
बंगळुरू येथील E3 Electric.AI या स्टार्ट-अप कंपनीने भारतीय दुचाकी बाजारात धमाकेदार पदार्पण केले आहे. कंपनीने आपली पहिली AI तंत्रज्ञानाने सुसज्ज असणारी E3 Trion इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात लाँच केली आहे. प्रेडिक्टिव्ह इंटेलिजन्स, मॉड्युलर बॅटरी पर्याय आणि अत्याधुनिक कनेक्टेड फीचर्स ही या स्कूटरची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावरून बंगळुरूमध्ये याचे प्री-बुकिंग सुरू झाले असून, लवकरच ती इतर शहरांमध्येही उपलब्ध केली जाईल.
व्हेरियंट्स आणि किमती
E3 Trion ही इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात एकूण तीन विविध व्हेरियंट्समध्ये सादर करण्यात आली आहे:
BMW X1 LWB २१ ऑगस्टला भारतात होणार लाँच! जाणून घ्या सर्व महत्त्वाची माहिती
AI तंत्रज्ञान आणि ‘TripSense’ कॉकपिट
या स्कूटरचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यातील कृत्रिम बुद्धिमत्ता. ही स्कूटर कंपनीच्या E3 Command Center प्लॅटफॉर्मवर आणि क्लाउड-बेस्ड इंटेलिजन्सवर काम करते.
E3 Trion मध्ये ‘Tri axis frame’ मॉड्युलर आर्किटेक्चर वापरण्यात आले आहे, जे फिक्स आणि रिमूव्हेबल दोन्ही प्रकारच्या बॅटरींचा सपोर्ट करते.
डिझाईन, आरामदायी प्रवास आणि सुरक्षा