फोटो सौजन्य: iStock
भारतात इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. वाढत्या इंधनाच्या किमतीमुळे आता अनेक जण इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीकडे वळताना दिसत आहे. पण इलेक्ट्रिक कार खरेदी केल्यानंतर त्याची देखभाल करणे देखील गरजेचे आहे. अशातच उन्हाळाच्या मोसमात तर विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
उन्हाळ्यात, लोकांनी केवळ स्वतःची काळजी घेतली पाहिजे असे नाही तर त्यांच्या कारचीही त्याच पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. उन्हाळा सुरू होताच कारला आग लागण्याच्या बातम्या झळकू लागतात. यामागील कारण बहुतेकदा कार मालकाची चूक असते.
2025 TVS Apache RR 310 भारतात लाँच, किमतीत मात्र ‘इतक्या’ रुपयांची वाढ
अनेकदा लोक नकळतपणे काही चुका करतात ज्यामुळे आगीचा धोका वाढतो. परिणामी, काही वेळातच तुमची कार राखेत बदलू शकते. यामुळे तुम्हाला जीवितहानी आणि मालमत्तेचे नुकसान सहन करावे लागू शकते.
इलेक्ट्रिक कारमध्ये दिलेली बॅटरी ही खूप संवेदनशील म्हणजेच सेन्सिटिव्ह असते. सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये तीव्र उष्णता जाणवत आहे. कधीकधी तापमान तर 45 ते 50 अंशांपर्यंत जात आहे. अशा ठिकाणी इलेक्ट्रिक कारची योग्य काळजी घेणे खूप महत्वाचे असते. हे लक्षात घेऊनच, आज आपण अशा दोन चुकांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या तुम्ही उन्हाळ्यात इलेक्ट्रिक कारबाबत करू नयेत.
लक्षात घ्या, तुम्ही कधीही इलेक्ट्रिक कारची बॅटरी 100 टक्के चार्ज करू नये. लिथियम-आयन बॅटरी 30 टक्के ते 80 टक्के चार्ज केल्यावर उत्तम काम करतात. बॅटरी सतत पूर्णपणे चार्ज केल्याने त्याची क्षमता कमी होते आणि त्यावर दबाव देखील येतो. जरी अलिकडच्या काळात बॅटरी मॅनेजमेंट सिस्टम इतकी चांगली झाली आहे की बॅटरी पूर्णपणे चार्ज झाल्यावर चार्जिंग प्रोसेस आपोआप थांबते, परंतु ती चार्जिंगवर ठेवल्याने बॅटरीच्या लाइफवर वाईट परिणाम होतो आणि नंतर बॅटरी हळूहळू खराब होऊ लागते. उन्हाळ्यात बॅटरी अशाच प्रकारे चार्ज होत राहिल्यास तिला आग लागण्याचा धोका वाढतो.
तुमच्या रुबाबाला शोभेल अशा स्पेशल डार्क एडिशन लूकमध्ये येतात ‘या’ 5 SUV, किंमत फक्त…
भर उन्हात म्हणजेच थेट सूर्यप्रकाशात इलेक्ट्रिक कार चार्ज करणे टाळा. खरंतर, जेव्हा बॅटरी चार्ज होत असते तेव्हा तिचे तापमान वाढते. जर तुम्ही इलेक्ट्रिक कार उन्हात पार्क करून चार्ज केली तर बॅटरीचे तापमान वाढू शकते. उच्च तापमानामुळे, बॅटरीची लाइफ कमी होऊ शकते. तसेच त्याची क्षमता देखील कमी होऊ शकते. यामुळे, केवळ रेंज कमी होऊ शकत नाही तर आग लागण्याची शक्यता देखील वाढू शकते. म्हणूनच खबरदारी म्हणून उन्हाळ्यात तुम्ही तुमची इलेक्ट्रिक कार थेट सूर्यप्रकाशाऐवजी सावलीत असलेल्या ठिकाणी पार्क करून चार्ज करावी.