काढण्याचे. अनेकदा आपण आरटीओमध्ये जातो आणि घाईघाईत परवान्यासाठी अर्ज करतो. पण, अर्ज करताना लायसेन्स वरील एका छोट्या झालेल्या चुकीमुळे भविष्यात मोठा कायदेशीर मनस्ताप सहन करावा लागू शकतो. दुचाकी वाहनांच्या लायसेन्समध्ये प्रामुख्याने दोन प्रकार पडतात—एक गिअर नसलेल्या वाहनांसाठी (जसे की ॲक्टिव्हा, ज्युपिटर) आणि दुसरा गिअर असलेल्या वाहनांसाठी (जसे की स्प्लेंडर, पल्सर). चला तर मग, या दोन्ही परवान्यांमधील नेमका फरक आणि सामान्यतः होणाऱ्या चुका समजून घेऊया.

१. गिअर नसलेली वाहने विरुद्ध गिअरची वाहने

प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नियमांनुसार दुचाकी परवान्याचे दोन मुख्य वर्गीकरण केले जाते:

  • गिअर नसलेली दुचाकी- हे लायसेन्स प्रामुख्याने मोपेड किंवा स्वयंचलित गिअर असलेल्या स्कूटर चालवण्यासाठी दिले जाते. ज्या गाड्यांना हाताने किंवा पायाने गिअर बदलावे लागत नाहीत आणि ज्या फक्त ॲक्सिलेटर व ब्रेकवर चालतात, त्या सर्व या प्रकारात येतात.
  • गिअर असलेली दुचाकी – हे लायसेन्स सर्व प्रकारच्या गिअर असलेल्या मोटरसायकल आणि बाईक्स चालवण्यासाठी अनिवार्य असते.
कमी इंधन खर्च, जास्त बचत! भारतातील टॉप 5 मायलेज देणाऱ्या स्कूटर्स

२. तरुण आणि महिलांकडून होणारी मोठी चूक

लायसेन्स काढताना अनेक तरुण, विशेषतः महिला किंवा नवशिके चालक विचार करतात की, “मला तर फक्त स्कूटीच चालवायची आहे, मग बाईकचा परवाना कशाला?” या विचाराने ते फक्त ‘गिअर नसलेली दुचाकी’ या पर्यायाची निवड करतात.

पण खरी गोची पुढे होते. काही वर्षांनी जर त्यांना ऐन परिस्थितीत किंवा गरजेनुसार गिअर असलेली बाईक चालवावी लागली, तर कायदेशीररित्या ते गुन्हा ठरतो. तुमच्याकडे फक्त स्कूटीचा परवाना असेल आणि तुम्ही रस्त्यावर गिअरची बाईक चालवताना पकडले गेले, तर तुमच्याकडे ‘परवानाच नाही’ असे मानले जाते आणि वाहतूक पोलीस विना-परवाना गाडी चालवल्याचा मोठा दंड ठोकू शकतात.

गाडीला काळी फिल्म लावण्याबाबत कायदेशीर नियम काय आहेत? जाणून घ्या आरटीओ आणि सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

३. ‘विमा नाकारला‘ जाण्याचा धोका

सगळ्यात मोठी जोखीम अपघाताच्या वेळी निर्माण होते. समजा, एखाद्या व्यक्तीकडे फक्त गिअर नसलेल्या वाहनाचा परवाना आहे आणि त्याच्याकडून गिअरची बाईक चालवताना एखादा अपघात झाला, तर विमा कंपनी नुकसानभरपाई देण्यास स्पष्ट नकार देते. कारण कायद्याच्या दृष्टीने तुम्ही त्या वाहनासाठी पात्र नसता.

आरटीओचा सल्ला

हा मनस्ताप टाळण्यासाठी, जरी तुम्हाला सध्या फक्त स्कूटी चालवायची असेल, तरीही अर्ज करताना नेहमी ‘गिअर असलेली दुचाकी’ हाच पर्याय निवडावा. कारण नियम असा सांगतो की, ज्याच्याकडे गिअर असलेल्या बाईकचा परवाना आहे, ती व्यक्ती गिअर नसलेली स्कूटी देखील कायदेशीररित्या चालवू शकते. त्यामुळे परवाना काढताना एका अक्षराचा खेळ नीट समजून घ्या आणि भविष्यातील दंडापासून स्वतःला वाचवा.

Web Title: Difference between gear bikes non gear bikes auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • automobile
  • Insurance

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.