हैदराबाद: तेलंगणामध्ये सध्या ई-मोटर शो सुरु आहे. भारतातील पहिल्या फॉर्म्युला ई ग्रँड प्रिक्ससाठी हैदराबाद शहर सज्ज झाले आहे. तेलंगणा सरकारने या शो मध्ये भारतामध्ये पहिल्यांदाच जगातील सर्वात वेगवान कारचे लॉन्चिंग केले आहे. ई-मोबिलिटी विकचा एक भाग म्हणून या कारचे लॉन्चिंग करण्यात आले आहे.
इटालियन लक्झरी कार उत्पादक कंपनी Automobili Pininfarina ने हैदराबाद येथील ई-मोटर शो मध्ये आपल्या नवीन ऑल-इलेक्ट्रिक कार जीटी बटीस्टा (GT Batista) लॉन्च केली आहे. आजच्या कार्यक्रमात ही इलेक्ट्रिक कार भारतातील पहिल्याच फॉर्म्युला ई ग्रँड प्रिक्समध्ये सहभागी होणार आहे. GT Batista ही कार इटलीची लक्झरी कार उत्पादक कंपनी Automobili Pininfarina ने विकसित आणि डिझाईन केली आहे. महिंद्रा कंपनीची यावर मालकी आहे. ही कार केवळ इटलीतील नव्हे तर जगातील सर्वात वेगवान कार आहे.
Now on show in India! https://t.co/KRkUeab2Tu
— anand mahindra (@anandmahindra) February 9, 2023
महिंद्रा अँड महिंद्राच्या युरोप बिझनेसचे सीईओ गुरप्रताप बोपाराय म्हणाले, GT Batista कार इलेक्ट्रिक वाहनांमधील टेक्नॉलॉजीचे प्रतिनिधित्व करते. ही कार हैदराबाद ई-प्रिक्स सर्किटमध्ये सहभागी होणार आहे.
Automobili Pininfarina चे सीईओ पाओलो डेलाचा म्हणाले की, आम्ही हैद्राबादमध्ये होणाऱ्या ई -मोटर शोमध्ये सहभागी झाल्याचा आम्हाला खूप आनंद होत आहे. आम्ही भविष्यात महिंद्रा ग्रुपसोबत पुढे काम करण्यासाठी उत्सुक आहोत आम्ही आणखी अधिक रोमांचक अशी नवीन माहिती लवकर जाहीर करणार आहोत.
किंमत आणि वेग
GT Batista कारची किंमत 18 कोटी रुपये आहे. ही कार 1.86 सेकंदात 0-100 किती प्रतितास आणि 4.75 सेकंदात 0-200 किमी प्रतितास इतका स्पीड पकडते. या कारच्या स्पीडबद्दल बोलायचे झाल्यास याचा टॉप स्पीड हा 350 किमी प्रतितास इतका आहे. तसेच यामध्ये 120 kWh क्षमतेची बॅटरी पॅक आहे. T Batista च्या रेंजबाबा बोलायचे झाल्यास त्याची रेंज ही 482 किमी इतकी आहे जी EPA रेटेड आहे.