
किया इंडिया या देशातील आघाडीच्या मास-प्रीमियम वाहन उत्पादक कंपनीने आज आपली दुसरी मेड-इन-इंडिया मास-मार्केट इलेक्ट्रिक वेईकल किया सिरॉस ईव्ही लाँच केली. या ईव्हीची आकर्षक सुरुवातीची किंमत ४२ केडब्ल्यू व्हेरिएंटसाठी १३.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आणि ५१.४ केडब्ल्यू एक्सटेंडेड रेंज व्हेरिएंटसाठी १६.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटी अधिक सुलभ बनवण्याच्या आपल्या कटिबद्धतेला अधिक दृढ करत कियाने या किमतीसोबत उद्योगातील सर्वात प्रबळ मालकीहक्क प्रस्ताव सादर केला आहे – उद्योगातील सर्वोत्तम अॅश्युअर्ड बायबॅक उपक्रम, बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस (बीएएएस) आणि लाईफटाईम हाय व्होल्टेज बॅटरी वॉरंटी, ज्यामुळे इलेक्ट्रिक वेईकलचा अवलंब करणे अधिक परवडणारे, खात्रीशीर आणि चिंतामुक्त होते. सिरॉस ईव्हीची विक्री ३० जुलै २०२६ पासून देशभरातील किया डीलरशिप्सवर सुरु होईल.
इलेक्ट्रिक वेईकलचा अवलंब वाढवण्यासाठी केवळ एका उत्तम उत्पादनापेक्षा संपूर्ण मालकीच्या प्रवासात वास्तविक आत्मविश्वास आणि मूल्याची गरज असते, या किया इंडियाच्या विश्वासाचे सिरॉस ईव्ही प्रतिनिधित्व करते. भारतात निर्मित सिरॉस ईव्ही प्रगतीशील डिझाइन, या श्रेणीतील सर्वात सर्वसमावेशक ईव्ही मालकी परिसंस्थेच्या पाठबळासह सेगमेंटमधील अग्रगण्य कार्यक्षमता एकत्र आणते.
या घोषणेबाबत मत व्यक्त करत किया इंडियाचे मॅनेजिंग डायरेक्टर व सीईओ ग्वांगु ली म्हणाले, “कियामध्ये प्रत्येक उत्पादनाची सुरुवात एका प्रश्नाने होते, आम्ही ग्राहकांसाठी अधिक मूल्य कसे निर्माण करू शकतो? सिरॉस ईव्ही कोणतीही तडजोड न करता इलेक्ट्रिक मोबिलिटी अधिक सुलभ बनवून या प्रश्नाचे उत्तर देते. एका आकर्षक किमतीच्या पलीकडे, आम्ही आज भारतातील सर्वोत्कृष्ट अशा ८० टक्क्यांपर्यंत रिसेल मूल्य देणाऱ्या अॅश्युअर्ड बायबॅक उपक्रमासह उद्योगातील सर्वात आत्मविश्वासपूर्ण मालकी प्रस्ताव डिझाइन केला आहे, सोबत बीएएएसमुळे ईव्ही मालकीमध्ये सर्वात सुलभ प्रवेश मिळतो आणि लाईफटाईम बॅटरी वॉरंटी दीर्घकालीन बॅटरीचा आत्मविश्वास प्रदान करते, जी ईव्हीच्या अवलंबामध्ये अडथळा आणणाऱ्या मुख्य समस्या दूर करते. ५२६ किमीची सेगमेंटमधील अग्रगण्य रेंज आणि १७१ पीएस कार्यक्षमता, प्रगत तंत्रज्ञान आणि कियाच्या वाढत्या ईव्ही परिसंस्थेसह, सिरॉस ईव्ही प्रत्येक निर्णयात ग्राहकांच्या गरजा केंद्रस्थानी ठेवून भारताचे शाश्वत मोबिलिटीकडील रूपांतरण जलद करण्याप्रती आमच्या कटिबद्धतेला सादर करते.”
उद्योगातील अग्रगण्य मालकी फायदे: ईव्हीची मालकी अधिक सुलभ बनवण्यासाठी, सिरॉस ईव्ही कियाच्या बॅटरी-अॅज-अ-सर्व्हिस (बीएएएस) उपक्रमासह लाँच करण्यात आली आहे, ज्यामध्ये चेसिस आणि बॅटरीचा स्वतंत्रपणे फायनान्स करणाऱ्या ड्युअल-लोन मॉडेलच्या रूपात स्थिर आर्थिक पर्याय दिले जातात. या वेईकलची मालकी ७.९९ लाख रुपयांपासून सुरू होते, सोबत प्रति किलोमीटर ३.३ रुपयांचा पारदर्शक बॅटरी ईएमआय दिला जातो, ज्यामुळे किया सिरॉस ईव्हीच्या मालकीचा अनुभव अधिक परवडणारा आणि सुलभ होतो.
प्रत्येक सिरॉस ईव्हीला अमर्याद किलोमीटरसह १५ वर्षांच्या लाईफटाईम हाय व्होल्टेज बॅटरी वॉरंटी* चे पाठबळ आहे, जे आपल्या बॅटरी तंत्रज्ञानावरील कियाचा विश्वास पुन्हा दृढ करते आणि ग्राहकांना त्यांच्या ईव्हीच्या सर्वात मौल्यवान घटकाबाबत पूर्ण मनःशांती देते.
भारतीय बाजारात किया कॅरेन्सचा जलवा! तब्बल ३ लाख गाड्यांची विक्री पूर्ण
ईव्हीचा अवलंब करण्यातील सर्वात मोठ्या अडथळ्यांपैकी एक असलेल्या रिसेल मूल्याबाबतची अनिश्चितता दूर करत सिरॉस ईव्हीला उद्योगातील सर्वोत्तम अॅश्युअर्ड बायबॅक उपक्रमाचे पाठबळ आहे, जो ३ वर्षांनंतर ८० टक्क्यांपर्यंत प्रास्ताविक रिसेल मूल्य* प्रदान करतो. हे आज भारतातील कोणत्याही वाहनासाठी दिलेले सर्वात उच्च खात्रीशीर बायबॅक मूल्य आहे. ग्राहक ३ किंवा ४ वर्षांच्या कालावधीच्या पर्यायांसह स्थिर वार्षिक मायलेज पर्याय निवडू शकतात आणि त्यांच्या निवडलेल्या कालावधीच्या शेवटी वेईकल स्वतःकडे ठेवू शकतात, परत करू शकतात किंवा बदलून घेऊ शकतात.
या मालकी प्रस्तावाला पूरक म्हणून, किया सिरॉस ईव्हीसाठी माय कन्वीनियन्स ई-प्लस सादर करत आहे, जे देखभाल, विस्तारित वॉरंटी आणि रोडसाईड असिस्टन्स एकत्र आणणारे सर्वसमावेशक पॅकेज आहे. हे पॅकेज दोन स्तरांमध्ये उपलब्ध आहे – ४ वर्षांचे प्रीमियम पॅकेज आणि ४थ्या व ५व्या वर्षात विस्तारित रोडसाईड असिस्टन्स कव्हरेजसह ५ वर्षांचे लक्झरी पॅकेज.
नेतृत्व करण्यासाठी डिझाइन करण्यात आलेली ईव्ही:
सिरॉस ईव्ही दोन बॅटरी पर्यायांसह लाँच करण्यात आली आहे — ५१.४ केडब्ल्यूएच बॅटरी, जी ५२६ किमीची (एमआयडीसी फुल) एआरएआय-प्रमाणित सेगमेंटमधील सर्वोत्तम रेंज देते, ज्यामुळे ५०० किमी रेंजचा टप्पा ओलांडणारी या सेगमेंटमधील पहिली वेईकल ठरली आहे आणि ४२ केडब्ल्यूएच बॅटरी, जी ४४३ किमीची (एमआयडीसी फुल) रेंज देते. याला पूरक म्हणून सेगमेंटमधील सर्वोत्तम डीसी फास्ट चार्जिंग सुविधा आहे, जी १०० किलोवॅट चार्जरसह फक्त ३९ मिनिटांत बॅटरी १० टक्के ते ८० टक्के चार्ज करते, आणि बॅटरी कंडिशनिंग वैशिष्ट्य, जे जलद डीसी चार्जिंगसाठी बॅटरीचे तापमान अनुकूल करते. सिरॉस ईव्हीमध्ये के-चार्ज परिसंस्थेचा इंटिग्रेटेड रूट प्लॅनर आणि स्थिर चार्जिंग नियंत्रणांच्या पाठबळासह १०.८ किलोवॅट ऑनबोर्ड एसी चार्जिंग क्षमता देखील आहे.
कियाच्या प्रबळ के१ प्लॅटफॉर्मवर डिझाइन केलेली सिरॉस ईव्ही प्रगत निकेल मॅंगनीज कोबाल्ट (एनएमसी) बॅटरीमधून सेगमेंटमधील सर्वोत्तम १७१ पीएस पॉवर आउटपुट देते आणि ५१.४ केडब्ल्यूएच पॅकसह फक्त ८.१ सेकंदात ० ते १०० किमी/तास वेग पकडते. लिक्विड-कोल्ड थर्मल मॅनेजमेंट सिस्टम असलेली आयपी६७-प्रमाणित बॅटरी भारतातील विविध हवामान परिस्थितीचा सामना करण्यासाठी डिझाइन केली आहे.
सिरॉस ईव्ही विविध ईव्ही-विशिष्ट तंत्रज्ञानांसह देखील सुसज्ज आहे, ज्यामध्ये ऑटो मोड आणि आय-पॅडलसह रिजनरेटिव्ह ब्रेकिंगसाठी पॅडल शिफ्टर्स, वेईकल-टू-लोड (इंटर्नल), व्हर्च्युअल इंजिन साउंड सिस्टम (व्हीईएसएस), बॅटरी हीटिंग सिस्टम आणि शिफ्ट-बाय-वायर – कॉलम टाईप यांचा समावेश आहे.
दैनंदिन आत्मविश्वासपूर्ण ड्रायव्हिंगसाठी देशभरात चार्जिंग नेटवर्क:
सिरॉस ईव्हीच्या मालकीहक्क अनुभवाचा मुख्य गाभा म्हणजे के-चार्ज आहे, जी मायकिया अॅप आणि किया इंडिया वेबसाइटवर उपलब्ध असलेली किया इंडियाची ईव्ही चार्जिंग परिसंस्था आहे. के-चार्ज देशातील आघाडीच्या २३ चार्ज पॉईंट ऑपरेटर्समधील २०,३०० पेक्षा जास्त चार्जिंग पॉईंट्स एकाच प्लॅटफॉर्मवर एकत्र आणते, ज्यामुळे चालकांना एकाच वॉलेटद्वारे चार्जिंग शोधणे, तेथपर्यंतचा मार्ग निश्चित करणे आणि पैसे भरणे सोपे होते, यामुळे रेंजची चिंता दूर होते आणि दैनंदिन चार्जिंग सुलभ होते. उच्च क्षमतेच्या डीसी फास्ट चार्जर्सनी सज्ज असलेले १२९ पेक्षा जास्त किया डीलरशिप्स आणि २७५ पेक्षा जास्त ईव्ही-सज्ज वर्कशॉप्सद्वारे ही परिसंस्था प्रत्यक्ष अधिक दृढ करण्यात आली आहे, ज्यामुळे ग्राहक कुठेही प्रवास करत असले तरी त्यांना विश्वासार्ह चार्जिंग आणि सेवा सहाय्य मिळते. ४०० शहरांमधील ९०० पेक्षा जास्त कस्टमर टचपॉईंट्सच्या कियाच्या सतत वाढणाऱ्या सर्व्हिस नेटवर्कचा हा एक भाग आहे.
प्रगतीशील डिझाइन:
कियाच्या जागतिक ईव्ही डिझाइन तत्त्वज्ञानापासून प्रेरित होऊन सिरॉस ईव्ही विशिष्ट ईव्ही-संबंधित शैलीसह आकर्षक, अपराइट एसयूव्ही रचनेवर आधारित आहे: कियाचा सिग्नेचर डिजिटल टायगर फेससह आइस क्यूब एमएफआर एलईडी हेडलाइट्स, मानक फ्रंट एलईडी फॉग लॅम्प्स, एकात्मिक टर्न इंडिकेटर्ससह स्टार मॅप एलईडी डे-टाइम रनिंग लॅम्प्स. मागील बाजूस असलेले स्टार मॅप एलईडी टेल लॅम्प्स, सेगमेंटमधील पहिले ऑटो स्ट्रीमलाइन डोअर हँडल्स आणि आर१७ – ४३.६६ सेमी (१७-इंच) क्रिस्टल कट ड्युअल-टोन एरो अलॉय व्हील्स (१६-इंच व्हील पर्यायासह) सिरॉस ईव्हीच्या आधुनिक लुकला अधिक आकर्षक करतात. एरो इन्सर्टसह ब्लॅक हाय ग्लॉसी फ्रंट आणि रिअर स्किड प्लेट्स, ब्लॅक हाय ग्लॉसी गार्निश टाईप रूफ रेल्स आणि आकर्षक साईड गार्निश पर्याय प्रगतीशील एसयूव्हीचे वैशिष्ट्य पूर्ण करतात.
किया इंडियाची आणखी एक कामगिरी; ‘इंडियाज बेस्ट वर्कप्लेसेस २०२६’मध्ये मानाचा सन्मान
दैनंदिन जीवनशैलीला अनुसरून डिझाइन केलेली प्रीमियम केबिन:
या वेईकलमधील केबिनच्या केंद्रस्थानी सेगमेंटमधील पहिले ७६.२० सेमी (३० इंच) रुंद ट्रिनिटी पॅनोरॅमिक डिस्प्ले पॅनेल आहे, ज्यामध्ये ३१.२४ सेमी (१२.३ इंच) एचडी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, ३१.२४ सेमी (१२.३ इंच) एचडी टचस्क्रीन नेव्हिगेशन कॉकपिट आणि १२.७ सेमी (५ इंच) क्लायमेट कंट्रोल इंटरफेस समाविष्ट आहे, ज्याला ९५ हून अधिक वैशिष्ट्यांसह किया कनेक्ट २.०, ओव्हर-द-एअर (ओटीए) सॉफ्टवेअर अपडेट्स, वायरलेस अँड्रॉइड ऑटो व अॅपल कारप्ले, हार्मन कार्डन प्रीमियम ८-स्पीकर साउंड सिस्टम आणि स्मार्टफोन वायरलेस चार्जरचे पाठबळ आहे.
या वेईकलमध्ये आरामदायीपणाला देखील प्राधान्य देण्यात आले आहे. केबिनमध्ये प्रशस्त, वैविध्यपूर्ण मांडणीसह एैसपैस रिअर लेगरूम मिळते, ज्याला ६०:४० स्प्लिट रियर सीट्सची जोड दिली आहे, जे स्लाईड आणि रिक्लाईन होऊ शकतात, ज्यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासानुसार आरामदायीपणा निश्चित करता येतो. समोरच्या बाजूला (सीट आणि बॅक) आणि मागील बाजूला व्हेंटिलेटेड सीट्स (केवळ सीट), ४-वे पॉवर ड्रायव्हर सीट, ड्युअल पेन पॅनोरॅमिक सनरूफ, एलईडी फुटवेल लॅम्प्ससह पहिल्या रांगेत ६४-कलर अॅम्बियंट मूड लाइटिंग, ड्युअल कॅमेऱ्यासह स्मार्ट डॅशकॅम, रिअर डोअर सनशेड पडदे, नवीन १०० वॅट फ्रंट यूएसबी-सी चार्जरसह विविध यूएसबी टाईप-सी चार्जिंग पोर्ट आणि समर्पित कव्हरसह १६-लिटर फ्रंक केबिनचा हा अनुभव परिपूर्ण करतात.
विश्वास निर्माण करण्यासाठी डिझाइन केलेली सुरक्षितता:
सिरॉस ईव्हीमध्ये लेव्हल २ एडीएएस देण्यात आले आहे, ज्यामध्ये सेगमेंटमधील सर्वोत्तम १६ ऑटोनामस फंक्शन्स समाविष्ट आहेत, यात कार, पादचारी, सायकलस्वार, जंक्शन-टर्निंग आणि थेट समोरून येणारी वाहने यांसाठी फ्रंट कोलिजन-अव्हॉइडन्स असिस्ट, स्टॉप अँड गो सह स्मार्ट क्रूझ कंट्रोल, लेन कीपिंग आणि लेन फॉलोइंग असिस्ट यांचा समावेश आहे. ३६०-डिग्री कॅमेरा, क्लस्टरमध्ये असणारे ब्लाइंड व्ह्यू मॉनिटर, पार्किंग कोलिजन-अव्हॉइडन्स असिस्ट – रिव्हर्स (पीसीए-आर) आणि फ्रंट, रिअर व साईड पार्किंग सेन्सर्स अरुंद शहरी जागांमध्ये आत्मविश्वासाने पार्किंग करण्यास मदत करतात.
या सर्वांना कियाच्या २५ मानक हाय-सेफ्टी वैशिष्ट्यांचे पाठबळ आहे, ज्यामध्ये सहा एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ईएससी), हिल-स्टार्ट असिस्ट कंट्रोल (एचएसी), ब्रेक असिस्ट सिस्टम (बीएएस), हायलाईन टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम, आयएसओफिक्स (ISOFIX) चाईल्ड अँकरेज, रिअर ऑक्युपंट अलर्ट आणि ऑटो होल्डसह इलेक्ट्रिक पार्किंग ब्रेक यांचा समावेश आहे, जे प्रत्येक प्रवासासाठी सर्वसमावेशक सुरक्षा प्रदान करतात.
व्हेरिएंट्स, रंग आणि किमती:
सिरॉस ईव्ही दोन वेगवेगळ्या बॅटरी पॅक्ससह एकूण सात ट्रिम्समध्ये उपलब्ध आहे. एक्स्टीरिअर रंगांसाठी यामध्ये नऊ आकर्षक पर्याय मिळतात, ज्यामध्ये ग्लॅशियर व्हाईट पर्ल, फ्रॉस्ट ब्लू, ग्रॅव्हिटी ग्रे, प्युटर ऑलिव्ह, मॅग्मा रेड, आयव्हरी सिल्व्हर मॅट, आयव्हरी सिल्व्हर ग्लॉस आणि ऑरोरा ब्लैक पर्ल यांचा समावेश आहे, तर केवळ एक्स-लाईन इआर ट्रिमसाठी विशेष एक्सक्लूसिव्ह मॅट ग्रॅफाइट आणि ऑरोरा ब्लैक पर्ल रंग मिळतात. यासोबतच क्लाउड ब्लू अँड ग्रे, ऑक्सिडाईज्ड ऑनिक्स ब्लैक अँड ऑफ-व्हाईट, आणि विशेष ऑनिक्स ब्लैक अँड हंटर ग्रीन या तीन इंटीरिअर थीम्सचा पर्यायही देण्यात आला आहे.
किमतींबाबत बोलायचे झाल्यास, ४२ केडब्ल्यूएच बॅटरी पॅक अंतर्गत एचटीके व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत १३,४९,९०० रुपये, एचटीके+ व्हेरिएंटची किंमत १४,९९,९०० रुपये आणि एचटीएक्स व्हेरिएंटची किंमत १५,९९,९०० रुपये आहे. तर ५१.४ केडब्ल्यूएच एक्सटेंडेड रेंज बॅटरी पॅक अंतर्गत एचटीके+ ईआर व्हेरिएंट १६,९९,९०० रुपयांना, एचटीएक्स ईआर १७,९९,९०० रुपयांना, एचटीएक्स+ ईआर १९,४९,९०० रुपयांना आणि टॉप-एंड एक्स-लाईन ईआर व्हेरिएंट १९,९९,९०० रुपयांना उपलब्ध आहे.