Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आतापासून Kia ची ‘ही’ कार मार्केटमध्ये दिसणार नाही ! कंपनीने सांगितले कारण

कियाने देशात अनेक बेस्ट कार्स ऑफर केल्या आहेत, ज्यांना मार्केटमध्ये दमदार मागणी मिळताना दिसत आहे. यातच आता कंपनीने आपली एक कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 10, 2025 | 05:06 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Follow Us:

भारतीय बाजारात अनेक विदेशी ऑटो कंपन्या कार्यरत आहेत, ज्या मार्केटमध्ये बेस्ट फिचर आणि परफॉर्मन्स देणाऱ्या कार ऑफर करतात. यातीलच एक आघाडीचे नाव म्हणजे किया मोटर्स. कियाने देशात ग्राहकांच्या आवडी आणि मागणीनुसार उत्तम कार ऑफर केल्या आहेत. ग्राहक देखील कंपन्यांच्या कार्सना उत्तम प्रतिसाद देत आहेत. पण आता कंपनीने मार्केटमध्ये आपली एक कार बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

दक्षिण कोरियाची कंपनी किया ही Kia Carens ही बजेट एमपीव्ही म्हणून ऑफर करते. पण, आता कंपनीने या MPV चे सर्व व्हेरियंट बंद केले आहेत. आता ही कार फक्त एकाच व्हेरियंटमध्ये उपलब्ध असणार आहे. असा निर्णय कंपनीकडून का घेण्यात आला? कोणता व्हेरियंट आता ऑफर केला जाणार आहे? त्याची किंमत किती आहे? त्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.

ड्रायव्हिंग सोयीस्कर बनवणारा Self Driving फिचर बेतेल आपल्याच जिवावर, Tesla च्या व्हायरल व्हिडिओमुळे उघडले डोळे

Kia Carens चे अनेक व्हेरियंट बंद

कियाने कॅरेन्स एमपीव्हीचे अनेक व्हेरियंट बंद केले आहेत. कंपनीने त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर ही माहिती देखील अपडेट केली आहे.

यामागचे कारण काय?

कियाने नुकतेच 8 मे 2025 रोजी नवीन एमपीव्ही म्हणून Kia Carens Clavis सादर केली आहे. ही एमपीव्ही 23 मे 2025 रोजी अधिकृतपणे लाँच केली जाईल. याची विक्री सुरु झाल्यानंतर लगेचच, कॅरेन्सचे अनेक व्हेरियंट बाजारातून बंद करण्यात आले आहेत.

कोणत्या व्हेरियंटची होणार विक्री?

कंपनी आता फक्त एकाच व्हेरियंटमध्ये कॅरेन्सची विक्री करणार आहे. वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कॅरेन्स आता फक्त Premium (O) व्हेरियंटमध्ये (7-seater Premium O Carens) ऑफर केली जाते. ज्यामध्ये सात सीट्सचा पर्याय दिला जाईल.

किती इंजिन पर्याय उपलब्ध असतील?

कंपनीने वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, कॅरेन्सच्या एकाच व्हेरियंटमध्ये तीन इंजिन पर्याय ऑफर केले जातील. त्यात फक्त स्मार्टस्ट्रीम G1.5 T-GDi 6iMT, स्मार्टस्ट्रीम G1.5 6MT आणि 1.5L CRDi VGT 6MT व्हेरियंट उपलब्ध असतील.

कोलकातामध्ये टाटा मोटर्सचे नवीन वाहन स्क्रॅपिंग केंद्र सुरू; पर्यावरणपूरक स्क्रॅपिंगला चालना

फीचर्स

Kia Carens Pemium (O) 7 सीटर कारमध्ये अनेक उत्तम फीचर्स देण्यात आली आहेत. यात 15 आणि 16 इंच टायर्स, हॅलोजन लॅम्प, हॅलोजन टेल लॅम्प, शार्क फिन अँटेना, टिल्ट स्टीअरिंग, पॉवर विंडो, रिअर व्ह्यू कॅमेरा, 12.5 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, आठ इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, अँड्रॉइड ऑटो, अ‍ॅपल कार प्ले, सेमी लेदरेट सीट्स, टाइप सी चार्जिंग पोर्ट, की-लेस एंट्री, सात रंग पर्यायांसह अनेक फीचर्स असतील.

किती सुरक्षित असेल कार?

कंपनीने जाहीर केले आहे की Carens MPV मध्ये ABS, EBD, ESC, HAC, VSM, DBC, 6 एअरबॅग्ज, मागील पार्किंग सेन्सर, चारही चाकांवर डिस्क ब्रेक, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक, ISOFIX चाइल्ड अँकरेज, इत्यादी सेफ्टी फीचर्स असतील.

Web Title: Kia carens mpv all variant discontinued in indian market except 7 seater premium o

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 10, 2025 | 05:06 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Kia Motors

संबंधित बातम्या

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
1

यामाहा R15 M भारतात लवकरच होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
2

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
3

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
4

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.