Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किया इंडियाकडून प्रोजेक्ट ‘डी.आर.ओ.पी’च्या फेज-४ ची सुरुवात; शाश्वत विकास आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाला नवी गती

किया इंडियाने दिल्ली-एनसीआरमध्ये शाश्वत प्लास्टिक कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनासाठी ‘प्रोजेक्ट डी.आर.ओ.पी.’च्या फेज-४ची घोषणा केली.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 14, 2026 | 06:33 PM
किया इंडियाकडून प्रोजेक्ट ‘डी.आर.ओ.पी’च्या फेज-४ ची सुरुवात; शाश्वत विकास आणि प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाला नवी गती
Follow Us
Follow Us:

मुंबई, १४ जून २०२६: किया इंडिया या देशातील आघाडीच्‍या मास-प्रीमियम कार उत्पादक कंपनीने शाश्वत विकास आणि पर्यावरणाविषयीच्या जबाबदार भूमिकेप्रती असलेल्या आपल्या दीर्घकालीन कटिबद्धतेच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. इंडियन पोल्युशन कंट्रोल असोसिएशन (आयपीसीए) आणि नवी दिल्ली म्‍युनिसिपल कौन्सिल (एनडीएमसी) यांच्या सहयोगाने कंपनीने आज नवी दिल्लीतील कनॉट प्लेस येथील एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दिल्ली राष्ट्रीय राजधानी क्षेत्रासाठी प्रोजेक्ट डी.आर.ओ.पी.च्या (डेव्‍हलप रिस्‍पॉन्सिबल आऊटलुक फॉर प्‍लास्टिक) फेज-४ ची घोषणा केली.

या फेज-४ अंतर्गत प्रोजेक्ट डी.आर.ओ.पी.चा दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादमधील २५० केंद्रांवर प्लास्टिक कचऱ्याचे जबाबदार व्यवस्थापन सुलभ करण्‍याचा मनसुबा आहे, ज्यामुळे अधिक स्वच्छ आणि शाश्वत शहरी परिसंस्था निर्माण करण्याच्या या उपक्रमाचे योगदान अधिक दृढ होईल.

Creta आणि Seltos ला टक्कर देण्यासाठी सज्ज Nissan Tekton; प्रीमियम फीचर्सने ग्राहकांना भुरळ घालणार

फेज-४ च्‍या शुभारंभाचा भाग म्हणून, किया इंडिया आणि त्यांच्या भागीदारांनी रिसायकल केलेल्या प्लास्टिक कचऱ्याचा वापर करून तयार केलेल्या विशेष डी.आर.ओ.पी. कम्युनिटी बीन्सचे (कचरा कुंड्यांचे) अनावरण केले. यातून संसाधनांच्या पुनर्वापरावर या प्रकल्पाचा असलेला भर अधोरेखित होतो. या इव्‍हेण्‍टमध्‍ये डी.आर.ओ.पी. कलेक्‍शन वेईकलला हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले, जे नवी दिल्लीमध्ये प्लास्टिक कचऱ्याचे वर्गीकरण, संकलन आणि जबाबदार विल्हेवाट लावण्याची पद्धत अधिक दृढ करण्यासाठी एका पद्धतशीर आणि एकात्मिक कचरा संकलन यंत्रणेच्या अंमलबजावणीचे प्रतीक आहे.

प्रोजेक्ट डी.आर.ओ.पी.च्या फेज-४ च्‍या शुभारंभाबद्दल मत व्‍यक्त करत किया इंडियाचे सेल्स आणि मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष अतुल सूद म्हणाले, “भारतातील शहरी परिसंस्था विकसित होत आहे, तसे पद्धतशीर आणि शाश्वत कचरा व्यवस्थापन प्रणालीची गरज पूर्वीपेक्षा अधिक गंभीर बनली आहे. प्रोजेक्ट डी.आर.ओ.पी.च्या माध्यमातून, किया इंडिया व्‍यक्तींच्‍या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि जबाबदार प्लास्टिक कचरा व्यवस्थापनासाठी प्रत्‍यक्ष मजबूत पायाभूत सुविधांना साहाय्य करण्यासाठी कटिबद्ध आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात हा उपक्रम आणण्यासाठी आणि देशभरात व्यापक पर्यावरणीय परिवर्तनाला प्रेरित करू शकणारे अनुकरणीय मॉडेल तयार करण्यासाठी आम्हाला आयपीसीए आणि एनडीएमसीसोबत सहयोग करण्याचा अभिमान वाटत आहे.”

Kia India : किया इंडिया आणि टेनिस प्रीमियर लीगची मोठी भागीदारी; भारतातील टेनिसला मिळणार नवी चालना

किया इंडियाने २०२३ मध्ये पाच शहरांमध्ये प्रोजेक्ट डी.आर.ओ.पी. सुरू केला होता आणि ५०० केंद्रांमधून २,५०० टन प्लास्टिक कचरा गोळा करण्याचे आपले उद्दिष्ट पूर्ण केले होते. २०२४ मध्ये, या उपक्रमाचा ७८९ केंद्रांवर विस्तार करण्यात आला आणि ३,५०० टनांचे उद्दिष्ट ओलांडून ४,८५० टन कचरा गोळा करण्यात आला. २०२५ मध्ये, या उपक्रमाची व्याप्ती चंदीगड, पंचकुला आणि झिरकपूरसह आठ शहरांमध्ये वाढवण्यात आली, ज्यामध्ये १,१०० केंद्रांमधून एकूण १४,५६० मेट्रिक टनपेक्षा जास्त प्लास्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यात आले आणि या उपक्रमाचा ३६ लाखांहून अधिक व्‍यक्तींवर सकारात्मक प्रभाव पडला. आता त्याच्या चौथ्या टप्प्यात, प्रोजेक्ट डी.आर.ओ.पी. चा ११ शहरांमध्ये विस्तार केला जात असून त्यात १,३५० केंद्रांचा समावेश आहे आणि कचरा संकलनाचे उद्दिष्ट वाढवून ९,२०० टन करण्यात आले आहे.

Web Title: Kia india inaugarated project drop phase 4

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • automobile
  • cars
  • kia

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.