Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

होंडाची पहिली इलेक्ट्रिक SUV 2 डिसेंबरला भारतात दाखल होणार! मारुती, टाटा आणि महिंद्राला टक्कर?

होंडाची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही 2 डिसेंबर 2026 रोजी भारतात डेब्यू करणार आहे. मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि महिंद्राच्या इलेक्ट्रिक एसयूव्हींना टक्कर देण्यासाठी येणाऱ्या या कारमध्ये काय खास असणार? बॅटरी, रेंज आणि किंमतीबाबतची उत्सुकता आता वाढली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 14, 2026 | 08:20 PM
होंडाची पहिली इलेक्ट्रिक SUV 2 डिसेंबरला भारतात दाखल होणार! मारुती, टाटा आणि महिंद्राला टक्कर?
Follow Us
Follow Us:
  • होंडा 0 अल्फा इलेक्ट्रिक एसयूव्हीचा भारतातील डेब्यू 2 डिसेंबर 2026 रोजी होणार आहे.
  • राजस्थानमधील टपूकडा प्लांटमध्ये कारचे प्रोडक्शन करून देशांतर्गत विक्री आणि निर्यातीवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
  • बॅटरी, रेंज आणि किंमत अद्याप जाहीर नाही; अंतिम स्पर्धा कारच्या स्पेसिफिकेशन्स आणि किंमतीवर ठरणार आहे.

भारतात इलेक्ट्रिक कारच्या मार्केटमध्ये प्रवेश करण्यासाठी होंडा सज्ज झाली आहे. कंपनीची आगामी होंडा 0 अल्फा इलेक्ट्रिक एसयूव्ही 2 डिसेंबर 2026 रोजी भारतात डेब्यू करणार असल्याची माहिती समोर आली आहे. जपान मोबिलिटी शोमध्ये ऑक्टोबर 2025 मध्ये या एसयूव्हीचे कॉन्सेप्ट सादर करण्यात आले होते. त्यानंतर ही कार भारतीय रस्त्यांवर टेस्टिंगदरम्यान दिसली आहे. पेट्रोल आणि हायब्रीड कारवर भर देणाऱ्या होंडासाठी हे भारतातील इलेक्ट्रिक पॅसेंजर व्हेईकल सेगमेंटमधील महत्त्वाचे पाऊल ठरू शकते.

राजस्थानमध्ये होणार प्रोडक्शन

होंडा 0 अल्फाचे प्रोडक्शन राजस्थानमधील टपूकडा प्लांटमध्ये होण्याची शक्यता आहे. येथून देशांतर्गत मार्केटसाठी कार तयार करण्यासोबत निर्यातीवरही लक्ष दिले जाणार आहे. टेस्टिंगदरम्यान दिसलेल्या मॉडेलमध्ये उंच छत, चौकोनी व्हील आर्चेस, बंदिस्त फ्रंट डिझाइन आणि वेगळ्या आकाराचे लाईट्स दिसले आहेत. मागच्या बाजूला उभट टेलगेट आणि मोठी रिअर विंडस्क्रीन असल्याने केबिनमधील जागा आणि वापरातील सोयींना महत्त्व दिले जाण्याची शक्यता आहे.

बॅटरी भाड्याने घ्या आणि कार चालवा! सिट्रॉन e-C3X चा भारतीय बाजारात मास्टरस्ट्रोक!

मोठी स्क्रीन आणि डिजिटल डिस्प्ले

स्पाय शॉट्समधून कारच्या इंटिरियरचीही पहिली झलक समोर आली आहे. यात मोठी आडवी सेंट्रल टचस्क्रीन, स्वतंत्र डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मल्टीफंक्शन स्टीयरिंग व्हील दिसत असल्याचे वृत्त आहे. पण कंपनीने अद्याप प्रोडक्शन मॉडेलमधील सर्व फीचर्सची ऑफीशली घोषणा केलेली नाही.

बॅटरी आणि रेंजची माहिती अद्याप गुलदस्त्यात

होंडाने बॅटरीची कॅपसिटी, मोटरची पॉवर, चार्जिंग स्पीड किंवा ड्रायव्हिंग रेंज याबाबत तपशील जाहीर केलेले नाहीत. काही वृत्तांनुसार, या एसयूव्हीमध्ये 65 kWh ते 75 kWh दरम्यानच्या बॅटरीचे ऑप्शन आणि फ्रंट-व्हील ड्राइव्ह सेटअप मिळू शकतो. पण ही माहिती अद्याप निश्चित झालेली नाही.

मारुती, ह्युंदाई आणि महिंद्राशी स्पर्धा

लाँचनंतर होंडा 0 अल्फाचा सामना मारुती सुझुकी ई विटारा, ह्युंदाई क्रेटा इलेक्ट्रिक, टाटा सिएरा ईव्ही आणि महिंद्रा बीई 6 यांसारख्या मॉडेल्सशी होऊ शकतो. कारची किंमत, रेंज आणि फीचर्स तिचे मार्केटमधील स्थान ठरवतील. होंडाने जागतिक विक्री 2027 मध्ये सुरू होण्याचे संकेत यापूर्वी दिले होते. भारतात डेब्यूची तारीख जाहीर झाली असली, तरी कस्टमरना डिलिव्हरी कधी सुरू होईल, हे अजून स्पष्ट झालेले नाही.

Electric Car : सिट्रोएनची नवी इलेक्ट्रिक कार लवकरच बाजारात; वाचा काय आहे खास?

💡 Frequently Asked Questions

प्रश्न 1: होंडा 0 अल्फा भारतात कधी डेब्यू करणार आहे?

उत्तर: होंडा 0 अल्फा इलेक्ट्रिक एसयूव्हीचा भारतातील डेब्यू 2 डिसेंबर 2026 रोजी होणार असल्याचे ताज्या वृत्तांत सांगण्यात आले आहे.

प्रश्न 2: होंडा 0 अल्फाचे प्रोडक्शन कुठे होणार आहे?

उत्तर: या इलेक्ट्रिक एसयूव्हीचे प्रोडक्शन राजस्थानमधील टपूकडा प्लांटमध्ये करण्याची योजना आहे. भारतातून देशांतर्गत विक्रीसोबत निर्यातही करण्याचे नियोजन आहे.

प्रश्न 3: होंडा 0 अल्फाची बॅटरी, रेंज आणि किंमत किती असेल?

उत्तर: कंपनीने बॅटरीची कॅपसिटी, ड्रायव्हिंग रेंज, चार्जिंग स्पेसिफिकेशन्स आणि किंमत अद्याप जाहीर केलेली नाही. 65–75 kWh बॅटरीचे वृत्त आहे, पण हा तपशील अधिकृतरीत्या निश्चित झालेला नाही.

Web Title: Honda 0 alpha electric suv india debut december auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2026 | 08:20 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

ह्युंदाईची भारतात 1.47 लाख कोटींची मेगा गुंतवणूक! 2032 पर्यंत मोठा विस्तार, इलेक्ट्रिक वाहनांवरही देणार भर
1

ह्युंदाईची भारतात 1.47 लाख कोटींची मेगा गुंतवणूक! 2032 पर्यंत मोठा विस्तार, इलेक्ट्रिक वाहनांवरही देणार भर

Hyundai-TVS ची इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर 2027-28 पर्यंत भारतात येणार! दरमहा 4,000 युनिट्सच्या प्रोडक्शनचे लक्ष्य
2

Hyundai-TVS ची इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर 2027-28 पर्यंत भारतात येणार! दरमहा 4,000 युनिट्सच्या प्रोडक्शनचे लक्ष्य

VLF स्ट्राडा की एथर कोनार्क? कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरचा EMI कमी? पाहा संपूर्ण महिन्याचा हिशोब!
3

VLF स्ट्राडा की एथर कोनार्क? कोणत्या इलेक्ट्रिक स्कूटरचा EMI कमी? पाहा संपूर्ण महिन्याचा हिशोब!

MG Windsor Indulge Edition लाँच! 17.99 लाखांत नवा लूक, मागच्या सीटवर मिळणार खास आराम
4

MG Windsor Indulge Edition लाँच! 17.99 लाखांत नवा लूक, मागच्या सीटवर मिळणार खास आराम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.