Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India EV Exports: भारताच्या ईव्ही निर्यातीत १६ पटींहून अधिक मोठी झेप; पहिल्या तिमाहीत साधला रु. ३,०९० कोटींचा टप्पा

भारतीय इलेक्ट्रिक वाहनांनी आंतरराष्ट्रीय बाजारात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली असून, एकाच तिमाहीत परदेशी खरेदीदारांकडून अनपेक्षित आणि प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. या अभूतपूर्व निर्यातीमुळे जागतिक ऑटोमोबाईल क्षेत्रात भारताचा नवा दबदबा निर्माण होत आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 18, 2026 | 09:30 AM
India EV Exports: भारताच्या ईव्ही निर्यातीत १६ पटींहून अधिक मोठी झेप; पहिल्या तिमाहीत साधला रु. ३,०९० कोटींचा टप्पा
Follow Us
Follow Us:
  • भारताची इलेक्ट्रिक कार निर्यात एप्रिल-जून या तिमाहीत १६ पटींहून अधिक वाढून रु. ३,०९० कोटींच्या पार गेली.
  • युरोपियन देशांकडून झालेली मोठी मागणी आणि १०,८०२ वाहनांची झालेली निर्यात हा या ऐतिहासिक वाढीचा मुख्य पाया ठरला.
  • स्पेनने सर्वाधिक रु. १,२२६ कोटी तर ब्रिटनने रु. ६५९ कोटींच्या भारतीय इलेक्ट्रिक गाड्या आयात करत पहिले दोन क्रमांक पटकावले.

युरोपियन बाजारपेठेतील प्रचंड मागणीमुळे भारतातील बनवलेल्या इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्यातीत मोठी वाढ नोंदवली गेली आहे. आर्थिक वर्ष २०२६-२७ च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून २०२६) भारताची इलेक्ट्रिक कार निर्यात तब्बल १६ पट वाढून रु. ३,०९० कोटी वर पोहोचली आहे. मागील वर्षाच्या याच कालावधीत ही निर्यात अवघी रु. १८६ कोटी होती.

वाणिज्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताच्या एकूण ऑटोमोबाईल निर्यात क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांचे महत्त्व वेगाने वाढत आहे. एप्रिल ते जून २०२६ दरम्यान भारताने १०,८०२ इलेक्ट्रिक कार परदेशात पाठवल्या, तर गेल्या वर्षाच्या याच तिमाहीत हा आकडा केवळ १,३०९ वाहनांचा होता.

युरोप बनला भारतीय इलेक्ट्रिक गाड्यांचा सर्वात मोठा खरेदीदार

भारतात तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांसाठी युरोपियन देश हे सर्वात मोठे मार्केट ठरले आहेत. स्पेनने सर्वाधिक खरेदी केली असून त्याखालोखाल युकेचा (ब्रिटन) क्रमांक लागतो. याशिवाय जर्मनी, नॉर्वे, डेन्मार्क, बेल्जियम आणि नेदरलँड्स या देशांनीही मोठ्या प्रमाणावर भारतीय गाड्यांची आयात केली आहे.

कियाकडून नव्या व्हॉल्यूम एसयूव्हीवर काम सुरू! Syros आणि Seltos च्या दरम्यान लाँच होणार ही कार

स्पेन अग्रस्थानी: भारताकडून खरेदी केल्या रु. १,२२६ कोटींच्या कार्स

पहिल्या तिमाहीत स्पेन हा भारतीय इलेक्ट्रिक कारचा सर्वात मोठा ग्राहक बनला आहे. भारताने स्पेनला रु. १,२२६ कोटी किमतीच्या ४,००७ इलेक्ट्रिक कार्सची निर्यात केली. ही रक्कम भारताच्या एकूण ईव्ही निर्यातीच्या तब्बल ४० टक्के आहे.

ब्रिटनच्या आयातीत ऐतिहासिक वाढ: १ वरून थेट २,६४६ वाहने

ब्रिटन भारतातून रु. ६५९ कोटी किमतीच्या इलेक्ट्रिक कार आयात करत दुसरे स्थान पटकावले आहे. मागील वर्षी याच तिमाहीत युकेने भारताकडून केवळ १ गाडी आयात केली होती, ती संख्या आता वाढून २,६४६ वाहनांवर पोहोचली आहे.

इतर युरोपीय आणि जागतिक बाजारपेठांमध्येही वाढता दबदबा

युरोपमधील इतर प्रमुख देशांपैकी जर्मनीने रु. २१० कोटी, नॉर्वेने रु. १७७ कोटी आणि डेन्मार्कने रु. १७६ कोटी किमतीच्या वाहनांची खरेदी केली. तसेच बेल्जियमने रु. १०८ कोटी आणि नेदरलँड्सने रु. १०० कोटींच्या कार्स मागवल्या.

Maruti Suzuki महागली; Arena आणि Nexa कारच्या किमतीत तब्बल ₹३०,००० पर्यंतची वाढ

युरोपव्यतिरिक्त इतर खंडांमध्येही भारतीय गाड्यांची मागणी वाढली आहे. जपानने रु. ११२ कोटी आणि नेपाळने रु. ६८ कोटींच्या कार्स आयात केल्या. यासोबतच ब्राझील, इस्रायल, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि दक्षिण कोरियामध्येही भारतीय ईव्ही निर्यात झाल्या आहेत.

भारतीय वाहन उद्योगासाठी आणि ईव्ही इकोसिस्टमसाठी नवसंजीवनी

निर्यातीतील या प्रचंड वाढीमुळे भारत केवळ देशांतर्गत मागणी पूर्ण न करता जागतिक ईव्ही निर्मितीचे मुख्य केंद्र म्हणून उभारत असल्याचे स्पष्ट होते. या वाढत्या निर्यातीमुळे भारतातील बॅटरी, इलेक्ट्रिक मोटर आणि इलेक्ट्रॉनिक सुट्या भागांच्या निर्मितीलाही मोठी गती मिळणार आहे.

जागतिक बाजारपेठेत तीव्र स्पर्धा आणि कडक सुरक्षा नियम असतानाही भारतीय वाहनांनी मिळवलेले हे यश ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

Web Title: India ev exports jump in q1 fy27 auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • automobile
  • Car Export
  • Electric Vehicles

संबंधित बातम्या

World News :युरोपच्या कार बाजाराला चीनचा धक्का;व्यापारयुद्धासाठी नवा डाव
1

World News :युरोपच्या कार बाजाराला चीनचा धक्का;व्यापारयुद्धासाठी नवा डाव

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!
2

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?
3

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?
4

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.