किया इंडिया आणि टेनिस प्रीमियर लीगची मोठी भागीदारी; भारतातील टेनिसला मिळणार नवी चालना
मुंबई : किया इंडिया आणि टेनिस प्रीमियर लीग (टीपीएल) यांनी आज एका ऐतिहासिक तीन वर्षांच्या सहयोगाची घोषणा केली आहे, ज्यांतर्गत किया इंडिया या लीगची एक्सक्लुझिव्ह स्पॉन्सर म्हणून जोडले गेली आहे. किया इंडियाचा टेनिस क्षेत्रातील प्रदीर्घ जागतिक वारसा आणि भारतातील या खेळाभोवती असलेली टीपीएलची वाढती परिसंस्था एकत्र आणणारा हा सहयोग टेनिसचे महत्त्व व व्याप्ती वाढवण्यासाठी आणि देशभरातील नवीन पिढीला प्रेरित करण्यासाठीच्या सामायिक उद्दिष्टावर आधारित आहे.
हा बहु-वर्षीय करार भारतातील टेनिसमधील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला आहे. या कराराच्या माध्यमातून जगातील आघाडीचा ऑटोमोटिव्ह ब्रँड अशा एका स्वदेशी चळवळीशी जोडला गेला आहे, जी आपल्या लीग आणि अॅपच्या माध्यमातून देशातील टेनिसचा इतिहास नव्याने लिहीत आहे.
ऑस्ट्रेलियन ओपनसोबत सहयोगाच्या माध्यमातून जवळपास २५ वर्षांचा जागतिक टेनिस वारसा लाभलेल्या किया इंडियाने नेहमी तरुणांवर केंद्रित आणि प्रत्यक्ष सहभागाला प्रोत्साहन देणाऱ्या उपक्रमांद्वारे या खेळाभोवती अर्थपूर्ण अनुभव निर्माण करण्यावर भर दिला आहे. टीपीएलसोबत या सहयोगामधून भारतातील समकालीन क्रीडा संस्कृतीला आकार देणाऱ्या आधुनिक क्रीडा मंचांना पाठिंबा देण्याप्रती किया इंडियाची निरंतर कटिबद्धता दिसून येते.
किया इंडियाचे सीनियर व्हाईस प्रेसिडेंट – सेल्स आणि मार्केटिंग, अतुल सूद म्हणाले, “किया इंडियामध्ये आमचा विश्वास आहे की, खेळांमध्ये आकांक्षांना प्रेरित करण्याची आणि अर्थपूर्ण सांस्कृतिक बंध निर्माण करण्याची ताकद असते. टेनिस खेळ आपल्या तरुण ऊर्जा, जागतिक आकर्षण आणि प्रीमियम वैशिष्ट्यांमुळे आमच्या ब्रँडच्या तत्त्वज्ञानाशी तंतोतंत जुळणारा आहे. टेनिस प्रीमियर लीगसोबत आमचा सहयोग भारतातील नवीन पिढीच्या प्रेक्षकांसाठी टेनिस अधिक मनोरंजक आणि सुसंगत बनवण्याच्या सामायिक उद्दिष्टाला सादर करतो. टीपीएलची वाढती परिसंस्था आणि तळागाळातील स्तरावर असलेला त्यांचा भर यांच्या माध्यमातून या खेळातील वाढता सहभाग, लोकांमधील वाढती उत्सुकता आणि गुणवान खेळाडूंच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
टेनिस प्रीमियर लीगचे सह-संस्थापक, कुणाल ठाकूर म्हणाले, “किया इंडियासोबत हा सहयोग आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. गेल्या काही वर्षांत, आम्ही आमच्या अॅप, लीग आणि रेस टू गोल्ड सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून तळागाळात प्रबळ परिसंस्था निर्माण करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. किया इंडियासारख्या जागतिक ब्रँडने आमच्या या उद्दिष्टाला ओळखणे आणि त्याला पाठिंबा देणे, यामुळे आम्हाला आमच्या प्रयत्नांना अधिक मोठ्या प्रमाणावर नेण्याचा आणि भारतातील टेनिसच्या भविष्यावर खऱ्या अर्थाने सकारात्मक प्रभाव पाडण्याचा आत्मविश्वास मिळाला आहे.”
टेनिस प्रीमियर लीगचे सह-संस्थापक मृणाल जैन म्हणाले “टीपीएलने नेहमी परिपूर्ण टेनिस परिसंस्था निर्माण करण्यावर विश्वास ठेवला आहे, ज्यामध्ये तरुण प्रतिभा शोधण्यापासून ते त्यांना सर्वोच्च पातळीवर एक व्यासपीठ मिळवून देण्यापर्यंतच्या गोष्टींचा समावेश आहे. किया इंडियासोबत सहयोग करण्यासह आम्ही प्रायोजक मिळवला आहे, तसेच आम्हाला भारतासाठी चॅम्पियन्स (विजेते) घडवण्याच्या आमच्या उद्दिष्टाला पाठिंबा देणारा दीर्घकालीन भागीदार मिळाला आहे.”
या बहु-वर्षीय सहयोगाचा भाग म्हणून, किया इंडिया टेनिस प्रीमियर लीगच्या संपूर्ण परिसंस्थेशी जोडली जाईल, ज्यामध्ये टीपीएल अॅप आणि सर्व ८ फ्रँचायझी टीम्सच्या जर्सीवर मुख्य स्पॉन्सर म्हणून किया इंडियाचे नाव समाविष्ट असेल. हा सहयोग या खेळाभोवती नागरिकांचा अधिक सहभाग आणि उत्साह वाढवण्याच्या किया इंडियाच्या उद्दिष्टाशी सुसंगत आहे, तसेच टीपीएलच्या तळागाळातील उपक्रमांना अधिक दृढ करेल, ज्यांनी देशभरात स्पर्धांचे आयोजन करण्यात आणि उदयोन्मुख टेनिसपटू शोधण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
गेल्या दोन वर्षांत, टीपीएलने आपल्या ‘रेस टू गोल्ड स्कॉलरशिप’ या प्रमुख उपक्रमाच्या माध्यमातून भारतातील ८० हून अधिक तरुण टेनिसपटूंना पाठबळ दिले आहे. आता किया इंडियासोबत सहयोगाने या उद्दिष्टाचा आणखी विस्तार केला जात आहे, तसेच येत्या काही वर्षांत आणखी १२० हून अधिक तरुण खेळाडूंना सक्षम करण्याचे ध्येय आहे. याद्वारे २०३६ च्या ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदके जिंकू शकतील अशा ऑलिम्पिक-स्तरीय प्रतिभावान खेळाडूंना घडवण्याचे दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. टीपीएलचा तळागाळातील खेळाडूंवर असलेला फोकस आणि या खेळाची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन किया इंडिया या सहयोगाकडे भारतातील टेनिसमधील रस वाढवण्यासाठी आणि वाढता विस्तार, रचना व शाश्वत गुंतवणुकीच्या माध्यमातून या खेळाच्या दीर्घकालीन विकासाला पाठिंबा देण्यासाठी महत्त्वपूर्ण मंच म्हणून पाहते.
Skoda Epiq ची ग्लोबल एंट्री! मिळणार दमदार रेंज, ADAS आणि प्रीमियम फीचर्स… जाणून घ्या किंमत






