फोटो सौजन्य: iStock
Jain community bought luxury cars: भारतात आपल्या असे अनेक समाज पाहायला मिळणार, जे पिढ्यानपिढ्या नोकरी करण्यापेक्षा व्यापाऱ्यात कार्यरत आहेत. असाच एक समाज म्हणजे जैन समाज. या समाजातील जास्तीतजास्त लोकं आपल्याला कुठल्याना कुठल्या व्यापारात दिसतात म्हणजेच दिसताच. तसेच हा समुदाय त्यांच्या बिझनेस माइंडमुळे देखील ओळखला जातो. नुकतेच गुजरातमधील जैन समाजाने त्यांचा हाच बिझनेस माइंड पुन्हा एकदा दाखवून दिला आहे.
अहमदाबादमधील जैन समाजाने Jain International Trade Organisation या संघटनेच्या सोबतीने पूर्ण भारतात तब्बल 186 लक्झरी कार खरेदी केल्या आहेत. या सामूहिक खरेदीमुळे त्यांनी तब्ब्ल 21.22 कोटी रुपयांची मोठी बचत सुद्धा केली आहे. यावरून पुन्हा अधोरेखित झाले आहे की फक्त पैसे कमावणेच कला नसून तो कसा खर्च करावा ही देखील एक कला आहे.
या करारांतर्गत खरेदी केलेल्या कार्सची किंमत 60 लाख ते 1.34 कोटी रुपयांपर्यंत होती. या कार्समध्ये Audi, BMW, Mercedes आणि इतर टॉप ब्रँडचा समावेश होता. ही खरेदी अहमदाबादसह गुजरातमधील लोकांनी मोठ्या प्रमाणात केली, ज्यांनी या देशव्यापी सामूहिक करारात महत्त्वाची भूमिका बजावली.
तुमच्या सुरक्षेत तडजोड करू नका! भारतातील ‘या’ सर्वात स्वस्त कारमध्ये 6 एअरबॅग्सचा ऑप्शन
JITO चे उपाध्यक्ष हिमांशु शाह यांनी सांगितले की, “जेव्हा आपला समाज एकत्रितपणे खरेदी करतो, तेव्हा आपली सौदेबाजी करण्याची ताकद वाढते. ब्रँड्सलाही याचा फायदा होतो, कारण त्यांना एकाच वेळी मोठ्या प्रमाणात विक्री मिळते आणि जाहिरातीसाठी होणारा खर्चही कमी होतो. दुसऱ्या बाजूला, आमच्या सदस्यांना या उपक्रमातून थेट सवलतीच्या स्वरूपात फायदा मिळतो.”
ते पुढे म्हणाले की, “या एका उपक्रमातूनच JITO च्या सदस्यांनी एकूण 149.54 कोटी रुपयांच्या लक्झरी गाड्या खरेदी केल्या असून, सामूहिकरीत्या सुमारे 21.22 कोटी रुपयांची बचत साधली आहे.”
या यशानंतर, JITO ने ‘कम्युनिटी परचेसिंग’साठी स्वतंत्र विभाग स्थापन केला आहे. आता ही संस्था इलेक्ट्रॉनिक्स, औषधे, दागदागिने आणि इतर विविध क्षेत्रांमध्येही अशा सामूहिक खरेदीच्या योजना राबवण्याचा विस्तार करत आहे, जेणेकरून समाजातील लोकांना अधिकाधिक क्षेत्रांमध्ये सामूहिक बचतीचा लाभ मिळू शकेल.
फक्त जैन समाजच नव्हे, तर गुजरातमधील भरवाड समाज देखील आता हाच मॉडेल थोड्या वेगळ्या पद्धतीने स्वीकारत आहे. भरवाड युवा संघटना, गुजरात यांनी अलीकडेच 121 JCB मशिन्सची सामूहिक खरेदी केली असून, प्रत्येक मशिनवर सरासरी 3.3 लाख रुपयांची सवलत मिळवली आहे. या उपक्रमातून समुदायाने एकूण सुमारे 4 कोटी रुपयांची बचत साधली आहे.