फोटो सौजन्य: @SteveFowler (X.com)
ग्लोबल मार्केटमध्ये देखील विविध कार्सना चांगली मागणी मिळत आहे. अनेक ऑटो कंपन्या ग्राहकांच्या मागणी आगामी काळातील बदलांनुसार दमदार कार्स लाँच करत आहे. तसेच भारतासह जगभरात विविध ऑटो एक्स्पोचे आयोजन होत असतात. नुकतेच जागतिक पातळीचा ऑटो शोचे आयोजन करण्यात आले होते. यात विविध कार्सना मानाचे अवॉर्ड्स मिळाले आहेत, ज्यामुळे ग्राहकांचा या कार्सवरील विश्वास वाढला आहे.
16 एप्रिल 2025 रोजी न्यू यॉर्क इंटरनॅशनल ऑटो शोमध्ये घोषित करण्यात आलेल्या 2025 चा वर्ल्ड कार ऑफ द इयर पुरस्कार Kia EV3 ने जिंकला आहे. या शर्यतीतील इतर दोन अंतिम फेरीत BMW X3 आणि Hyundai Inster / Casper Electric होते. Kia Telluride आणि EV9 नंतर, EV3 ही दक्षिण कोरियन उत्पादक कंपनीकडून सर्वोच्च सन्मान मिळवणारी तिसरी कार ठरली आहे.
Tata Punch साठी किती वर्षांचं लोन घ्यावं, जेणेकरून दरमहा भरावा लागेल फक्त 10 हजार रुपये EMI ?
भारतीयांची आवडती Toyota Innova खरेदी करण्यासाठी किती असावा पगार, जेणेकरून दरमहा EMI भरावा लागेल
स्टेला ली, कार्यकारी उपाध्यक्ष, BYD यांना 2025 वर्ल्ड कार पर्सन ऑफ द इयरचा अवॉर्ड मिळाला आहे.
2025 साठी, वर्ल्ड कार अवॉर्ड्स ज्युरीमध्ये 30 देशांतील 96 प्रतिष्ठित ऑटोमोटिव्ह पत्रकारांचा समावेश होता. त्यापैकी ऑटोकार इंडियाचे संपादक होरमाझद सोराबजी आणि ऑटोकार इंडियाच्या कन्सल्टिंग एडिटर (व्हिडिओ) रेणुका किरपलानी यांचा समावेश होता.