फोटो सौजन्य: iStock
भारतीय मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये बाईक ऑफर केल्या जातात. यात आता स्पोर्ट बाईक सेगमेंटमधील बाईक्सना दमदार मागणी मिळत आहे. स्टायलिश लूक आणि उत्तम परफॉर्मन्स यामुळे भारतात स्पोर्ट बाईकची विक्री सातत्याने वाढताना दिसत आहे.
भारतात स्पोर्ट बाईक ऑफर करणाऱ्या अनेक कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या मागणीनुसार बेस्ट लूक असणाऱ्या बाईक ऑफर करत असतात. यातीलच एक कंपनी म्हणजे कावासाकी. आता कंपनीने येत्या मे २०२५ मध्ये सवलत ऑफर जाहीर केली आहे. कावासाकी त्यांच्या ‘समर कार्निव्हल: बिग राइड्स, बिगर सेविंग्स!’ ची घोषणा केली आहे. डिस्काउंट ऑफर अंतर्गत, भारतात विकल्या जाणाऱ्या जवळजवळ सर्व बाईक्सवर सूट दिली जात आहे. डिस्काउंटसोबतच कंपनी कॅशबॅक ऑफर देत आहे. ही डिस्काउंट कावासाकी बाईकवर 31 मे 2025 पर्यंत किंवा स्टॉक संपेपर्यंत दिली जात आहे.
कावासाकी निन्जा 500 वर 45000 रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे. भारतात, ती 5.24 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. यात 451 सीसी लिक्विड-कूल्ड, पॅरलल-ट्विन इंजिन वापरले आहे, जे 45 बीएचपी पॉवर आणि 42.6 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन स्लिप-अँड-असिस्ट क्लचसह सहा-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे.
2024 ची कावासाकी Z900 वर 40,000 रुपयांचे डिस्काउंट मिळत आहे. भारतात याची एक्स-शोरूम किंमत 9.29 लाख रुपये आहे. यात 948 सीसी, लिक्विड-कूल्ड, इनलाइन-फोर इंजिन वापरले आहे, जे 123.6 बीएचपी पॉवर आणि 98.6 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन सहा-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. हे मेटॅलिक स्पार्क ब्लू आणि मेटॅलिक मॅट ग्राफीन स्टील ग्रे रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.
Kawasaki Ninja ZX-10R खरेदीवर 30,000 रुपयांचे EMI कॅशबॅक व्हाउचर दिले जात आहे. भारतात त्याची एक्स-शोरूम किंमत 18.50 लाख रुपये आहे. यात 998 सीसी इनलाइन-फोर-सिलेंडर लिक्विड-कूल्ड इंजिन वापरले आहे, जे 200 बीएचपी पॉवर आणि 114.9 एनएम टॉर्क जनरेट करते. त्याचे इंजिन सहा-स्पीड ट्रान्समिशनशी जोडलेले आहे, ज्यामध्ये क्विक शिफ्टर देखील आहे.
Hyundai आणि Tata ला मागे सोडत ‘या’ कंपनीच्या SUV वर ग्राहक पडलेत तुटून, विक्रीत दिसली मोठी वाढ
मिडलवेट स्पोर्ट्स टूरर बाईक कावासाकी निन्जा 650 वर 25,000 रुपयांपर्यंत सूट दिली जात आहे. या डिस्काउंटसह, बाईकची एक्स-शोरूम किंमत 7.27 लाख रुपये आहे. यात 649 सीसी लिक्विड-कूल्ड पॅरलल-ट्विन इंजिन वापरले आहे, जे 67.3 बीएचपी पॉवर आणि 64.0 एनएम टॉर्क जनरेट करते.
वरील बाईक्स व्यतिरिक्त Kawasaki Ninja 300, Kawasaki Versys 650, Kawasaki Eliminator आणि Kawasaki Ninja 1100 SX बाईकवर दमदार डिस्काउंट देत आहे.