फोटो सौजन्य: @MasMasBiassaa (X.com)
भारतीय ऑटोमोबाईल मार्केटमध्ये अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या विविध सेगमेंटमध्ये दमदार कार्स ऑफर करत असतात. यातील काही कार्स तर ग्राहकांमध्ये इतक्या लोकप्रिय झाल्या आहेत की नवीन कार्स लाँच होऊन देखील त्यांच्या विक्रीवर काहीच परिणाम होत नाहीत आहे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे टोयोटा इनोव्हा.
आजही मार्केटमध्ये टोयोटा इनोव्हाला चांगली मागणी मिळताना दिसत आहे. Toyota Innova Crysta मार्केटमध्ये 7-सीटर आणि 8-सीटर अशा दोन्ही व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या टोयोटा कारला बाजारात खूप मागणी आहे. इनोव्हा क्रिस्टाची एक्स-शोरूम किंमत 19.99 लाख रुपयांपासून सुरू होते आणि 26.82 लाख रुपयांपर्यंत जाते. जर तुमच्याकडे ही कार खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे असतील तर तुम्ही ही कार सहज खरेदी करू शकता. पण जरी तुमच्याकडे सध्या फक्त 4 लाख रुपये असले तरीही ही कार तुम्हाला खरेदी करता येऊ शकते. यासाठी तुम्हाला कर्ज घ्यावे लागेल.
Hero कडून ग्राहकांना खास गिफ्ट ! ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटरच्या किमतीत 32000 पर्यंतची केली घट
टोयोटा इनोव्हा क्रिस्टा ही एक डिझेल कार आहे. या कारच्या सर्वात स्वस्त मॉडेल DX 7Str ची ऑन-रोड किंमत 23.85 लाख रुपये आहे. ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला 20 लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. या कर्जावर आकारल्या जाणाऱ्या व्याजानुसार, तुम्हाला दरमहा बँकेत एक निश्चित रक्कम EMI म्हणून जमा करावी लागेल.
टोयोटा इनोव्हा क्रिस्टाचा हे 7-सीटर व्हेरियंट खरेदी करण्यासाठी सुमारे 3.85 लाख रुपयांचे डाउन पेमेंट करावे लागेल. ही टोयोटा कार खरेदी करण्यासाठी, जर तुम्ही चार वर्षांसाठी कर्ज घेतले आणि बँक या कर्जावर 9 टक्के व्याज आकारत असेल, तर तुम्हाला दरमहा सुमारे 50 हजार रुपये ईएमआय जमा करावा लागेल. यासाठी तुमचा पगार 1 लाख ते 1.5 लाख रुपयांच्या दरम्यान असणे गरजेचे आहे.
जर इनोव्हा खरेदी करण्यासाठी पाच वर्षांसाठी कर्ज घेतले तर तुम्हाला दरमहा सुमारे 40 हजार रुपये 9 टक्के व्याजदराने बँकेत जमा करावे लागतील. यासाठी देखील तुमचा मासिक पगार 1 लाख ते 1.25 लाख रुपयांच्या दरम्यान असावा.
बॉबी देओलने खरेदी केली अलिशान Range Rover SUV, किंमत ऐकून चक्रावून जाल
जर तुम्ही ही टोयोटा कार खरेदी करण्यासाठी सहा वर्षांसाठी कर्ज घेत असाल तर तुम्हाला 9 टक्के व्याजदराने दरमहा 36000 रुपये ईएमआय भरावे लागतील. यासाठी तुमच्याकडे सुमारे 1 लाख रुपये असले पाहिजेत, जेणेकरून तुमच्या इतर खर्चावर त्याचा परिणाम होणार नाही.
टोयोटा इनोव्हा क्रिस्टा कर्जावर खरेदी करण्यासाठी, तुमचा महिन्यांचा पगार सुमारे 1 लाख रुपये असावा. यासोबतच, कर्ज मंजूर करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचणे महत्त्वाचे आहे. जर बँकांच्या पॉलिसी वेगवेगळ्या असतील तर या आकडेवारीत फरक दिसून येईल.