Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

E-Scooter Battery: ई-स्कूटरची बॅटरी लवकर संपतेय? रेंज आणि बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी फॉलो करा या १० भन्नाट ट्रिक्स!

इलेक्ट्रिक स्कूटरची रेंज आणि बॅटरीचे आयुष्य टिकवण्यासाठी ती नेहमी २०% ते ९०% दरम्यान मूळ चार्जरनेच चार्ज करावी. शांतपणे गाडी चालवणे, टायरमधील योग्य हवा आणि उन्हा-पावसापासून सुरक्षित ठेवून नियमित सर्व्हिसिंग केल्यास बॅटरीची क्षमता अनेक वर्षे चांगले राहते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 21, 2026 | 02:33 PM
E-Scooter Battery: ई-स्कूटरची बॅटरी लवकर संपतेय? रेंज आणि बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी फॉलो करा या १० भन्नाट ट्रिक्स!
Follow Us
Follow Us:
  • बॅटरी कधीही ०% होऊ देऊ नका आणि ओव्हरचार्जिंग टाळून ती २०% ते ९०% दरम्यान ठेवून ओरिजिनल चार्जरनेच चार्ज करा.
  • स्कूटर नेहमी स्मूथ राईडिंग करा, अचानक ब्रेक दाबणे टाळा आणि तयार्मध्ये योग्य हवेचा दाब असेल, हे तपासात जा. 
  • स्कूटर कडक उन्हात पार्क करणे टाळा आणि पावसाळ्यात चार्जिंग सॉकेटमध्ये पाणी जाणार नाही याची काळजी घ्या.

पेट्रोलच्या सतत वाढणाऱ्या दरांपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक जण इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करत आहेत. पण ई-स्कुटी घेतल्यानंतर काही महिन्यांतच अनेकांना एकाच गोष्टीचं टेन्शन येतं—ते म्हणजे ‘बॅटरी आणि तिची रेंज’. इलेक्ट्रिक स्कूटरमधील सर्वात महत्त्वाचा आणि महागडा घटक म्हणजे तिची बॅटरी! जर तुम्ही या बॅटरीची व्यवस्थित काळजी घेतली, तर तुमची स्कूटर जास्त चांगली चालू शकते. तुमच्या ई-स्कूटरची रेंज वाढवण्यासाठी आणि बॅटरीचे आयुष्य टिकवून ठेवण्यासाठी खालील १० अतिशय महत्त्वाच्या टिप्स नक्की फॉलो करा,

१. बॅटरी पूर्ण ०% होण्यापूर्वीच चार्ज करा

अनेक जण बॅटरी पूर्ण संपण्याची वाट पाहतात, जी सर्वात मोठी चूक आहे. बॅटरीचा चार्ज १५ ते २० टक्क्यांच्या खाली येऊ देण्यापूर्वीच ती चार्जरला लावा. वारंवार बॅटरी पूर्ण डिस्चार्ज केल्याने तिच्या चार्जिंग टिकवून ठेवण्याच्या क्षमतेवर वाईट परिणाम होतो. आणि रस्त्यातच मध्ये कुठेही गाडी बंद पडल्यावर अडचण येऊ शकते.

२. ओव्हरचार्जिंग पूर्णपणे टाळा

स्कूटर १००% चार्ज झाली की लगेच चार्जरचे सॉकेट बंद करून प्लग काढून टाका. रात्रभर किंवा गरजेपेक्षा जास्त वेळ गाडी चार्जिंगला लावून ठेवल्यास बॅटरीवर ताण येतो आणि ती लवकर खराब होण्याची शक्यता असते. यासाठी तुम्ही चार्जिंगचा वेळ अलार्म वर सेट करून ठेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला चार्जिंग बंद करण्याची आठवण होईल.

३. फक्त कंपनीचा ओरिजिनल चार्जरच वापरा

तुमच्या ई-स्कूटरसोबत मिळालेला अधिकृत चार्जरच नेहमी वापरावा. लोकल, स्वस्त किंवा दुसऱ्या गाडीचा चार्जर वापरल्यास व्होल्टेजच्या तफावतीमुळे बॅटरी जळण्याचा किंवा तिचा परफॉर्मन्स खराब होण्याचा धोका असतो. ई स्कूटरच्या बॅटरीचे समीकरणही मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रोनिक वस्तूंसारखेच असते म्हणायला हरकत नाही.

गाडीची टाकी फुल केली तर चालते का? हे आहेत ‘टंकी फुल’चे  फायदे आणि तोटे

४. कडक उन्हात गाडी पार्क करू नका

इलेक्ट्रिक स्कूटर थेट कडक उन्हात जास्त वेळ उभी ठेवणे टाळा. अति उष्णतेमुळे बॅटरीतील सेल्स गरम होतात, ज्यामुळे तिची चार्जिंग धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. शक्यतो सावलीतच गाडी पार्क करा. ज्याप्रमाणे मोबाईल उन्हात गरम होतात, त्याप्रमाणे ई स्कूटरची बॅटरीही होते हे लक्षात घ्यायायला हवे.

५. ‘स्मूथ‘ ड्रायव्हिंगची सवय ठेवा

रस्त्यावर वारंवार अचानक एकदम जोरात आडदांड माणसासारखे जोरात पिक-अप घेणे आणि अचानक कडक ब्रेक दाबणे टाळा. यामुळे मोटर आणि बॅटरीवर अचानक प्रचंड लोड येतो. गाडी एका ठराविक आणि मध्यम वेगात शांत रीतीने चालवल्यास बॅटरी खूप जास्त काळ टिकते.

६. टायरमधील हवेचा दाब योग्य ठेवा

टायरमध्ये हवा कमी असेल तर स्कूटर ओढण्यासाठी मोटरला जास्त ताकद लावावी लागते, ज्यामुळे बॅटरी लवकर संपते. त्यामुळे दर आठवड्याला टायरमधील हवा योग्य आहे की नाही हे आवर्जून नक्की तपासा.

७. गाडी जास्त दिवस बंद ठेवताना ही काळजी घ्या

जर तुम्ही काही आठवडे किंवा महिनाभर स्कूटर वापरणार नसाल, तर बॅटरी ०% किंवा १००% ठेवून सोडू नका. अशा वेळी बॅटरी साधारण ४० ते ६० टक्क्यांच्या दरम्यान चार्ज करून ठेवा आणि मधूनमधून तिचे चार्जिंग चेक करा. शक्यतो जास्त दिवस स्कूटर बंद करून ठेवणे चुकीचे ठरते.

इथेनॉल पेट्रोल मध्ये चालतं, मग डिझेल मध्ये का नाही? हे आहे कारण! समजून घ्या एका क्लिकवर

८. गाडीवर तिच्या क्षमतेपेक्षा जास्त वजन टाकू नका

प्रत्येक ई-स्कूटरची वजन पेलण्याची एक विशिष्ट क्षमता असते. क्षमतेपेक्षा जास्त वजन किंवा ट्रिपल सीट प्रवास केल्यास मोटर आणि बॅटरीवर अतिरिक्त ताण येतो, ज्यामुळे बॅटरीची रेंज वेगाने कमी होते.

९. वेळच्या वेळी सर्व्हिसिंग करून घ्या

ठराविक अंतराने स्कूटरची सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे. सर्व्हिसिंग दरम्यान बॅटरीचे टर्मिनल्स, वायरिंग, बीएमएस आणि सॉफ्टवेअर अपडेट्स तपासले जातात, ज्यामुळे बॅटरीची कार्यक्षमता चांगली राहते.

१०. पावसाळ्यात पाणी आणि ओलाव्यापासून जपा

जरी आजकालच्या ई-स्कूटर्स वॉटर-रेसिस्टंट असल्या, तरी चार्जिंग पोर्ट आणि सॉकेटमध्ये पाणी जाणार नाही याची दक्षता घ्या. पावसाळ्यात चार्जिंग करण्यापूर्वी पोर्ट पूर्णपणे कोरडे असल्याची खात्री करा, जेणेकरून शॉर्ट सर्किट होणार नाही.

सर्वात मोठी चूक जी नक्की टाळावी!

अनेक जण दररोज बॅटरी १००% पर्यंत चार्ज करतात आणि ती पूर्ण ०% होईपर्यंत चालवतात. या दोन्ही सवयी बॅटरीसाठी अत्यंत घातक आहेत. रोजच्या वापरासाठी बॅटरी ८०% ते ९०% पर्यंत चार्ज करणे आणि ती २०% च्या खाली न येऊ देणे, हाच बॅटरी टिकवण्याचा खरा मंत्र आहे!

Web Title: E scooter battery tips for battery health life range

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 02:33 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Electric Vehicles

संबंधित बातम्या

थारप्रेमींसाठी क्रेझी बातमी! Mahindra Thar Facelift, Vision.S आणि BE.07 लवकरच येणार मार्केटमध्ये! पाहा डिटेलमध्ये माहिती
1

थारप्रेमींसाठी क्रेझी बातमी! Mahindra Thar Facelift, Vision.S आणि BE.07 लवकरच येणार मार्केटमध्ये! पाहा डिटेलमध्ये माहिती

TVS Apache RR 310 आणि RTR 310 Black Diamond Edition लाँच; किंमत ₹2.48 लाखांपासून सुरु! पाह काय आहेत फीचर्स
2

TVS Apache RR 310 आणि RTR 310 Black Diamond Edition लाँच; किंमत ₹2.48 लाखांपासून सुरु! पाह काय आहेत फीचर्स

Tata Sierra Dark Edition लाँच; किंमत ₹13.99 लाखांपासून, मिळणार खास ब्लॅक थीम
3

Tata Sierra Dark Edition लाँच; किंमत ₹13.99 लाखांपासून, मिळणार खास ब्लॅक थीम

Royal Enfield Meteor 350 vs Triumph Tracker 400: किंमत, पॉवर आणि फीचर्समध्ये काय आहे फरक?
4

Royal Enfield Meteor 350 vs Triumph Tracker 400: किंमत, पॉवर आणि फीचर्समध्ये काय आहे फरक?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.