फोटो सौजन्य: evolving.ai (Instagram)
भारतासह जगभरात आता आधुनिक फीचर्स असणाऱ्या कार लाँच होत आहे. यात इलेक्ट्रिक वाहनांचा देखील समावेश आहे. जसजसा काळ बदलत आहे तसेच कारमधील फीचर्स देखील बदलताना दिसत आहे. त्यात आता सर्वच गोष्टीत AI तंत्रज्ञान पाहायला मिळत आहे. अनेक ऑटो कंपन्या AI बेस्ड फिचर कारमध्ये समाविष्ट करत आहे. याचा उद्देश तुमचा ड्रायव्हिंग अनुभव अधिक चांगला बनवणे असा असतो. पण अशा आधुनिक तंत्रज्ञानावर पूर्णपणे अवलंबून राहणे धोकादायक सुद्धा ठरू शकते.
गेल्या काही वर्षांत, केवळ भारतातच नाही तर जगभरात कार मधील तंत्रज्ञानात बरेच बदल झाले आहेत. काही वर्षांतच, कारमध्ये असे तंत्रज्ञान येत आहे जे पूर्वी अकल्पनीय होते. ADAS, AI, क्रूझ कंट्रोल ही काही तंत्रज्ञाने आहेत जी कार ड्रायव्हिंगचा अनुभव अधिक चांगला करत आहे.
सध्या एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामुळे पुन्हा अधोरेखित झाले आहे की जरी कार्समध्ये नवीन तंत्रज्ञान येत असले तरी त्याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहणे धोकादायक ठरू शकते.
अलिकडेच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक व्यक्ती टेस्ला कार सेल्फ-ड्रायव्हिंग तंत्रज्ञानाने चालवत आहे. या व्हिडिओमध्ये, जेव्हा टेस्ला कार दुसऱ्या कारला ओव्हरटेक करते तेव्हा ती कार टेस्लाच्या अधिक जवळ येते. अशावेळी सुदैवाने कार चालक लगेचच ती परिस्थिती नियंत्रणात आणली. अन्यथा मोठा अपघात घडला असता.
ज्या सोशल मीडिया हँडलवर ही पोस्ट केली गेली होती त्या हँडलने एक मोठा प्रश्न उपस्थित केला आहे. आपल्याला असे भविष्य हवे आहे का जिथे असे निर्णय पूर्णपणे AI वर सोपवले जातील?
कोलकातामध्ये टाटा मोटर्सचे नवीन वाहन स्क्रॅपिंग केंद्र सुरू; पर्यावरणपूरक स्क्रॅपिंगला चालना
सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत. काही लोकं म्हणत आहेत की ही टेस्लाच्या तंत्रज्ञानाची चूक आहे तर काही लोक म्हणत आहेत की ही दुसऱ्या कारच्या ड्रायव्हरची चूक आहे. त्याच वेळी, काही लोक असेही म्हणत आहेत की फक्त तुम्ही स्वतःहून तुमची कार चालवा.