
‘इंडिया कावासाकी मोटर्स’ने आपली प्रसिद्ध ट्विन-सिलेंडर सुपरस्पोर्ट बाइक Kawasaki Ninja 300 नव्या अवतारात भारतीय बाजारात लाँच केली आहे. या अपडेटेड मॉडेलची एक्स-शोरूम किंमत ₹३.३४ लाख ठेवण्यात आली असून, जुन्या मॉडेलच्या तुलनेत ही किंमत ₹१७,००० ने वाढली आहे. ही बाइक भारतीय बाजारातील सर्वाधिक काळ टिकून राहिलेल्या ट्विन-सिलेंडर बाइक्सपैकी एक आहे.
किया इंडियाची नवी ‘सिरॉस ईव्ही’ लाँच; १३.४९ लाख रुपयांपासून आकर्षक किमतीत उपलब्ध
काय आहेत फीचर्स?
नव्या २०२७ मॉडेलमध्ये मेकॅनिकल स्वरूपाचे कोणतेही मोठे बदल करण्यात आलेले नाहीत. मात्र, कावासाकीने या बाइकच्या फेअरिंगवर नवीन डिझाइनचे आकर्षक ग्राफिक्स दिले आहेत. तसेच तिची ओळख असलेली सिग्नेचर ‘लाइम ग्रीन’ कलर स्कीम कायम ठेवली आहे. टायर्सचा आकार पूर्वीसारखाच १७-इंच अॅलॉय व्हील्स असला, तरी त्यांच्या ‘ट्रेड पॅटर्न’मध्ये बदल करण्यात आला आहे, ज्यामुळे रस्त्यावर अधिक चांगली ग्रिप आणि रायडिंग करताना उत्तम फीडबॅक मिळेल. याव्यतिरिक्त बाइकचे बॉडीवर्क, लाईटिंग आणि विंडस्क्रीन पूर्वीप्रमाणेच ठेवण्यात आले आहे.
इंजिन आणि पावर
इंजिनच्या बाबतीत बाइकमध्ये तेच विश्वासू २९६ सीसी, लिक्विड-कुल्ड, पॅरारेल-ट्विन इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन ११,००० rpm वर ३९ PS ची पॉवर आणि १०,००० rpm वर २६.१ Nm चा टॉर्क जनरेट करते. यात ६-स्पीड गिअरबॉक्ससह असिस्ट अँड स्लिपर क्लच स्टँडर्ड म्हणून मिळतो.
हॅचबॅक मार्केटमध्ये मारुती अल्टोचा डबल धमाका; ह्युंदाई i20 आणि टाटा अल्ट्रोझची मोठी घसरण!
हार्डवेअर आणि इतर गोष्टी
हार्डवेअरचा विचार केल्यास ही बाइक स्टील-ट्यूब डायमंड फ्रेमवर आधारित आहे. सस्पेंशनसाठी पुढे ३७ मिमी टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागे युनि-ट्रॅक मोनोशॉक सस्पेंशन दिले आहे. ब्रेकिंगसाठी ड्युअल-चॅनल ABS सह दोन्ही चाकांना डिस्क ब्रेक्स मिळतात. या बाइकचे एकूण वजन १७९ किलोग्रॅम असून यात १७ लिटर क्षमतेची फ्युएल टँक देण्यात आली आहे.
गेल्या एका दशकाहून अधिक काळापासून भारतीय ऑटोमोबाईल बाजारात असलेली निन्जा ३०० आजही लोकप्रिय आहे. सध्या बाजारात इतर ब्रँड्सच्या सिंगल-सिलेंडर बाइक्सशी मोठी स्पर्धा सुरू असली, तरी या बाइकचे ट्विन-सिलेंडर इंजिन आणि फेअर्ड सुपरस्पोर्ट लुक्स आजही रायडिंग शौकिनांमध्ये तिचे वेगळे स्थान टिकवून आहेत.