Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाँचही नाही अन् सगळ्या गाड्या सोल्ड आउट! Jeep Wrangler Rubicon Whitecap Edition च्या भारतातील सर्व 25 युनिट्सची विक्री कम्प्लीट

जीपची Jeep Wrangler Rubicon Whitecap Edition भारतात लाँच होण्याआधीच सोल्ड आउट झाली आहे. 73.55 लाख रुपये किंमत असलेल्या या खास एसयूव्हीची सर्व 25 युनिट्स विकली गेली आहेत. पण या लिमिटेड एडिशनमध्ये असे काय खास आहे, ज्यामुळे लाँचपूर्वीच तिची एवढी क्रेझ निर्माण झाली?

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Oct 13, 2026 | 08:46 PM
लाँचही नाही अन् सगळ्या गाड्या सोल्ड आउट! Jeep Wrangler Rubicon Whitecap Edition च्या भारतातील सर्व 25 युनिट्सची विक्री कम्प्लीट
Follow Us
Follow Us:
  • Jeep Wrangler Rubicon Whitecap Edition ची भारतासाठी राखीव असलेली सर्व 25 युनिट्स लाँचपूर्वीच विकली गेली.
  • 73.55 लाख रुपये एक्स-शोरूम किंमत, हिरवा-पांढरा लूक आणि खास डिझाइन ही एसयूव्हीची प्रमुख आकर्षणे आहेत.
  • 270 hp पॉवर, 400 Nm टॉर्क आणि दमदार ऑफ-रोडिंग सिस्टीममुळे ही स्पेशल एडिशन लक्ष वेधते.

जीप इंडियाच्या खास एसयूव्हीची चर्चा सध्या ऑटोमोबाईल क्षेत्रात हंगामा करत आहे. Jeep Wrangler Rubicon Whitecap Edition ही स्पेशल एडिशन एसयूव्ही भारतात ऑफीशली लाँच होण्याआधीच सोल्ड आउट झाली आहे. कंपनीने भारतासाठी राखून ठेवलेल्या सर्व 25 युनिट्सची विक्री पूर्ण झाल्याची माहिती दिली आहे. या एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 73.55 लाख रुपये असून, डिलिव्हरी ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुरू होण्याची अपेक्षा आहे.

या स्पेशल एडिशनचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे तिचा हिरवा आणि पांढरा रंगसंगतीतील लूक. ही एसयूव्ही खास Mojito Green रंगात सादर करण्यात आली आहे. त्यावर Bright White रंगाचे हार्डटॉप रूफ आणि 7-स्लॉट फ्रंट ग्रिल देण्यात आली आहे. बॉडीवरील खास ग्राफिक्स, बाजूला असलेले ‘1941’ डेकल्स आणि मागील बाजूवरील पांढऱ्या रंगातील ‘4 Wheel Drive’ ग्राफिकमुळे तिचा लूक नेहमीच्या रँग्लरपेक्षा वेगळा दिसतो.

ना नोटा, ना गड्ड्या… पट्ठ्याने 12 हजार 10 रुपयांची नाणी देऊन खरेदी केली होंडा अ‍ॅक्टिव्हा! जाणून घ्या हा भन्नाट किस्सा

या डिझाइनमागे जीपच्या जुन्या मॉडेलची प्रेरणा आहे. मूळ Jeep CJ-Universal मध्ये असलेल्या पांढऱ्या छताच्या डिझाइनची आठवण Whitecap Edition करून देते. जीपच्या 85 वर्षांच्या इतिहासाचा गौरव करण्यासाठी ही स्पेशल एडिशन तयार करण्यात आली आहे. जगभरात या एडिशनची केवळ 250 युनिट्सची मर्यादित संख्या असून, त्यातील 25 युनिट्स भारतासाठी राखीव होती.

इंजिनच्या बाबतीत या एसयूव्हीमध्ये नेहमीच्या Rubicon प्रमाणेच 2.0-लिटर, 4-सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 270 hp पॉवर आणि 400 Nm टॉर्क निर्माण करते. त्याला 8-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सची जोड मिळते. जीपची 4-व्हील-ड्राइव्ह सिस्टीम, Rock-Trac सिस्टीम आणि 4:1 लो-रेंज ट्रान्सफर केस यामुळे ही एसयूव्ही कठीण ऑफ-रोड मार्गांवरही दमदार कामगिरी करण्यासाठी सज्ज आहे. पुढील आणि मागील बाजूस इलेक्ट्रॉनिक लॉकिंग डिफरेंशियल्स तसेच इलेक्ट्रॉनिक फ्रंट स्टॅबिलायझर-बार डिस्कनेक्टसारखी ऑफ-रोड वैशिष्ट्येही मिळतात.

मर्सिडीज-बेंझच्या प्लग-इन हायब्रिड कारसाठी जास्त पैसे मोजण्यास कस्टमर तयार! असं काय आहे या टेक्नोलॉजीत खास?

फीचर्समध्ये 12.3-इंच Uconnect 5 टचस्क्रीन, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto यांचा समावेश आहे. पुढील सीट्सना 12-वे इलेक्ट्रिक अ‍ॅडजस्टमेंटची सुविधाही मिळते. भारतातील या एडिशनला मिळालेल्या प्रतिसादानंतर भविष्यात आणखी युनिट्स आणण्याचा विचार केला जाऊ शकतो, असे कंपनीने सूचित केले आहे. त्यामुळे ही मर्यादित एडिशन पुन्हा भारतात येणार का, याकडे जीपप्रेमींचे लक्ष लागले आहे.

Web Title: Jeep wrangler rubicon whitecap edition sold out india launch price features auto news marathi ar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 08:46 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

ना नोटा, ना गड्ड्या… पट्ठ्याने 12 हजार 10 रुपयांची नाणी देऊन खरेदी केली होंडा अ‍ॅक्टिव्हा! जाणून घ्या हा भन्नाट किस्सा
1

ना नोटा, ना गड्ड्या… पट्ठ्याने 12 हजार 10 रुपयांची नाणी देऊन खरेदी केली होंडा अ‍ॅक्टिव्हा! जाणून घ्या हा भन्नाट किस्सा

मर्सिडीज-बेंझच्या प्लग-इन हायब्रिड कारसाठी जास्त पैसे मोजण्यास कस्टमर तयार! असं काय आहे या टेक्नोलॉजीत खास?
2

मर्सिडीज-बेंझच्या प्लग-इन हायब्रिड कारसाठी जास्त पैसे मोजण्यास कस्टमर तयार! असं काय आहे या टेक्नोलॉजीत खास?

KTM अन् TVS ला टक्कर द्यायला कावासाकीची Z300 मैदानात! 20 ऑक्टोबरला होणार मोठा खुलासा
3

KTM अन् TVS ला टक्कर द्यायला कावासाकीची Z300 मैदानात! 20 ऑक्टोबरला होणार मोठा खुलासा

ई-स्प्रिंटो G1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच! किंमत 89,999 रुपयांपासून सुरु; मिळणार130 किमीपर्यंत रेंज
4

ई-स्प्रिंटो G1 इलेक्ट्रिक स्कूटर लाँच! किंमत 89,999 रुपयांपासून सुरु; मिळणार130 किमीपर्यंत रेंज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.