(फोटो सौजन्य-AI एआय)
एक्सटेरियर डिझाईनमध्ये काय बदलतील?
गाडीच्या एकूण आकारात कोणताही मोठा बदल होणार नाही, मात्र डिझाईन ताजेतवाने ठेवण्यासाठी काही सूक्ष्म बदल केले जातील. नवे फ्रंट आणि रिअर बंपर, तसेच होंडाच्या नवीन जागतिक डिझाईन लँग्वेजवर आधारित ग्रिल. टेल-लॅम्प्सच्या लाईटिंग ग्राफिक्समध्ये बदल आणि नवीन डिझाईनचे प्रिसिजन-कट अलाय व्हील्स मिळण्याची शक्यता आहे.
केबिन आणि हाय-टेक फीचर्स
इंटिरियरमध्ये ग्राहकांना अधिक सोयीस्कर आणि आधुनिक फीचर्स पाहायला मिळतील. होंडा सिटीप्रमाणे यात १०.२५-इंचाची मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम दिली जाऊ शकते. सध्या ॲक्सेसरी म्हणून मिळणारे ३६०-डिग्री कॅमेरा आणि व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आता फॅक्टरी-फिटेड (इन-बिल्ट) फीचर्स म्हणून दिले जातील. नवीन अपहोल्स्ट्री आणि प्रीमियम केबिन ट्रिम्समुळे आतील लुक जास्त आकर्षक होईल.
प्रगत सुरक्षा आणि ADAS अपडेट
होंडाच्या सध्याच्या एलिव्हेटमध्ये ‘Honda Sensing’ अंतर्गत ॲडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन-कीप असिस्ट आणि इमर्जन्सी ब्रेकिंग सारखे फीचर्स मिळतात. मात्र, नवीन फेसलिफ्ट मॉडेलमध्ये होंडा सिटीप्रमाणे अधिक प्रगत ‘लेव्हल-२ ADAS’ सेफ्टी पॅकेज दिले जाण्याची दाट शक्यता आहे.
Honda UC3 VS TVS iQube: बजेट आणि रेंजच्या खेळात कोणती ई-स्कूटर ठरेल सर्वोत्तम? पाह इन डिटेल तुलना
इंजिन आणि परफॉर्मन्स
इंजिनमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही. यात पूर्वीप्रमाणेच १.५-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन मिळेल, जे १२१ hp पॉवर जनरेट करते. हे इंजिन ६-स्पीड मॅन्युअल आणि CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह येईल. यामध्ये हायब्रिड इंजिनचा पर्याय दिला जाणार नाही.
किंमत आणि स्पर्धा
नवीन होंडा एलिव्हेट फेसलिफ्टची संभाव्य किंमत रु. ११ लाख ते १७ लाखांच्या (एक्स-शोरूम) दरम्यान असण्याचा अंदाज आहे. मार्केटमध्ये तिची थेट स्पर्धा ह्युंदाई क्रेटा, किया सेल्टॉस, मारुती ग्रँड व्हिटारा, टोयोटा हायरायडर, मारुती व्हिक्टोरिस आणि स्कोडा कुशाक यांसारख्या गाड्यांशी असेल.






