
१. KTM 390 Adventure
ऑफरोडिंग आणि अॅडव्हेंचर रायडिंगसाठी KTM 390 Adventure ही भारतातील सर्वात लोकप्रिय बाइक्सपैकी एक मानली जाते. 399 सीसी लिक्विड-कूल्ड इंजिनमधून 46 हॉर्सपॉवरची ताकद मिळते. उत्कृष्ट सस्पेन्शन, 227 मिमी ग्राउंड क्लीअरन्स, ट्रॅक्शन कंट्रोल आणि कॉर्नरिंग ABS यांसारख्या आधुनिक फीचर्समुळे खडकाळ, चिखलयुक्त आणि डोंगराळ रस्त्यांवरही ही बाइक अगदी आत्मविश्वासाने धावते. हलके वजन आणि मजबूत चेसिसमुळे ती नवशिक्या तसेच अनुभवी ऑफरोड रायडर्ससाठी उत्तम पर्याय ठरते.
२. Royal Enfield Himalayan 450
452 सीसी क्षमतेच्या लिक्विड-कूल्ड “Sherpa” इंजिनसह ही बाइक सुमारे 40 बीएचपी पॉवर आणि 40 एनएम टॉर्क निर्माण करते. हिमालयन 450 चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची उंच ग्राउंड क्लीअरन्स, लाँग-ट्रॅव्हल सस्पेन्शन आणि मजबूत चेसिस. यामुळे खड्डे, चिखल आणि खराब रस्त्यांवरही रायडरला चांगला आत्मविश्वास मिळतो. बाइकमध्ये आधुनिक TFT डिस्प्ले, नेव्हिगेशन सुविधा, रायड-बाय-वायर थ्रॉटल आणि विविध रायडिंग मोड्सही देण्यात आले आहेत. लांब अॅडव्हेंचर टूर करणाऱ्या रायडर्ससाठी आरामदायी सीट, सरळ रायडिंग पोझिशन आणि मोठी इंधन टाकी ही अतिरिक्त जमेची बाजू आहे. शहरातील वापरासोबतच ऑफरोड ट्रेल्स आणि हिल स्टेशन प्रवासासाठीही ही बाइक उत्तम पर्याय मानली जाते.
३. Hero XPulse 210
Hero XPulse 210 ही भारतीय बाजारातील सर्वात लोकप्रिय आणि परवडणाऱ्या ऑफरोडिंग बाइक्सपैकी एक मानली जाते. 210 सीसी लिक्विड-कूल्ड इंजिनसह ही बाइक अधिक चांगली रीस्पोंस देते. उंच ग्राउंड क्लीअरन्स, लांब सस्पेन्शन ट्रॅव्हल आणि हलकी रचना यामुळे चिखल, खडकाळ रस्ते आणि डोंगराळ भागातही ती सहज चालवता येते. कमी देखभाल खर्च आणि किफायतशीर किंमत यामुळे नवीन तसेच अनुभवी ऑफरोड रायडर्समध्ये Hero XPulse 210 ला विशेष पसंती मिळत आहे.
KTM ला धडकी भरवण्यासाठी येतेय BMW ची ‘ही’ खास Adventure Bike …
४. BMW G 310 GS
जर्मन तंत्रज्ञानाने सजलेली ही अॅडव्हेंचर बाइक शहरातील तसेच ऑफरोड मार्गांवर सहज धावते. आरामदायी रायडिंग पोझिशन आणि संतुलित कामगिरी हे तिचे वैशिष्ट्य आहे. ऑफरोडिंगसाठी ही बाइक पूर्णपणे रॅली मशीन नसली तरी खडकाळ रस्ते, कच्चे मार्ग आणि लांब प्रवास यासाठी ती उत्तम पर्याय ठरते. प्रीमियम ब्रँडची गुणवत्ता, आकर्षक लूक आणि विश्वासार्ह कामगिरी यामुळे BMW G 310 GS भारतीय अॅडव्हेंचर बाइक बाजारात एक लोकप्रिय पर्याय बनली आहे. 313 सीसी सिंगल-सिलेंडर, लिक्विड-कूल्ड इंजिनमुळे ही बाइक सुमारे 34 पीएस शक्ती आणि 28 एनएम टॉर्क निर्माण करते. शहरातील दैनंदिन वापर, हायवे टूरिंग आणि हलक्या ऑफरोडिंगसाठी ती योग्य मानली जाते.
Royal Enfiled ने सादर केली Himalayan Mana Black Edition, किंमत तर …
५. Suzuki V-Strom SX
ही बाइक प्रामुख्याने टूरिंगसाठी ओळखली जाते, परंतु हलक्या ऑफरोडिंगसाठीही ती सक्षम आहे. आरामदायी सीट आणि चांगल्या इंजिनामुळे लांब प्रवासात ती उत्तम साथीदार ठरते.
ऑफरोडिंगसाठी बाइक निवडताना इंजिन क्षमता, सस्पेन्शन, ग्राउंड क्लीअरन्स आणि वजन या बाबींचा विचार करणे महत्त्वाचे आहे. योग्य बाइक निवडल्यास खडतर रस्त्यांवरील प्रत्येक प्रवास रोमांचक आणि सुरक्षित ठरू शकतो.