फोटो सौजन्य: iStock
होंडाने भारतासह जगभरात दमदार कार ऑफर केल्या आहेत. सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळताना दिसत आहे. म्हणूनच तर होंडा देखील इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहे. आता कंपनीने जाहीर केले आहे की ते ऑक्टोबर 2025 च्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या जपान मोबिलिटी शो 2025 मध्ये आपल्या आगामी फ्यूचर मॉडेल्सचे प्रदर्शन करणार आहे.
यंदा जपान मोबिलिटी शो 2025 शोमध्ये फक्त कारच नव्हे, तर चार वर्ल्ड प्रीमियर आणि नवीन मोबिलिटी सोल्यूशन्सची झलकही पाहायला मिळणार आहे. होंडा या शोद्वारे दाखवू इच्छिते की त्याचे व्हिजन फक्त ऑटोमोबाइलपुरते मर्यादित नाही, तर मोबिलिटीला योग्य दिशा देण्याचा आहे.
शोमध्ये सर्वात पहिले Honda 0 Series SUV दिसणार आहे. ही एक नवीन इलेक्ट्रिक SUV असेल, जी प्रॅक्टिकलिटी आणि व्हॅल्यू लक्षात ठेवून डिझाइन केली गेली आहे. ही गाडी होंडा च्या ग्लोबल इलेक्ट्रिक फॅमिलीला अधिक मजबूत करेल आणि कंपनीच्या EV स्ट्रॅटेजीसाठी महत्वाची कडी ठरेल.
GST कमी झाल्याने Royal Enfield Hunter 350 साठी किती डाउन पेमेंट करावे लागेल?
होंडाचा आणखी एक मोठा सरप्राइज म्हणजे Honda Compact EV प्रोटोटाइप. हे खासकरून “Joy of Driving” थीमवर तयार केले गेले आहे. याची टेस्टिंग जपान, यूके आणि आशियातील अनेक देशांमध्ये सुरू आहे. छोटे आकार आणि स्मार्ट डिझाइनसह ही कार शहरी भागांसाठी परफेक्ट इलेक्ट्रिक कार ठरेल, जी उत्तम आणि सोपे ड्रायव्हिंग अनुभव देईल.
कार्ससोबतच, होंडा टू-व्हीलर सेगमेंटमध्येही इलेक्ट्रिक मोटरसायकल कॉन्सेप्ट सादर करेल, ज्यामध्ये डिझाइन आणि टेक्नॉलॉजीचा सुंदर संगम असेल. तसेच, होंडा e-MTB (इलेक्ट्रिक-असिस्ट माउंटन बाइक) देखील प्रदर्शित करेल, ज्याची थीम आहे Ride Natural, Reach New Peaks. हे 2023 मध्ये सादर केलेल्या कॉन्सेप्टचे प्रोडक्शन-रेडी वर्जन असेल.
Hero च्या ‘या’ दमदार बाईकमध्ये मिळणार क्रूज कंट्रोल, मिळणार धमाकेदार फीचर्स
याशिवाय, होंडा आपल्या नवीन कॉन्सेप्ट्ससोबत Honda Prelude, Honda N-ONE e, Honda CB1000F आणि CB1000F SE सारखी नुकतीच लॉंच झालेली प्रोडक्शन मॉडेल्सही शोमध्ये प्रदर्शित करेल.