फोटो सौजन्य: @MoreMotorcycles (X.com)
भारतात टू व्हीलर सेगमेंटमध्ये दमदार वाहने ऑफर होत असतात. यातही बजेट फ्रेंडली बाईक आणि स्कूटरला मार्केटमध्ये चांगली मागणी मिळताना दिसते. पण असे जरी असले तरी मार्केटमध्ये महागड्या किमतीच्या बाईक आणि स्कूटरची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते.
देशात अनेक उत्तम टू-व्हीलर उत्पादक कंपन्या आहेत. त्यातीलच एक कंपनी म्हणजे Honda. होंडाने देशात अनेक उत्तम आणि बेस्ट परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक आणि स्कूटर ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने एक प्रीमियम स्कूटर लाँच केला आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
Mahindra Bolero Neo चा बोल्ड एडिशन लाँच, ‘या’ 5 फीचर्समुळे कारचे नशीब पालटणार
होंडाने 21 मे 2025 रोजी प्रीमियम स्कूटर सेगमेंटमध्ये Honda X-ADV लाँच केली आहे. या स्कूटरमध्ये किती पॉवरफुल इंजिन दिले आहे. ही स्कूटर कोणत्या प्रकारच्या फीचर्ससह लाँच केली गेली आहे? स्कूटर किती किमतीत खरेदी करता येईल? त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
भारतात होंडा स्कूटर अँड मोटरसायकल इंडियाने Honda X-ADV ही प्रीमियम स्कूटर म्हणून लाँच केली आहे. नॉर्मल स्कूटरच्या तुलनेत होंडा एक्स-एडीव्ही खूप वेगळ्या डिझाइनसह लाँच करण्यात आली आहे.
होंडाच्या नवीन स्कूटरमध्ये ड्युअल एलईडी हेडलाइट आणि डीआरएल, 22 -लिटर स्टोरेज, टाइप सी यूएसबी चार्जिंग पोर्ट, पर्ल ग्लेअर व्हाइट आणि ग्रेफाइट ब्लॅक कलर ऑप्शन्स, 5-इंच टीएफटी डिस्प्ले, होंडा रोड सिंक ॲप, टर्न बाय टर्न नेव्हिगेशन सिस्टम, एसएमएस आणि कॉल अलर्ट, 41 मिमी यूएसडी फोर्क्स, प्री-लोड ॲडजस्टेबल मोनोशॉक सस्पेंशन, समोर 17-इंच टायर्स आणि मागील बाजूस 15-इंच टायर्स, ड्युअल चॅनेल एबीएस, डिस्क ब्रेक्स, स्टँडर्ड, स्पोर्ट, रेन, रायडिंगसाठी ग्रेव्हल मोड्स, एचएसटीसी आणि बरेच काही फीचर्स आहेत.
MG Windsor EV Pro चा नवा व्हेरियंट Exclusive Pro झाला लाँच,मिळेल अजूनच धमाकेदार फीचर्स
होंडा एक्स-एडीव्ही स्कूटरमध्ये 745 सीसी लिक्विड कूल्ड आठ व्हॉल्व्ह पॅरलल ट्विन इंजिन आहे. ज्यामुळे त्याला 43.1 किलोवॅटची पॉवर आणि 69 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. त्यासोबत डीसीटी दिलेले आहे.
होंडाने ही नवीन स्कूटर फक्त एकाच व्हेरियंटमध्ये लाँच केली आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 11.90 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. होंडाच्या प्रीमियम डीलरशिप होंडा बिगविंग द्वारे ही स्कूटर बुक केली जाऊ शकते. त्याची डिलिव्हरी जून 2025 पासून सुरू होईल.