फोटो सौजन्य: @carandbike (X.com)
भारतीय बाजारात इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार मागणी मिळताना दिसत आहे. ग्राहक देखील मार्केटमध्ये येणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांना जोरदार प्रतिसाद देत आहे. याच मागणीमुळे देशात अनेक ऑटो कंपन्या दमदार EVs ऑफर करत आहे.
भारतात अनेक इलेक्ट्रिक कार्स लोकप्रिय झाल्या आहेत. त्यातीलच एक कार म्हणजे MG Windsor EV. या कारने मार्केटमध्ये आपले एक वेगळेच स्थान निर्माण केले आहे. या कारला मिळालेल्या भरघोस प्रतिसादानंतर आता MG Motors ने या कारचे नवीन व्हर्जन MG Windsor EV Pro लाँच केले. आता याच नवीन व्हर्जनचा नवीन व्हेरियंट लाँच झाला आहे.
२०२५च्या या वाढत्या उन्हात घ्या गाडीची विशेष काळजी; Follow करा काही टिप्स, सुरक्षित ठेवा तुमची कार
एमजी मोटर्सने भारतीय बाजारात विंडसर प्रो ईव्हीचा एक नवीन व्हेरियंट Windsor Exclusive Pro Variant लाँच केला आहे. चला या नवीन व्हेरियंटबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
कंपनीने या नवीन व्हेरियंटमध्ये 80 हून अधिक कनेक्टेड फीचर्स, 100 हून अधिक एआय व्हॉइस बेस्ड कमांड, 15.6 -इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, नऊ स्पीकर्ससह ऑडिओ सिस्टम, ड्युअल आयव्हरी आणि ब्लॅक इंटिरिअर आणि 18-इंच अलॉय व्हील्स अशी अनेक फीचर्स प्रदान केली आहेत. या व्हेरियंटमध्ये तीन कलर ऑप्शन्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये पर्ल व्हाइट, स्टारी ब्लॅक आणि टर्कोइज ग्रीन असे कलर्स समाविष्ट आहेत.
एमजी विंडसर प्रो ईव्हीचा एक्सक्लुझिव्ह प्रो व्हेरियंट 52.9 किलोवॅट प्रति तास बॅटरीसह येतो. जे पूर्ण चार्ज केल्यानंतर 449 किमी पर्यंत चालवता येते. त्यात बसवलेले मोटर त्याला 136 पीएसची पॉवर आणि 200 न्यूटन मीटरचा टॉर्क जनरेट करतो.
एमजी विंडसर प्रो ईव्हीचा नवीन व्हेरियंट, Exclusive Pro ला 17.24 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लाँच करण्यात आला आहे. याशिवाय, ही कार BaaS सह 12.24 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत घरी आणता येते. या स्कीममध्ये, प्रति किलोमीटर 4.5 रुपये शुल्क द्यावे लागेल.
बाईकपासून बनवली इलेक्ट्रिक कार, पेडलिंग करून चालवा गाडी, काय आहेत या गाडीचे वैशिष्ट्ये ?
या इलेक्ट्रिक कारची डिलिव्हरी जून 2025 च्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होणार आहे.
MG Windsor Pro EV बाजारात इलेक्ट्रिक सीयूव्ही सेगमेंटमध्ये उपलब्ध आहे. किंमत, रेंज, बॅटरी आणि मोटरच्या बाबतीत, ते Hyundai Creta Electric, Tata Curvv EV सारख्या इलेक्ट्रिक SUV शी स्पर्धा करते.