फोटो सौजन्य: @royalenfield/X.com
आपली स्वतःची बाईक असावी ही प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. यातही अनेकांना आपल्याकडे रॉयल एन्फिल्डची बाईक असावी, असे वाटत असते. कंपनी सुद्धा भारतीय मार्केटमध्ये दमदार लूक आणि परफॉर्मन्स देणाऱ्या बाईक ऑफर करते. अशीच एक बाईक म्हणजे रॉयल एन्फिल्ड हंटर 350.
GST कमी झाल्याने रॉयल एनफील्ड हंटर 350 खरेदी करणे पूर्वीपेक्षा स्वस्त आणि सोपे झाले आहे. बाईकची एक्स-शोरूम किंमत आता 1.38 लाख रुपयांपासून सुरू होते. अशातच, जर तुम्ही या दिवाळीत हंटर 350 खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर बाईकची ऑन-रोड किंमत, डाउन पेमेंट आणि त्याच्या EMI बद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
रॉयल एनफील्ड हंटर 350 ची दिल्लीमध्ये ऑन-रोड किंमत अंदाजे 1.60 लाख रुपये आहे. या किंमतीत आरटीओ शुल्क, इंश्युरन्स आणि इतर शुल्क समाविष्ट आहेत. ही ऑन-रोड किंमत शहर आणि बाईक व्हेरिएंटनुसार बदलू शकते.
Hero च्या ‘या’ दमदार बाईकमध्ये मिळणार क्रूज कंट्रोल, मिळणार धमाकेदार फीचर्स
रॉयल एनफील्ड हंटर 350 खरेदी करण्यासाठी तुम्हाला किमान 10,000 रुपये डाउन पेमेंट म्हणून भरावे लागतील. यानंतर 1.50 लाख रुपये लोन म्हणून घेता येईल. जर तुमचा क्रेडिट स्कोअर चांगला असेल आणि हा लोन 9% व्याजदराने 3 वर्षांसाठी मंजूर झाला, तर EMI सुमारे 4,756 रुपये येईल. अशा परिस्थितीत, ही बाइक फायनान्स करायची असल्यास सर्व दस्तऐवज काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक आहे.
इंजिनच्या बाबतीत, हंटर 350 मध्ये 349cc J-सीरीज एयर-कूल्ड, सिंगल-सिलेंडर इंजिन दिले आहे. हे पावरट्रेन 20.2 BHP पॉवर आणि 27 Nm टॉर्क जनरेट करते. इंजिनसह 5-स्पीड गियरबॉक्स आणि स्लिप असिस्ट क्लच दिला गेला आहे. या नवीन कलर एडिशनसाठी बुकिंग आता रॉयल एनफील्ड डीलरशिप, ऑफिशियल वेबसाइट आणि ॲपपद्वारे सुरू झाली आहे.
Renault Kwid Facelift लवकरच होणार लॉन्च; कमी किमतीत स्टायलिश आणि आधुनिक कार
हंटर 350 ही TVS Ronin, Honda H’ness CB350/CB350 RS सारख्या रेट्रो स्टाइल बाईक्सना जबरदस्त टक्कर देते. याशिवाय Jawa 42 आणि Bullet 350 देखील तिच्या राइवल्समध्ये आहेत, जरी Jawa 42 किंचित महागड्या श्रेणीत येते.