Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चीनमध्ये ‘चेरी जॅग्वार लँड रोव्हर’च्या पहिल्या ‘Freelander’चे प्री-सेल लाँचिंग! २०३१ पर्यंत फ्रीलँडरचे ६ मॉडेल्स येणार बाजारात

टाटा मोटर्सच्या सहकार्याने ऑटोमोबाईल विश्वात एक मोठी घडामोड घडली असून एका प्रसिद्ध नाविन्यपूर्ण कार ब्रँडने अत्यंत आधुनिक अवतारात पुनरागमन केले आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि शक्तिशाली इंजिनचा मेळ साधत सादर केलेल्या या नवीन मॉडेलने आंतरराष्ट्रीय स्तरावर ऑटो क्षेत्रातील अनेक दिग्गज कंपन्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 18, 2026 | 02:49 PM
चीनमध्ये ‘चेरी जॅग्वार लँड रोव्हर’च्या पहिल्या ‘Freelander’चे प्री-सेल लाँचिंग! २०३१ पर्यंत फ्रीलँडरचे ६ मॉडेल्स येणार बाजारात
Follow Us
Follow Us:
  • चेरी जॅग्वार लँड रोव्हर संयुक्त उपक्रमाने चीनमध्ये फ्रीलँडर ब्रँडची नवीन ईआरईव्ही कार लाँच केली.
  • पुढील पाच वर्षांत फ्रीलँडर मालिकेचा विस्तार करून एकूण सहा विविध मॉडेल्स बाजारात आणण्याची योजना आहे.
  • जागतिक पदार्पणासाठी मध्य पूर्वेत रस्ते चाचण्या सुरू असून सप्टेंबरमध्ये अबू धाबी येथे ही कार सादर होईल.

चीनमधील स्थानिक ऑटोमेकर ‘चेरी ऑटोमोबाईल’ आणि भारतातील टाटा मोटर्सची उपकंपनी असलेल्या ‘जग्वार लँड रोव्हर’ यांच्यातील संयुक्त उपक्रम ‘चेरी जग्वार लँड रोव्हर’ने आपल्या नवीन ‘फ्रीलँडर’ ब्रँडअंतर्गत पहिले मॉडेल लाँच केले आहे. जिआंग्सू प्रांतातील चांगशू येथे आयोजित प्री-सेल कार्यक्रमात हे लाँचिंग पार पडले.

१९९७ ते २०१५ दरम्यान युकेमध्ये उत्पादित झालेल्या लँड रोव्हरच्या प्रसिद्ध अशा एंट्री-लेव्हल कॉम्पॅक्ट SUV चे ‘फ्रीलँडर’ हे नाव या निमित्ताने पुनरुज्जीवित करण्यात आले आहे. आता हे नाव चेरी जग्वार लँड रोव्हरच्या संयुक्त उपक्रमांतर्गत एक स्वतंत्र सब-ब्रँड म्हणून पुन्हा सादर केले गेले आहे.

India EV Exports: भारताच्या ईव्ही निर्यातीत १६ पटींहून अधिक मोठी झेप; पहिल्या तिमाहीत साधला रु. ३,०९० कोटींचा टप्पा

‘फ्रीलँडर ८’ या एक्स्टेंडेड रेंज इलेक्ट्रिक व्हेईकलच्या प्री-सेलची सुरुवात १४ ऑगस्टपासून झाली आहे. याच्या ५-सीटर मॉडेलची सुरुवातीची किंमत ३,३९,९०० युआन (५०,४३० अमेरिकन डॉलर) आहे, तर टॉप-स्पेक्ट ६-सीटर मॉडेलची किंमत ४,२९,९०० युआन (६३,७८० अमेरिकन डॉलर) ठेवण्यात आली आहे. या गाड्यांच्या चाचणी फेऱ्या मध्य पूर्वेतील देशांमध्ये स्थानिक रस्त्यांवर सुरू झाल्या आहेत. या वर्षी सप्टेंबरमध्ये अबू धाबी येथे ब्रँडच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या दिशेने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

‘फ्रीलँडर ८’ हे मॉडेल चेरीच्या E0X ८००-व्होल्ट प्लॅटफॉर्मवर आधारित असून, यामध्ये १.५-लीटर रेंज एक्सटेंडर इंजिन आणि ६०-किलोवॉट-अवरची CATL बॅटरी पॅक देण्यात आली आहे. यातील ड्युअल इलेक्ट्रिक मोटर्स ८१८ hp ची कमाल पॉवर जनरेट करतात. केवळ BEV (बॅटरी इलेक्ट्रिक) मोडवर चालताना, ही बॅटरी ३१० किमीची रेंज देते.

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

या मॉडेलमध्ये हुआवेईची ‘ADS 5’ ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम आणि क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसरद्वारे संचलित कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञान समाविष्ट आहे. तसेच, यात ‘i-ATS’ ही इंटेलिजंट ऑल-टेरेन सिस्टम देण्यात आली आहे, जी वेगवेगळ्या रस्त्यांच्या परिस्थितीनुसार सस्पेंशन सेटिंग्ज आपोआप ॲडजस्ट करते. फ्रीलँडर ८ चे उत्पादन चांगशू येथील संयुक्त उपक्रमाच्या वर्षाला २ लाख वाहनांची क्षमता असलेल्या अत्याधुनिक प्लांटमध्ये केले जात आहे. यासाठी ३ अब्ज युआनचा निधी खर्चून प्लांटचे अपग्रेडेशन करण्यात आले आहे. हा प्रकल्प फ्रीलँडर मालिकेचा मुख्य उत्पादन बेस म्हणून काम करेल. पुढील पाच वर्षांत या मालिकेत BEV, PHEV आणि EREV सह एकूण सहा मॉडेल्सचा विस्तार केला जाण्याची अपेक्षा आहे.

अपग्रेड केलेल्या या प्लांटमध्ये १,१०० हून अधिक रोबोट्स, संपूर्ण स्वयंचलित बॉडी शॉप आणि डिजिटल क्वालिटी ट्रॅसेबिलिटी सिस्टम आहे. यामुळे उत्पादनात उच्च दर्जाची अचूकता आणि सातत्य राखणे शक्य होत असल्याचे कंपनीने म्हटले आहे.

Web Title: Freelander car launched in china by tata chery joint venture auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • China

संबंधित बातम्या

India EV Exports: भारताच्या ईव्ही निर्यातीत १६ पटींहून अधिक मोठी झेप; पहिल्या तिमाहीत साधला रु. ३,०९० कोटींचा टप्पा
1

India EV Exports: भारताच्या ईव्ही निर्यातीत १६ पटींहून अधिक मोठी झेप; पहिल्या तिमाहीत साधला रु. ३,०९० कोटींचा टप्पा

Jeep Compass ‘85th Anniversary Edition’ २६.७० लाख रुपयांना भारतात लाँच! पाहा काय आहेत खास फीचर्स
2

Jeep Compass ‘85th Anniversary Edition’ २६.७० लाख रुपयांना भारतात लाँच! पाहा काय आहेत खास फीचर्स

‘८९९०’ नंबर प्लेट असलेल्या २५० लक्झरी गाड्या एकत्र आणत महिपाल सिंह यांच्या क्लबने रचला नवा जागतिक विक्रम
3

‘८९९०’ नंबर प्लेट असलेल्या २५० लक्झरी गाड्या एकत्र आणत महिपाल सिंह यांच्या क्लबने रचला नवा जागतिक विक्रम

Mercedes Benz In UP: मर्सिडीज-बेंझचा उत्तर प्रदेशात मोठा विस्तार; लखनऊमध्ये सुरू झाले अत्याधुनिक लक्झरी शोरूम
4

Mercedes Benz In UP: मर्सिडीज-बेंझचा उत्तर प्रदेशात मोठा विस्तार; लखनऊमध्ये सुरू झाले अत्याधुनिक लक्झरी शोरूम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.