फोटो सौजन्य: iStock
Fastag Annual Plan Scheme Details:टोल प्लाझावरील वाहनांच्या लांबच लांब रांगा कमी करण्यासाठी सरकारने फास्टॅग चालू केले. यानिमित्ताने भारत सरकारने डिजिटल इंडियाकडे सुद्धा एक पाऊल ठेवले. मात्र, कालांतराने सतत फास्टॅगच्या रिचार्जमुळे लोकं त्रस्त होत होती. अशातच केंद्र सरकारने Annual Fastag Pass ची घोषणा केली आहे. 15 ऑगस्ट 2025 पासून या फास्टॅग पासचा वापर करता येणार आहे. हा पास राष्ट्रीय महामार्ग, द्रुतगती महामार्ग आणि राज्य महामार्ग किंवा राज्य द्रुतगती महामार्गावर काम करेल का? चला याबद्दल जाणून घेऊयात.
फास्टॅग वार्षिक योजनेत 3000 रुपयांत वर्षाला 200 ट्रिप मिळण्याबद्दल जे लोक आनंदी झाले आहेत, त्यांच्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे, ज्यामुळे त्यांचा सर्व गोंधळ दूर होईल. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी बुधवारी भारतातील खाजगी कार, जीप आणि व्हॅन चालकांसाठी वार्षिक फास्टॅग योजना सुरू करण्याची घोषणा केली, जी 15 ऑगस्ट 2025 पासून लागू होईल.
Annual Fastag Pass मुळे अजूनही गोधळलेले आहात? Nitin Gadkari यांनी दिले अवघड प्रश्नाची सोपी उत्तरं
फास्टॅग वार्षिक प्लॅनचे फायदे काय आहेत? याबद्दल लोकांमध्ये खूप गोंधळ आहे. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या संदर्भात एक व्हिडिओ पोस्ट करून सर्व गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.
या योजनेत 3000 रुपयांमध्ये 200 ट्रिपचा उल्लेख केला आहे. तर जर तुम्ही तुमच्या खाजगी कारमधून राष्ट्रीय महामार्गावर किंवा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) नियंत्रित असलेल्या एक्सप्रेसवेवर प्रवास करत असाल, तर तुम्ही टोल प्लाझा ओलांडताच, तुमच्या 200 ट्रिपमधून एक ट्रिप कमी होईल.
समजा जर तुम्ही कोणत्याही राष्ट्रीय महामार्गावर एका दिवसात 10 टोल प्लाझा ओलांडले तर तुमचे 10 ट्रिप कमी होईल. सर्वात महत्वाचे म्हणजे वार्षिक फास्टॅग योजनेची सुविधा फक्त खाजगी कार, जीप, व्हॅन मालकांनाच मिळू शकेल.
किती टेपा मारता राव ! Skoda Kylaq चा दावा 19.05kpl मायलेजचा, प्रत्यक्षात मात्र भलताच रिझल्ट आला समोर
आता खरा प्रश्न असा उद्भवतो की Annual Fastag Pass चा फायदा कोणत्या रस्त्यांवर मिळणार? ही सुविधा फक्त राष्ट्रीय महामार्गावर किंवा NHAI द्वारे नियंत्रित एक्सप्रेसवेवरच मिळू शकेल आणि केंद्रीय मंत्र्यांनी हे स्पष्ट केले आहे. तुम्हाला राज्य महामार्गावर किंवा राज्य सरकारद्वारे नियंत्रित एक्सप्रेसवेवरही Annual Fastag Pass चा लाभ घेता येणार नाही.