Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mercedes च्या ‘या’ कारमध्ये आढळली खराबी! एका झटक्यात हजारो गाड्या बोलावल्या परत

Mercedes-Benz च्या अनेक कार जगभरात लोकप्रिय आहेत. मात्र, नुकतेच कंपनीच्या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये बिघाड आढळला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 09, 2026 | 09:22 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:

जगप्रसिद्ध लक्झरी कार उत्पादक कंपनी Mercedes-Benz ला आपल्या इलेक्ट्रिक SUV Mercedes-Benz G-Class G580 संदर्भात महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागला आहे. कंपनीने अमेरिकेत विकल्या गेलेल्या या मॉडेल्ससाठी रिकॉल जाहीर केला आहे. यामागील कारण म्हणजे सुरक्षा संबंधित तांत्रिक समस्या. अहवालानुसार, या SUV मध्ये वापरण्यात आलेले व्हील बोल्ट कालांतराने सैल होऊ शकतात, ज्यामुळे वाहनाच्या चाकांवर धोका निर्माण होऊ शकतो.

3700 पेक्षा जास्त गाड्यांचा रिकॉल

या समस्येमुळे Mercedes-Benz ने एकूण 3,734 गाड्या परत मागवण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्व इलेक्ट्रिक G-Class G580 SUV आहेत, ज्या अमेरिकन बाजारात विकल्या गेल्या होत्या. ही SUV तिच्या दमदार परफॉर्मन्स आणि ऑफ-रोडिंग क्षमतेसाठी ओळखली जाते. मात्र, इतक्या प्रीमियम वाहनात अशी समस्या आढळणे कंपनीसाठी चिंतेची बाब ठरली आहे.

Volkswagen Taigun Facelift सादर झाली होsss…’या’ बदलांमुळे कार मार्केट गाजवणार?

कोणत्या मॉडेल्सवर परिणाम?

कंपनीच्या माहितीनुसार, ही समस्या फेब्रुवारी 2024 ते ऑगस्ट 2025 दरम्यान तयार करण्यात आलेल्या गाड्यांमध्ये आढळली आहे. त्यामुळे या कालावधीत गाडी खरेदी केलेल्या ग्राहकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे. सध्या कोणतीही अपघाताची घटना समोर आलेली नाही, परंतु संभाव्य धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

नेमकी समस्या काय?

Mercedes-Benz ने मान्य केले आहे की ही समस्या तांत्रिक चुकीमुळे निर्माण झाली आहे. इलेक्ट्रिक G-Class मध्ये पेट्रोल व्हर्जनमध्ये वापरले जाणारेच व्हील बोल्ट वापरण्यात आले. मात्र, इलेक्ट्रिक SUV चे वजन आणि टॉर्क अधिक असल्याने हे बोल्ट त्या दाबाला सहन करू शकले नाहीत आणि कालांतराने सैल होऊ लागले. विशेषतः कठीण रस्त्यांवर किंवा वारंवार टायर बदलल्यास ही समस्या अधिक जाणवू शकते.

कंपनीकडून उपाययोजना

ग्राहकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत कंपनीने उपाययोजना सुरू केली आहे. प्रभावित गाड्यांमधील जुने व्हील बोल्ट काढून त्याऐवजी अधिक मजबूत आणि सुधारित डिझाइनचे बोल्ट बसवले जाणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया मोफत केली जाईल.

Bajaj च्या ‘या’ बाईकमध्ये मोठा बदल! ‘या’ गोष्टीमुळे बाईक खरेदी करणे होणार स्वस्त

ग्राहकांनी काय करावे?

ज्या ग्राहकांकडे हा मॉडेल आहे त्यांनी घाबरण्याची गरज नाही. त्यांनी जवळच्या अधिकृत डीलरशी संपर्क साधून अपॉइंटमेंट घ्यावी. त्यानंतर तज्ञांकडून तपासणी करून आवश्यक ते बदल करण्यात येतील. ही प्रक्रिया सोपी आणि सुरक्षित आहे.

 

Web Title: Electric suv mercedes benz g class g580 recall more than 3000 cars due to

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 09, 2026 | 09:21 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Mercedes

संबंधित बातम्या

भारतातील 6 मोठ्या कार कंपन्यांमध्ये CNG कारची शर्यत! ग्राहकांना मिळणार जास्त पर्याय?
1

भारतातील 6 मोठ्या कार कंपन्यांमध्ये CNG कारची शर्यत! ग्राहकांना मिळणार जास्त पर्याय?

2026 हिरो एक्स्ट्रीम 160R 4V उद्या होणार लाँच! नवीन फीचर्ससह लूक बदलणार, इंजिन तेच राहणार
2

2026 हिरो एक्स्ट्रीम 160R 4V उद्या होणार लाँच! नवीन फीचर्ससह लूक बदलणार, इंजिन तेच राहणार

होंडाची पहिली इलेक्ट्रिक SUV 2 डिसेंबरला भारतात दाखल होणार! मारुती, टाटा आणि महिंद्राला टक्कर?
3

होंडाची पहिली इलेक्ट्रिक SUV 2 डिसेंबरला भारतात दाखल होणार! मारुती, टाटा आणि महिंद्राला टक्कर?

ह्युंदाईची भारतात 1.47 लाख कोटींची मेगा गुंतवणूक! 2032 पर्यंत मोठा विस्तार, इलेक्ट्रिक वाहनांवरही देणार भर
4

ह्युंदाईची भारतात 1.47 लाख कोटींची मेगा गुंतवणूक! 2032 पर्यंत मोठा विस्तार, इलेक्ट्रिक वाहनांवरही देणार भर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.