Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 20 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Helmet: फक्त स्टाइल नाही, सेफ्टीही महत्त्वाची! हेलमेट घेताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Helmet Buying tips: दुचाकी चालवताना हेल्मेट हे फक्त कायदेशीर गरज नसून अपघाताच्या वेळी जीव वाचवणारे महत्त्वाचे सुरक्षा साधन आहे. हेल्मेट खरेदी करताना त्याची सुरक्षा क्षमता आणि गुणवत्तेपेक्षा डिझाइन किंवा स्टाइलवर भर देणे धोकादायक ठरू शकते.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Jun 20, 2026 | 08:14 PM
Helmet: फक्त स्टाइल नाही, सेफ्टीही महत्त्वाची! हेलमेट घेताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा
Follow Us
Follow Us:
  • फक्त स्टाइल नाही, सेफ्टीही महत्त्वाची
  • हेलमेट घेताना ‘या’ गोष्टी नक्की लक्षात ठेवा
  • ISI मार्कची खात्री करा
दुचाकी चालवताना हेल्मेट हा केवळ वाहतूक नियम पाळण्यासाठी वापरण्याचा भाग नसून तो जीव वाचवणारे महत्त्वाचे सुरक्षा साधन आहे. अनेकजण हेल्मेट खरेदी करताना त्याचा रंग, डिझाइन किंवा स्टाइल याकडे जास्त लक्ष देतात. मात्र तज्ज्ञांच्या मते, हेल्मेट निवडताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याची सुरक्षा क्षमता. योग्य हेल्मेट अपघाताच्या वेळी डोक्याचे गंभीर दुखापतींपासून संरक्षण करू शकते. त्यामुळे नवीन हेल्मेट खरेदी करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या बाबींची माहिती असणे आवश्यक आहे.

भारतातील टॉप 5 युट्युबर्स आणि त्यांच्याकडे असलेल्या सर्वात महागड्या आणि लोकप्रिय गाड्या! आत्ताच जाणून घ्या

ISI मार्कची खात्री करा

हेल्मेट खरेदी करताना सर्वप्रथम त्यावर ISI प्रमाणपत्र आहे का हे तपासणे गरजेचे आहे. ISI मार्क असलेले हेल्मेट ठरावीक सुरक्षा चाचण्या पूर्ण केल्यानंतरच बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले जाते. त्यामुळे अशा हेल्मेटमुळे अपघाताच्या वेळी अधिक चांगले संरक्षण मिळण्याची शक्यता असते.

योग्य आकार आणि फिटिंग निवडा

हेल्मेट खूप सैल किंवा खूप घट्ट नसावे. चुकीच्या आकाराचे हेल्मेट अपघाताच्या वेळी डोक्यावरून निसटू शकते किंवा अस्वस्थता निर्माण करू शकते. हेल्मेट घातल्यानंतर ते डोक्यावर व्यवस्थित बसले पाहिजे आणि जास्त हलू नये.

व्हिझरची गुणवत्ता तपासा

हेल्मेटमधील व्हिझर स्पष्ट आणि दर्जेदार असणे आवश्यक आहे. खराब दर्जाच्या व्हिझरमुळे रात्री किंवा पावसाळ्यात रस्त्यावरील दृश्य अस्पष्ट दिसू शकते. स्वच्छ आणि स्क्रॅच-प्रतिरोधक व्हिझर सुरक्षित प्रवासासाठी उपयुक्त ठरतो.

वजन आणि आरामाकडे दुर्लक्ष करू नका

लांब प्रवास करणाऱ्यांसाठी हेल्मेटचे वजन महत्त्वाचे असते. अतिजड हेल्मेटमुळे मान आणि खांद्यांवर ताण येऊ शकतो. हेल्मेटमधील आतील पॅडिंग मऊ आणि आरामदायी असल्यास प्रवास अधिक सुखकर होतो.

हेल्मेटचा प्रकार निवडा

फुल-फेस, मॉड्युलर किंवा ओपन-फेस अशा विविध प्रकारचे हेल्मेट बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी फुल-फेस हेल्मेट डोके आणि हनुवटीचे अधिक संरक्षण देत असल्याने ते सर्वाधिक सुरक्षित मानले जाते. वापराच्या गरजेनुसार योग्य प्रकार निवडणे आवश्यक आहे.

हेल्मेट खरेदी करताना केवळ आकर्षक लूक पाहू नका. ISI प्रमाणपत्र, योग्य फिटिंग, दर्जेदार व्हिझर, आरामदायी रचना आणि सुरक्षित डिझाइन या गोष्टींची तपासणी केल्यास तुमचा प्रत्येक प्रवास अधिक सुरक्षित होऊ शकतो.

Car Stuck in Water: पाण्यात कार बंद पडलीये? घाबरू नका! ‘या’ ५ गोष्टी लक्षात ठेवा

Web Title: Helmet safety tips isi mark buying guide two wheeler safety india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 08:14 PM

Topics:  

  • auto mobile news
  • bike riding tips
  • Helmet

संबंधित बातम्या

Bike Riding Accessories: बाईक रायडिंग साठी प्रोफेशनल बाईक रायडरला कोणकोणत्या सुरक्षा साधनांची गरज भासते?
1

Bike Riding Accessories: बाईक रायडिंग साठी प्रोफेशनल बाईक रायडरला कोणकोणत्या सुरक्षा साधनांची गरज भासते?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.