फोटो सौैजन्य: @Vimalsumbly (X.com)
भारतात दुचाकी सेगमेंटमध्ये नेहमीच दमदार बाईक आणि स्कूटर ऑफर होत असतात. त्यामुळे ग्राहक देखील या दुचाकींना मोठ्या प्रमाणात भरघोस प्रतिसाद देत असतात. अनेक दुचाकी कंपन्या ग्राहकांच्या मागणीनुसार बजेट फ्रेडली आणि स्पोर्ट बाईक ऑफर करत आहे.
भारतात अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या आहेत. TVS ही त्यातीलच एक. कंपनीने मार्केटमध्ये दमदार स्कूटर आणि बाईक ऑफर केल्या आहेत. Apache ही कंपनीची सर्वात लोकप्रिय बाईकपैकी एक आहे. नुकतेच कंपनीने याचे अपडेटेड व्हर्जन मार्केटमध्ये आणले आहे.
तुमच्या रुबाबाला शोभेल अशा स्पेशल डार्क एडिशन लूकमध्ये येतात ‘या’ 5 SUV, किंमत फक्त…
टीव्हीएसने भारतात 2025 ची टीव्हीएस अपाचे आरआर 310 लाँच केली आहे. कंपनीने त्यांच्या फुल-फेयर्ड सुपरस्पोर्टमध्ये नवीन फिचर्स, इन्स्ट्रुमेंट कन्सोलसाठी नवीन भाषा, 8-स्पोक अलॉय व्हील्सची जोडी आणि पूर्णपणे नवीन ब्ल्यू कलर स्कीम सह अपडेट केले आहे. नवीन TVS Apache RR 310 मध्ये इतर कोणते नवीन फीचर्स देण्यात आले आहेत त्याबद्दल जाणून घेऊया.
2025 च्या टीव्हीएस अपाचे आरआर 310 मध्ये आता लाँच कंट्रोल, कॉर्नरिंग इंजिन ब्रेकिंग कंट्रोल, इन्स्ट्रुमेंट कन्सोलसाठी मल्टी-लँग्वेज सपोर्ट आणि सीक्वेंशियल टर्न इंडिकेटर आहेत.
यात एक नवीन इंजिन देखील आहे, जे OBD-2B इंजिन आहे. यात 312 सीसी सिंगल-सिलेंडर इंजिन आहे, जे 38 पीएस पॉवर आणि 29 एनएम टॉर्क जनरेट करते. ते 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. आता त्यात ८-स्पोक अलॉय व्हील्स आहेत.
अजबच ! नेपाळमध्ये Royal Enfield ची ‘ही’ बाईक लाँच, मात्र किंमत भारतीय रुपयांपेक्षा जास्तच
2025 च्या TVS Apache RR 310 मध्ये केलेल्या बदलांसोबतच त्याची किंमतही वाढवण्यात आली आहे. या बाईकची एक्स-शोरूम किंमत आता 2,77,999 रुपयांपासून सुरू होते आणि 2,99,999 रुपयांपर्यंत जाते. त्याचे नवीन बेस मॉडेल गेल्या वर्षीच्या मॉडेलपेक्षा 4999 रुपयांनी महाग झाले आहे.
2025 च्या TVS Apache RR 310 च्या डिझाइनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. यात हेडलाइट्ससाठी ट्विन-एलईडी प्रोजेक्टर सेटअप आणि पूर्वीप्रमाणेच एलईडी टेल लाईट आहे. या बाईकमध्ये अजूनही विंगलेट्स आणि स्प्लिट-सीट सेटअप आहे, जे तिला एक छान स्पोर्टी लूक देते.
या बाईकमध्ये रायडिंग मोड्स, एबीएस मोड्स, कॉर्नरिंग क्रूझ कंट्रोल, कॉर्नरिंग ट्रॅक्शन कंट्रोल, कॉर्नरिंग एबीएस, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी यासह अनेक उत्तम वैशिष्ट्ये आहेत.
यात तेच सस्पेंशन आहे, जे इनव्हर्टेड टेलिस्कोपिक फोर्क आणि प्रीलोड-अॅडजस्टेबल मोनोशॉक आहे. यात पुढच्या बाजूला 300 मिमी डिस्क ब्रेक आणि मागील बाजूला 240 मिमी डिस्क ब्रेक आहे, जे 17-इंच अलॉय व्हील्सवर बसवलेले आहेत.