(फोटो सौजन्य-AI एआय)
जावा येझदी मोटरसायकलने भारतीय बाजारात नवीन ‘जावा ऑल स्टार्स ४२ एफजे’ (Jawa All Stars 42 FJ) लाँच केली आहे. दिल्लीमध्ये या नवीन मोटरसायकलची एक्स-शोरूम किंमत २.०२ लाख रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या मते, ही नवीन एडिशन ‘जावा ऑल स्टार्स’ ब्रँडच्या ओळखीची सुरुवात असून ती चारित्र्य, आचरण आणि धाडस या संकल्पनेवर आधारित आहे.
रंग पर्याय आणि डिझाइन
या नवीन मोटरसायकलमध्ये मेकॅनिकल बदल करण्यात आलेले नाहीत, मात्र क्रोम फिनिशसह एकूण सहा आकर्षक रंगांचे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये अरोरा ग्रीन, क्रोम, मॅट ब्लॅक विथ ब्लॅक क्लेड, मॅट ब्लॅक विथ रेड क्लेड, नेब्युला ब्लू आणि रेड या रंगांचा समावेश आहे. स्टँडर्ड मॉडेलपेक्षा वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी यात ब्रश केलेल्या एल्युमिनियम टँक पॅनल्स, अधिक स्पोर्टी लूक आणि अतिरिक्त डिझाइन डिटेल्स देण्यात आले आहेत. तसेच यात ऑल-एलईडी लायटिंग आणि पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचा समावेश आहे.
Jawa Yezdi Roadster Red Wolf ची ऑनलाइन एन्ट्री; Amazon-Flipkart वर विक्री सुरू
इंजिन आणि परफॉर्मन्स
या बाइकचे इंजिन पूर्वीप्रमाणेच ३३४ सीसी, लिक्विड-कूल्ड, डीओएचसी सिंगल-सिलिंडर आहे. हे इंजिन ७,५०० आरपीएमवर २९.१७ पीएस पॉवर आणि ५,५०० आरपीएमवर २९.६२ एनएम पीक टॉर्क निर्माण करण्यास सक्षम आहे. पॉवर ट्रान्समिशनसाठी इंजिनला ६-स्पीड गिअरबॉक्स जोडण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, या श्रेणीतील इतर ३५0 सीसी मोटरसायकलच्या तुलनेत हे इंजिन ४२ टक्क्यांपर्यंत अधिक पॉवर देते, ज्यामुळे ही बाइक निओ-क्लासिक श्रेणीत अधिक स्पोर्टी ठरते.
चेसिस आणि ब्रेकिंग सिस्टीम
ही मोटरसायकल डबल-क्रेडल फ्रेमवर आधारित असून, यात ४१ मिमी टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क आणि ५-स्टेप प्रिलोड अड्जस्टमेंटसह गॅस-फिल्ड ट्विन रियर शॉक अब्जॉर्बर दिले आहेत. ब्रेकिंगसाठी यामध्ये ड्युअल-चॅनल एबीएस सिस्टीमसह पुढे ३२० मिमी डिस्क आणि मागे २४० मिमी डिस्क ब्रेक दिला आहे. ही बाईक पुढे १०००/९०-१८ आणि मागे १४०/७० R१७ आकाराच्या टायरवर चालते. तसेच यात ७९० मिमी सीटची उंची, १७८ मिमी ग्राउंड क्लिनिझन्स आणि १२ लिटर क्षमतेची इंधन टाकी दिली आहे.
बाईकची सीट मॉडीफाय करायची आहे? या आहेत काही बेस्ट आयडिया आणि जरुरी गोष्टी
मालकी हक्क आणि वारंटी कार्यक्रम
जावा येझदी मोटरसायकल आपल्या ग्राहकांसाठी ‘ओनरशिप अॅश्युरन्स प्रोग्राम’ देखील देत आहे. यामध्ये ४ वर्षे किंवा ५०,००० किमीची मानक वारंटी, ६ वर्षांपर्यंतचे विस्तारित वारंटी पर्याय, ८ वर्षांपर्यंत रोडसाईड असिस्टन्स आणि ५ वर्षांपर्यंतचा एएमसी (AMC) समाविष्ट आहे. हा कार्यक्रम भारतातील ४५० हून अधिक विक्री आणि सेवा केंद्रांवर उपलब्ध आहे. ऑल स्टार्स ४२ एफजे देशभरातील सर्व अधिकृत जावा येझदी डीलरशिपवर विक्रीसाठी उपलब्ध असेल.






