Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honda Rebel 500 च्या 96 बाइक्स परत मागवल्या; स्टिअरिंगशी संबंधित पार्टमध्ये आढळला दोष!

होंडा रिबेल 500 च्या एप्रिल 2025 ते ऑगस्ट 2025 दरम्यान प्रोड्यूस झालेल्या 96 युनिट्ससाठी स्वेच्छेने रिकॉल जाहीर करण्यात आला आहे. हँडल-लॉक फिक्सिंग स्क्रू सैल होण्याची शक्यता असल्याने ही कारवाई केली जात आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 01, 2026 | 09:48 PM
Honda Rebel 500 च्या 96 बाइक्स परत मागवल्या; स्टिअरिंगशी संबंधित पार्टमध्ये आढळला दोष!
Follow Us
Follow Us:
  • होंडा रिबेल 500 च्या एप्रिल ते ऑगस्ट 2025 दरम्यान प्रोड्यूस झालेल्या 96 बाइक्स रिकॉल केल्या आहेत.
  • हँडल-लॉक स्क्रू सैल होण्याच्या शक्यतेमुळे स्टिअरिंगच्या हालचालीवर परिणाम होऊ शकतो.
  • नोव्हेंबरपासून Honda BigWing डीलरशिपवर प्रभावित बाइक्समधील स्क्रू मोफत बदलला जाणार आहे.
Honda Rebel 500 वर रिकॉलची कारवाई

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने भारतात Rebel 500 मोटरसायकलसाठी स्वेच्छेने रिकॉल जाहीर केला आहे. एप्रिल 2025 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत प्रोड्यूस झालेल्या 96 बाइक्स या रिकॉलमध्ये समाविष्ट आहेत. संबंधित मोटरसायकलींमध्ये हँडल-लॉक फिक्सिंग स्क्रूमध्ये संभाव्य दोष आढळल्याने ही कारवाई करण्यात येत आहे.

कंपनीच्या माहितीनुसार, असेंब्लीदरम्यान हँडल-लॉक फिक्सिंग स्क्रू योग्य टॉर्कने घट्ट न झाल्यास तो कालांतराने सैल होऊ शकतो. अशा परिस्थितीत स्टिअरिंगच्या हालचालीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अशा बाइक्समधील हा पार्ट मोफत बदलला जाणार आहे.

Honda CB 500 भारतात लॉन्च! 501 cc इंजिनसह मिळतील प्रीमियम फीचर्स; पाहा अजून काय आहे खास

नोव्हेंबरपासून सुरू होणार रिकॉल

होंडाच्या ऑफीशल माहितीनुसार, रिकॉल मोहिमेला नोव्हेंबर 2026 च्या पहिल्या आठवड्यापासून सुरुवात होणार आहे. प्रभावित कस्टमर्सना कंपनी फोन, ईमेल किंवा SMS द्वारे संपर्क करून सर्व्हिस अपॉइंटमेंट घेण्याची माहिती देणार आहे. या दुरुस्तीसाठी बाईक वॉरंटीमध्ये असणे आवश्यक नाही.

30 सप्टेंबर 2026 पर्यंत भारतात या समस्येशी संबंधित कोणतीही घटना नोंदवली गेलेली नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे. तरीही भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी सर्व संबंधित मोटरसायकलींमध्ये स्क्रू बदलण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.

VIN नंबरवरून बाईक रिकॉलमध्ये आहे का ते तपासा

कस्टमर्सना आपल्या Rebel 500 चा Vehicle Identification Number म्हणजेच VIN वापरून ही मोटरसायकल रिकॉलमध्ये समाविष्ट आहे की नाही, हे तपासता येईल. यासाठी होंडाच्या वेबसाइटवरील रिकॉल कॅम्पेन सेक्शनचा वापर करता येणार आहे. जवळच्या अधिकृत Honda BigWing डीलरशी संपर्क करूनही पुढील प्रक्रिया जाणून घेता येईल.

Honda CB350 ची किंमत ऐकून व्हाल खुश! बुकिंग करा फक्त Rs. 5,000 मध्ये

Rebel 500 मध्ये 471 cc इंजिन

भारतामध्ये Honda Rebel 500 मे 2025 मध्ये ₹5.12 लाख एक्स-शोरूम, गुरुग्राम किंमतीत लाँच करण्यात आली होती. सुरुवातीच्या डिलिव्हरी गुरुग्राम, मुंबई आणि बंगळुरू या 3 शहरांमध्ये जून 2025 पासून सुरू झाल्या.

ही मोटरसायकल ट्युब्युलर स्टील फ्रेमवर आधारित असून तिला बॉबर स्टाइल, फॅट टायर्स, LED लाइटिंग, सर्क्युलर हेडलॅम्प आणि 690 mm लो सीट हाइट मिळते. बाईकमध्ये 471 cc, 2-सिलिंडर, लिक्विड-कूल्ड पेट्रोल इंजिन असून ते 45.6 bhp पॉवर आणि 43.3 Nm टॉर्क तयार करते. इंजिनसोबत 6-स्पीड गिअरबॉक्स आणि ड्युअल-चॅनल ABS देण्यात आले आहे.

Web Title: Honda rebel 500 recall india handle lock screw issue auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 01, 2026 | 09:48 PM

Topics:  

  • automobile
  • Bikes
  • Honda

संबंधित बातम्या

Royal Enfield ची विक्रमी कामगिरी! सप्टेंबरमध्ये 1.34 लाखांहून जास्त बाइक्सची विक्री
1

Royal Enfield ची विक्रमी कामगिरी! सप्टेंबरमध्ये 1.34 लाखांहून जास्त बाइक्सची विक्री

एप्रिलिया SXR GT 175 आणि SXR GT 125 भारतात लाँचसाठी सज्ज; बुकिंग सुरू
2

एप्रिलिया SXR GT 175 आणि SXR GT 125 भारतात लाँचसाठी सज्ज; बुकिंग सुरू

Hyundai चा नवा विक्रम! एका महिन्यात 77,916 वाहनांची विक्री, एक्सपोर्टमध्येही जोरदार वाढ
3

Hyundai चा नवा विक्रम! एका महिन्यात 77,916 वाहनांची विक्री, एक्सपोर्टमध्येही जोरदार वाढ

Maruti Suzuki ची सप्टेंबरमध्ये धडाकेबाज विक्री; 2.36 लाख गाड्या विकल्या, 24% वाढ
4

Maruti Suzuki ची सप्टेंबरमध्ये धडाकेबाज विक्री; 2.36 लाख गाड्या विकल्या, 24% वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.