फोटो सौजन्य: @ZattarRafael (X.com)
भारतातील ऑटो बाजारात अनेक बेस्ट कार ऑफर केल्या जातात, ज्यांची विक्री कधी वाढते तर कधी कमी होते. नुकतेच एप्रिल 2025 मधील कार सेल्सचा रिपोर्ट जारी करण्यात आला आहे. यात काही कार्सची विक्री कमी झाली आहे तर काहींची वाढली आहे. पण एका कारच्या सेल्स परफॉर्मन्सने सर्वानांच चकित केले आहे.
Hyundai Creta पुन्हा एकदा भारतातील सर्वाधिक विक्री होणारी कार एसयूव्ही बनली आहे. एप्रिल 2025 मध्ये ह्युंदाई क्रेटाचे एकूण 17,016 मॉडेल्स विकले गेले, जे एप्रिल 2024 पेक्षा 10.2% जास्त आहे. क्रेटाची विक्री ज्या पद्धतीने होताना दिसत आहे त्यावरून एवढे नक्की की एसयूव्ही सेगमेंटमध्ये ही कार एकतर्फी आपले वर्चस्व गाजवत आहे.चला या कारच्या विक्रीबद्दल जाणून घेऊयात.
Kawasaki Bikes वर मिळतेय भरभरून सूट, ‘या’ बाईकवर सर्वाधिक डिस्काउंट
जानेवारी ते एप्रिल 2025 पर्यंत ह्युंदाई क्रेटाने एकूण 69,914 युनिट्स विकल्या आहेत. या विक्रीच्या आकडेवारीसह, क्रेटाने आपले स्थान बनवून ठेवले आहे. या आकड्यांवरूनच कळते की क्रेटा लोकांना किती आवडते. कंपनीने माहिती दिली आहे की क्रेटाचे आतापर्यंत 1.2 दशलक्ष युनिट्स विकले गेले आहेत.
ह्युंदाईच्या एकूण एसयूव्ही विक्रीत क्रेटाच्या विक्रीनेही मोलाची भूमिका बजावली आहे. एप्रिल 2025 मध्येच कंपनीच्या एसयूव्ही विक्रीपैकी 70.9% विक्री एकट्या क्रेटाकडून झाली आहे. या आकडेवारीवरून असे दिसून येते की क्रेटा ही केवळ एक लोकप्रिय एसयूव्ही नसून ती ह्युंदाईसाठी सर्वात महत्त्वाची कार देखील आहे.
ह्युंदाई क्रेटामध्ये पॅनोरॅमिक सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा आणि ADAS सह 10.25-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोलसह एसी, वायरलेस फोन चार्जर, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि 8-स्पीकर बोस साउंड सिस्टमसह 6 एअरबॅग्ज आणि TPMS यासह अनेक उत्तम सेफ्टी फीचर्स दिले आहे.
आपल्याच Wagon R आणि Baleno वर भारी पडली Maruti ची ‘ही’ कार, मार्केटमध्ये पाहायला मिळतेय वेगळीच क्रेझ
ही कार तीन इंजिन पर्यायांसह उपलब्ध आहे, ज्यात 1.5-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, 1.5-लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 1.5-लिटर डिझेल इंजिनचा समावेश आहे. यात प्रत्येक इंजिनसह 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स मिळते. त्याच वेळी, त्याच्या अनेक व्हेरियंटमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स देण्यात आला आहे.
भारतीय मार्केटमध्ये, ह्युंदाई क्रेटा 11.11 लाख रुपयांपासून 20.50 लाख रुपयांपर्यंतच्या किमतीत उपलब्ध आहे. भारतात, ही कार किया सेल्टोस, मारुती सुझुकी ग्रँड व्हिटारा आणि स्कोडा कुशक सारख्या कारशी स्पर्धा करते.